Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अमृताने पटकावला पहिला वहिला राज्य चित्रपट पुरस्कार, आनंद व्यक्त करत म्हणाली ‘माझ्या महाराष्ट्राने दिलेली…’

'चंद्रमुखी' चित्रपटासाठी अमृताला यंदाचा महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार मिळाला आहे. या पुरस्कारसाठी अभिनेत्री तिचा आनंद व्यक्त केला आहे. तसेच यासाठी ती खूप कृतज्ञ आहे असे ती म्हणाली आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Aug 06, 2025 | 01:52 PM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • मराठी राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्या दिमाखात संपन्न
  • अमृताने पटकावला पहिला वहिला राज्य चित्रपट पुरस्कार
  • ‘चंद्रमुखी’ चित्रपटासाठी अमृताने व्यक्त केला आनंद
असं म्हणतात ना प्रत्येक पहिल्या गोष्टीचं कौतुक काही वेगळं असतं असं काहीस अभिनेत्री अमृता खानविलकरच्या आयुष्यात देखील असंच घडलं आहे. ५ ऑगस्ट रोजी 60 आणि 61 मराठी राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्या अगदी दिमाखात संपन्न झाला आणि या पुरस्कार सोहळ्यात अमृताला चंद्रमुखी साठी उत्कृष्ट अभिनेत्री हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. दिग्गज कलाकार नेते मंडळीच्या उपस्थितीत हा सोहळा अगदी थाटात पार पडला आहे.

‘Dhadak 2’ झाला फ्लॉप? ४५ कोटींच्या बजेटमध्ये बनवलेल्या चित्रपटाचे जाणून घ्या ५ दिवसांचे कलेक्शन

अमृता सध्या भारतात नसली तरी अगदी साता समुद्रापार राहून तिने या बद्दलचा उत्साह आणि आनंद शेअर केला आहे अमृता म्हणाली की, “आज माझ्यासाठी माझ्या महाराष्ट्र राज्याने मला हा मान देणं खरंखरोच खूप जास्त खास आहे. “चंद्रमुखी” साठी आम्ही सगळ्यांनी एक टीम म्हणून काम केलं अगदी दिग्दर्शका पासून ते स्पॉट बॉय पर्यंत यांनी घेतलेली मेहनत ही कायम सार्थकी लागली आहे. ठिकठिकाणी या चित्रपटाला प्रेक्षकांनी दिलेलं प्रेम हे आजही दिसून येत आहे. मला एक अभिनेत्री म्हणून ओळख मिळालेली आहे.”

 

अमृता पुढे म्हणाली, ‘महाराष्ट्र राज्य पुरस्काराने सन्मानित होणं हा क्षण मी माझ्या आयुष्यात कधीच विसरणार नाही अर्थातच हा माझा पहिला वाहिला राज्य पुरस्कार आहे यातून मी फक्त ऊर्जा आणि नवनवीन दर्जेदार काम करत राहणार आहे. चांगल्या लोकांबरोबर काम करणार आणि आपली कलाकृती प्रेक्षकांपर्यंत पोहचवायची आहे. या निमित्ताने संपूर्ण ज्युरी टीमचे महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार टीमचे खूप खूप आभार त्यांनी हा क्षण माझ्या आयुष्यात आणला माझं कामाचं कौतुक करून हा खास पुरस्कार मला दिला या बद्दल मी कायम ऋणी राहील खूप खूप धन्यवाद.’ असे म्हणून अमृताने आपला आनंद व्यक्त केला आहे.

अनुपम खेर, मुक्ता बर्वे आणि महेश मांजरेकर यांना मिळाला महाराष्ट्र चित्रपट पुरस्कार, ‘या’ कलाकारांनाही केले सन्मानित

चंद्रमुखी सारख्या चित्रपटातील अमृताची भूमिका ही आजही प्रेक्षकांच्या मनात तितकीच घर करून आहे आणि म्हणून तिच्यासाठी हा चित्रपट देखील तेवढाच खास आहे. आजवर अमृताने वैविध्यपूर्ण आव्हानात्मक भूमिका साकारल्या आणि त्या आजही प्रेक्षकांना तितक्याच भावत आहेत. येणाऱ्या काळात अमृता अनेक दर्जेदार भूमिका मधून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तिच्या नवनव्या भूमिका आणि चित्रपट पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

Web Title: Amruta khanvilkar won her first state film award expressing happiness and saying my maharashtra has given me

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 06, 2025 | 01:49 PM

Topics:  

  • Amruta Khanvilkar
  • entertainment
  • marathi cinema

संबंधित बातम्या

‘सन मराठी’वर लवकरच सुरु होणार दोन अनोळखी व्यक्तींचा एकत्र प्रवास; ‘तू अनोळखी तरी सोबती’ नवी मालिका रिलीज
1

‘सन मराठी’वर लवकरच सुरु होणार दोन अनोळखी व्यक्तींचा एकत्र प्रवास; ‘तू अनोळखी तरी सोबती’ नवी मालिका रिलीज

टीव्हीनंतर आता ईशा मालवीयचे मोठ्या पडद्यावर पदार्पण, हाती लागला पंजाबी चित्रपट; दिसणार रोमँटिक अंदाजात
2

टीव्हीनंतर आता ईशा मालवीयचे मोठ्या पडद्यावर पदार्पण, हाती लागला पंजाबी चित्रपट; दिसणार रोमँटिक अंदाजात

‘सगळी भीती आणि दुःख संपले आहे…’, गोविंदा आता लवकरच करणार Comeback; म्हणाला ‘हिरो नंबर वन येत आहे..’
3

‘सगळी भीती आणि दुःख संपले आहे…’, गोविंदा आता लवकरच करणार Comeback; म्हणाला ‘हिरो नंबर वन येत आहे..’

Worldwide Collection: ‘Dhurandhar’ चे जगभरात बॉक्स ऑफिसवर वर्चस्व, आता ‘जवान’ चित्रपटालाही देणार टक्कर
4

Worldwide Collection: ‘Dhurandhar’ चे जगभरात बॉक्स ऑफिसवर वर्चस्व, आता ‘जवान’ चित्रपटालाही देणार टक्कर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.