Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आपली संस्कृती, आपला इतिहास! ‘असुरवन’ चित्रपटातून आदिवासी वारली संस्कृतीचे दर्शन, दिग्दर्शक म्हणतात…

सचिन आंबात दिग्दर्शित ‘असुरवन’ चित्रपटातून चित्तथरारक वारली संस्कृतीचे दर्शन रसिक प्रेक्षकांना घडणार आहे. चला या चित्रपटाबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Dec 03, 2025 | 09:28 PM
‘असुरवन’ चित्रपटातून आदिवासी वारली संस्कृतीचे दर्शन

‘असुरवन’ चित्रपटातून आदिवासी वारली संस्कृतीचे दर्शन

Follow Us
Close
Follow Us:
  • ‘असुरवन’ चित्रपटातून आदिवासी वारली संस्कृतीचे दर्शन
  • सचिन आंबात यांचे दिग्दर्शन
  • येत्या 5 डिसेंबरला चित्रपट होणार प्रदर्शित
महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील हमरापूर (आंबातपाडा) येथून आलेले तरुण दिग्दर्शक सचिन रामचंद्र आंबात आपल्या आदिवासी वारली संस्कृतीचा अभिमान आपल्या आगामी ‘असुरवन’ या मराठी चित्रपटातून संपूर्ण महाराष्ट्रापर्यंत पोहोचवत आहेत. महाराष्ट्राच्या लाल मातीच्या पार्श्वभूमीवर चित्रित झालेला हा चित्रपट 5 डिसेंबर रोजी राज्यभर प्रदर्शित होत आहे.

स्वप्नस्वरूप प्रस्तुत या बहुप्रतिक्षित चित्रपटाचे मोशन पोस्टर, टीझर आणि ट्रेलर सोशल मीडियावर प्रदर्शित झाल्यापासूनच प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. पोस्टरवरील वाघाच्या प्रतिमेने सजलेला मुखवटा, घनदाट जंगलाचे अद्भुत सौंदर्य आणि आदिवासी वारली संस्कृतीची उपस्थिती यामुळे चित्रपटाबद्दलची उत्कंठा आणखी वाढली आहे.

Mrs Deshpande Trailer रिलीज; Madhuri Dixitच्या रहस्यमय भूमिकेची सोशल मीडियावर जोरदार चर्चा

दिग्दर्शक सचिन आंबात सांगतात,”असुरवन हे माझ्या वडिलांचे स्वप्न आहे. आमची वारली संस्कृती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावी, जतन व्हावी, यासाठी मी हा चित्रपट करण्याचा निर्णय घेतला. माझा भाऊ सागर रामचंद्र आंबात कार्यकारी निर्माता म्हणून संपूर्ण प्रकल्पात माझ्या पाठीशी ठामपणे उभा राहिला. मोशन पोस्टर आणि ट्रेलरवर प्रेक्षकांनी दिलेला प्रतिसाद अतिशय उत्साहवर्धक आहे.”

शूटिंग लोकेशनबद्दल सचिन आंबात सांगतात, “असुरवनचे संपूर्ण चित्रीकरण घनदाट जंगलात करण्यात आले आहे. ठाणे जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील विविध आदिवासी पाडे, बदलापूर येथील बोहोनोली गाव तसेच अंबरनाथमधील गोरपे गाव येथे शूटिंग झाले आहे. तसेच वारली संस्कृतीचे वारस सांगणारे एक प्राचीन मंदिरही चित्रपटात पाहायला मिळेल.

महिला दिनी उलगडणार ‘तिघीं’च्या आयुष्यातलं ‘चौथं पान’, ‘तिघी’ चित्रपटाचं नवीन पोस्टर रिलीज

कशी असेल कथा?

कथानकाविषयी सांगताना दिग्दर्शक म्हणतात, “वारली संस्कृती ही निसर्गाशी घट्ट जोडलेली संस्कृती आहे. ते निसर्गालाच देव मानतात. त्यांचे जीवन, रहाणीमान आणि खाद्यसंस्कृती, हे सर्व काही निसर्गाभोवतीच फिरते. जंगलाचे रक्षण करण्यासाठी ते ‘फिरसत्या’ किंवा जंगलरक्षक देवाला पुजतात. वाघोबा देवाला ते जंगलाचा राजा मानतात. वारली संस्कृतीतील ‘रवाळ’ हा दोन-तीन दिवस चालणारा पारंपरिक खेळ यात विशेष महत्वाचा. यात वाघाच्या मुखवट्यांसह नृत्य केले जाते, जे त्यांच्या दैवी शक्तीचे प्रतीक मानले जाते.”

ते पुढे सांगतात, “मराठी चित्रपटसृष्टीत प्रथमच शापित जंगलाची, सस्पेन्स आणि थ्रिलरने परिपूर्ण अशी कथा आम्ही घेऊन आलो आहोत. प्रेक्षकांना हा भावनिक, सांस्कृतिक आणि रहस्यमय अनुभव नक्कीच भावेल याची मला खात्री आहे. सर्व रसिकांना विनंती आहे की त्यांनी ५ डिसेंबरला ‘असुरवन’ चित्रपट थिएटरमध्ये जाऊन जरूर पाहावा.”

Web Title: Asurvan marathi movie based on varli cultural releasing on 5 december 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 03, 2025 | 09:27 PM

Topics:  

  • entertainment
  • marathi movie

संबंधित बातम्या

‘केसात गजरा, डोळ्यात प्रेम…’ लाल साडीत खुलून दिसले समांथाचे सौंदर्य; पाहा Bridal Look
1

‘केसात गजरा, डोळ्यात प्रेम…’ लाल साडीत खुलून दिसले समांथाचे सौंदर्य; पाहा Bridal Look

महिला दिनी उलगडणार ‘तिघीं’च्या आयुष्यातलं ‘चौथं पान’, ‘तिघी’ चित्रपटाचं नवीन पोस्टर रिलीज
2

महिला दिनी उलगडणार ‘तिघीं’च्या आयुष्यातलं ‘चौथं पान’, ‘तिघी’ चित्रपटाचं नवीन पोस्टर रिलीज

Happy Patel : आमिर खानने केली आगामी चित्रपटाची घोषणा, ‘हा’ अभिनेता दिसणार मुख्य भूमिकेत
3

Happy Patel : आमिर खानने केली आगामी चित्रपटाची घोषणा, ‘हा’ अभिनेता दिसणार मुख्य भूमिकेत

भारती आणि हर्षने साजरी केली लग्नाची 8th Anniversary; क्युट बेबी बंप फ्लॉन्ट करत, शेअर केले कुटुंबासह Photos
4

भारती आणि हर्षने साजरी केली लग्नाची 8th Anniversary; क्युट बेबी बंप फ्लॉन्ट करत, शेअर केले कुटुंबासह Photos

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.