(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
झी मराठीवरील तेजश्री प्रधान आणि सुबोध भावेची मालिका वीण दोघातील ही तुटेना ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. हे दोघं ही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहेत. सध्या वीण दोघातील ही तुटेना मालिकेत एकापाठोपाठ एक ट्वीस्ट पाहायला मिळत आहेत. मालिकेत अनेक ट्विस्ट येत असतात पण आता या मालिकेचा नवीन प्रोमो पाहून प्रेक्षकांनी संताप व्यक्त केला आहे. स्वानंदी आणि समरचं लग्न झाल्यापासून राजवाडेंच्या घरात कारस्थानांची मालिकाच सुरू झाली आहे.
या नवीन प्रोमोमध्ये दाखवण्यात आले आहे, अंशुमन राजवाडेंच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या श्वेताला अश्लील मेसेज पाठवतो. हे सगळं श्वेता स्वानंदीला सांगते.स्वानंदी, श्वेताला समरकडे घेऊन जाते आणि तिला अंशुमनची तक्रार करायला सांगते. मात्र श्वेता घाबरते आणि त्याच्या भितीपोटी समरसमोर खोटं सांगते.मला स्वानंदीने अंशुमनचं नाव घ्यायला सांगितलं, असं श्वेता सांगते. त्यामुळे समर आणि स्वानंदीमध्ये गैरसमज होतो. मात्र स्वानंदी अजिबातच हार मानत नाही. ती श्वेता आणि निकिताच्या मदतीने अंशुमनचा खरा चेहरा सर्वांसमोर आणण्याचा निर्णय घेते. त्यात ती श्वेता आणि निकीताची समजूत काढण्याचं ठरवते.
अशातच आता झी मराठी वाहिनीने वीण दोघांतली ही तुटेना मालिकेचा प्रोमो शेअर केला असून त्यावर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया देत मालिकेवर संताप व्यक्त केला आहे.मालिकेच्या प्रोमोमध्ये मल्लिका छातीत दुखत असल्याचं नाटक करते. समरची बहिण अर्पिता यासगळ्याचा दोष स्वानंदीला देते आणि म्हणते, तुझ्यामुळे माझ्या मम्माची तब्येत बिघडली आहे. प्रत्येकवेळेला हिच्यामुळे काहीतरी कांड घरात घडत असत. घरातल्यांवर विश्वास ठेवायचे सोडून बाहेरच्यांवर विश्वास ठेवला हिने. असं म्हणत अर्पिता स्वानंदीला बाहेर काढते. यावेळी समर म्हणतो, हो कारण, त्या आपल्या कुटुंबातल्या नाहीयेत’ हे ऐकून स्वानंदीला धक्का बसतो. स्वानंदी देवासमोर म्हणते,ह्या कुटुंबात मी माझी जागा निर्माण करेन आणि सत्यही सर्वांन समोर आणेण. ”
मालिकेत हा एपिसोड रिलीज झाल्यानंतर चाहत्यांकडून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. नेटकऱ्यांनी समर राजवाडेला बावळट म्हटलंय, तर काहींनी समर राजवाडे बावळट असल्याचंही म्हटलंय. नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर मालिकेचा चांगलाच समाचार घेतलाय. ‘झी मराठीला टीआरपी कमी होऊ नये असं वाटत असेल तर, हे सगळं थांबवायला पाहिजे’, असं एका युजरनं म्हटलंय. तर आणखी एका युजरनं ‘फालतुगिरी’, अशी कमेंट करत एकाच शब्दात विषय संपवला आहे.अशा अनेक कमेंट्स प्रेक्षकांनी या प्रोमोवर केल्या आहेत.






