
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
अभिनेता शशांक केतकर आणि निर्माते, दिग्दर्शक मंदार देवस्थळी यांच्यातील वाद आणखी वाढला आहे. चार वर्ष पाठपुरावा करूनही मंदार यांनी शशांकला त्याच्या मालिकेचे पैसे दिले नाहीत. ‘हे मन बावरे’ या मालिकेचे थकलेले पैसे अद्याप न दिल्यानं शशांकने पोलिसांत दिग्दर्शकाची तक्रार केली आहे. अभिनेता शशांक केतकर अनेक दिवसांपासून त्यांच्याकडे त्याच्या कामाच्या पैसाची मागणी करत आहे. शशांक केतकरने सोशल मीडियावर या सगळ्यांचे माहिती देखील चाहत्यांना दिली आहे.
शशांकने शेअर केलेल्या व्हिडीओनंतर मराठी इंडस्ट्रीतील अनेक कलाकार मंडळी पुढे आली. मराठी कलाकारांनी त्यांचीही अशाच प्रकारे फसवणूक झाल्याचे त्यांनी सांगितले, आणि शशांकला पाठींबा दिला. इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनी शशांकचे म्हणणे खरे असल्याचे पुष्टी केली. अनेक कलाकारांनी त्यांच्याबरोबर झालेला संपूर्ण प्रकारही सांगितला आहे. शशांकच्या व्हिडीओखालील कमेंट सेक्शन कलाकारांच्या प्रतिक्रियेने भरून गेले. अशातच सोशल मिडिया इन्फ्लूएन्सर आणि बिग बॉस मराठी 5 ची स्पर्धक अंकिता वालावालकर हिनं केलेली कमेंट देखील चर्चेत आली आहे.
अंकिताच्या नवऱ्याची देखील अशीच फसवणूक झाल्याचे आता समोर आले आहे. शशांकच्या व्हिडीओवर अंकितानं कमेंट करत तिचा नवरा कुणाल भगत याला टॅग करता कंमेंट केली आहे. अभिनेत्रीने लिहिले, “कुणाल तुझे ज्यांनी पैसे डुबवलेत त्यांची नावं लिहू का रे मी इथे?” अंकिताची ही कमेंट चर्चेत आली आहे. तिच्या या कमेंटवर अनेकांनी तिला बिनधास्त नावं लिही असं सांगितलं आहे. या कमेंटवरून हे लक्षात येतं अंकिताचा नवरा कुणाल भगत याचेही पैसे थकीत आहेत.
‘एक नंबर बिनडोक, फाल्तूपणा थांबवा’, समर राजवाडेवर प्रेक्षकांचा राग अनावर; प्रोमो पाहून टीकेचा भडिमार
अंकिताचा नवरा कुणाल भगत हा प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक आहे. त्यानं अनेक मराठी मालिका आणि सिनेमांसाठी काम केलं आहे. शशांकसारखीच त्याचीही परिस्थिती असल्याचं अंकिताच्या कमेंटवरून लक्षात येत आहे. कुणाल भगत अनेक ठिकाणी म्युझिक डायरेक्टर म्हणून काम करतोय, त्याने अनेक म्युझिक अल्बमसाठीही काम केलं आहे. पण अनेकांनी त्याला देखील पैसे दिले नाहीत तसंच त्याचेही पैसे डुबवलेत.
‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वातून घराघरात पोहोचलेली अंकिता वालावलकर सातत्याने चर्चेत येत असते. कोकण हार्टेड गर्ल या नावाने ओळखली जाणारी अंकिता चाहत्यांमध्ये सुद्धा खूप प्रसिद्ध आहे. ‘बिग बॉस’ नंतर ती कोकणातील कुडाळ येथे पारंपरिक पद्धतीने लग्न करून ती विवाहबंधनात अडकली. तिच्या लग्नाचीही सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली होती. अंकिताने सोशल मीडियावर पती कुणाल भगतसाठी रोमॅन्टिक पोस्ट शेअर केले होते.