Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bhai Khulawalo Song: मालवणी ठसका अन् कोकणी-गोवन संगीताचा तडका; नितीश-रुचिराचं नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

Bhai Khulawalo Song: नितीश चव्हाण आणि रुचिरा जाधवच्या ‘भाई खुळावलो’ गाण्यात मालवणी ठसका, मिश्कील अंदाज आणि प्रेमात पडलेल्या भाईची भन्नाट कहाणी पाहायला मिळते.

  • By अमृता यादव
Updated On: Oct 01, 2026 | 04:09 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Bhai Khulawalo Song: मालवणी भाषेचा खट्याळपणा, कोकणी-गोवन संगीताचा साज आणि प्रेमात पडलेल्या एका गावठी ‘भाई’ची मजेशीर कहाणी यांचा भन्नाट मिलाफ असलेलं ‘भाई खुळावलो’ हे नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. पूर्वा म्युझिक प्रस्तुत आणि सेव्हन सीज मोशन पिक्चर्स निर्मित या गाण्यात अभिनेता नितीश चव्हाण आणि अभिनेत्री रुचिरा जाधव प्रमुख भूमिकेत आहेत. गाणं प्रदर्शित होताच सोशल मीडियावर त्याची चर्चा रंगली आहे.

मालवणी भाषेत रंगली प्रेमकहाणी

‘भाई खुळावलो’ या गाण्यात प्रेमात पडलेल्या एका गावातील भाईची गंमतीदार कहाणी पाहायला मिळते. सुरुवातीला या गाण्याचे बोल मराठीत तयार करण्यात आले होते. मात्र, गाण्याला वेगळा आणि हटके टच देण्यासाठी त्याला मालवणी भाषेचा रंग देण्यात आला.

‘खुळावलो’ हा मालवणी भाषेतील शब्द या व्यक्तिरेखेला आणि गाण्याच्या कथेला अगदी योग्य वाटल्याने संपूर्ण गाणं मालवणी भाषेत साकारण्यात आलं आहे. मालवणी आणि कोकणी लोकसंगीतासोबत गोवन संगीताची झलकही गाण्यात पाहायला मिळते.

अकापेला पद्धतीने संगीताची सुरुवात

गाण्याचं संगीत आणि दिग्दर्शन प्रीतीश प्रकाश कामत यांनी केलं आहे. विशेष म्हणजे गाण्याच्या संगीतनिर्मितीची सुरुवात अकापेला पद्धतीने करण्यात आली. केवळ वोकल्सच्या माध्यमातून संगीताचा बेस तयार करण्यात आला आणि त्यानंतर त्यात विविध वाद्यांचा समावेश करण्यात आला.

गायक नागेश मुरवेकर यांच्या खट्याळ आणि मिश्कील आवाजामुळे गाण्याला अस्सल मालवणी रंग मिळाला आहे. स्थानिक फोक आणि तारकर्लीच्या वातावरणाशी जुळणारी संगीताची खास वाईब गाण्यात ऐकायला मिळते.

रुचिरा जाधवला समुद्राची भीती, तरीही केलं शूटिंग

गाण्याच्या चित्रीकरणादरम्यानचा एक मजेशीर किस्सा रुचिरा जाधवने सांगितला. कोकणात शूटिंग होणार असल्याने ती उत्सुक होती. मात्र, शूटिंगदरम्यान समुद्रात बुडण्याचा सीन असल्याचं समजताच तिची चिंता वाढली.

रुचिराला आधीपासूनच पाण्याची भीती असल्याने तिने ही गोष्ट टीमला सांगितली. त्यानंतर प्रोडक्शन टीमने आवश्यक सुरक्षा व्यवस्था आणि लाइफसेव्हर्सची व्यवस्था केली. त्यामुळे तिने हा सीन यशस्वीपणे पूर्ण केला.

विशेष म्हणजे या सीनमध्ये दिसणारे तिचे हावभाव खरे असल्याचं तिने सांगितलं. सकाळी ८ वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजेपर्यंत सुरू असलेल्या या शूटमध्ये नितीश, रुचिरा आणि संपूर्ण टीमने भरपूर धमाल केली.

 

मालवण आणि तारकर्लीत गाण्याचं चित्रीकरण

‘भाई खुळावलो’चं चित्रीकरण मालवण आणि तारकर्ली परिसरात करण्यात आलं आहे. MTDC, तारकर्ली आणि सोलकढी रेस्टॉरंट अशा ठिकाणांचा व्हिडिओमध्ये विशेष वापर करण्यात आला आहे.

नितीश चव्हाणच्या नृत्यालाही गाण्यात विशेष महत्त्व देण्यात आलं असून पुण्यकर उपाध्याय यांनी कोरिओग्राफी केली आहे. मालवणी संवाद, रंगतदार संगीत, नृत्य आणि कोकणातील सुंदर लोकेशन्स यामुळे गाण्याचा व्हिडिओ अधिक आकर्षक झाला आहे.

Drishyam 3 Cast Fees: अजय देवगणच्या मानधनाचा आकडा पाहून व्हाल थक्क! तब्बू आणि रजत कपूरची फी किती

गाण्यामागे मोठी टीम

‘भाई खुळावलो’चे गीतकार सचिन कोतुळकर, अरेंजर उदय साळवी, फिमेल व्होकल्स प्राजक्ता माने आहेत. कोरससाठी गोविंद कांबळे, विपुल कदम, श्रीकांत शिरसाट आणि प्रीतीश कामत यांनी योगदान दिलं आहे. रूपक ठाकूर यांनी मिक्सिंग आणि मास्टरिंग केलं आहे.

व्हिडिओचं दिग्दर्शन आणि एडिटिंग प्रीतीश प्रकाश कामत यांनी, तर छायांकन आणि कलरिंग शशि उपाध्याय यांनी केलं आहे. प्रॉडक्शन डिझाइनची जबाबदारी प्रवीण चिंदरकर आणि त्यांच्या टीमने सांभाळली आहे.

मालवणी भाषेतील मिश्कील अंदाज, कोकणी-गोवन संगीत, नृत्य आणि प्रेमात पडलेल्या ‘भाई’ची भन्नाट कहाणी यामुळे ‘भाई खुळावलो’ हे गाणं सध्या प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे. सोशल मीडियावरही या गाण्याची चर्चा पाहायला मिळत आहे.

Ayushmann Khurrana: सात चित्रपट, सात नवे दिग्दर्शक; आयुष्मान खुरानाची हटके काम करण्याची पद्धत चर्चेत

Web Title: Bhai khulawalo song nitish chavan ruchira jadhav

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 01, 2026 | 04:09 PM

Topics:  

  • entertainment
  • marathi movie
  • New Song

संबंधित बातम्या

Ayushmann Khurrana: सात चित्रपट, सात नवे दिग्दर्शक; आयुष्मान खुरानाची हटके काम करण्याची पद्धत चर्चेत
1

Ayushmann Khurrana: सात चित्रपट, सात नवे दिग्दर्शक; आयुष्मान खुरानाची हटके काम करण्याची पद्धत चर्चेत

Drishyam 3 Cast Fees: अजय देवगणच्या मानधनाचा आकडा पाहून व्हाल थक्क! तब्बू आणि रजत कपूरची फी किती
2

Drishyam 3 Cast Fees: अजय देवगणच्या मानधनाचा आकडा पाहून व्हाल थक्क! तब्बू आणि रजत कपूरची फी किती

Afratafri Marathi Movie: ग्लॅमर, मस्ती आणि भन्नाट ठेका! ‘अफरातफरी’मधील ‘होऊन जाऊ दे’ गाणं रिलीज
3

Afratafri Marathi Movie: ग्लॅमर, मस्ती आणि भन्नाट ठेका! ‘अफरातफरी’मधील ‘होऊन जाऊ दे’ गाणं रिलीज

Koffee With Karan: ‘वन लास्ट टाइम!’ २२ वर्षांनंतर ‘कॉफी विद करण’ला निरोप; शेवटच्या सीझनची घोषणा करताना करण जोहर भावुक
4

Koffee With Karan: ‘वन लास्ट टाइम!’ २२ वर्षांनंतर ‘कॉफी विद करण’ला निरोप; शेवटच्या सीझनची घोषणा करताना करण जोहर भावुक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.