Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महाराष्ट्रातील वारली संस्कृतीचं चित्तथरारक दर्शन घडणार, ‘असुरवन’चा थरारक टीझर प्रदर्शित!

'असुरवन’चा थरारक टीझर प्रदर्शित झाला असून या टीझरमधील थरारक दृश्यांनी सगळ्याचं लक्ष वेधून घेतले आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Nov 08, 2025 | 12:55 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

स्वप्नस्वरूप प्रस्तुत आणि सचिन आंबात लिखित-दिग्दर्शित बहुप्रतिक्षित ‘असुरवन’ या आगामी मराठी चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित होताच सोशल मीडियावर प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय ठरले. त्यानंतर नुकताच या चित्रपटाचा चित्तथरारक टीझर प्रदर्शित झाला असून त्याने उत्सुकता शिगेला पोहोचवली आहे.

‘कांतारा’ आणि ‘दशावतार’ यासारख्या स्थानिक संस्कृतीवर आधारित चित्रपटांप्रमाणेच ‘असुरवन’ हा महाराष्ट्राच्या मातीत रुजलेला चित्रपट आहे. कमी कालावधीतच ‘असुरवन’ चित्रपटाने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. वाघाच्या चित्राने रंगवलेला मुखवटा, अद्भुत जंगल आणि आदिवासी संस्कृतीची सांगड तसेच बॅकग्राउंड संगीतामुळे या सगळ्यातून चित्रपटात नेमकं काय पहायला मिळणार याची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.


Movie Trailer: ‘लास्ट स्टॉप खांदा’तून उलगडणार प्रेमाचा इमोशनल कॉमेडी ड्रामा, चित्रपटाचा दमदार ट्रेलर प्रदर्शित

सचिन आंबात लिखित व दिग्दर्शित ‘असुरवन’ हा चित्रपट आदिवासी प्राचीन वारली परंपरा आणि रहस्यमय पार्श्वभूमी यांचं मिश्रण आहे. जसा पोस्टरमधील चेहरा प्रेक्षकांना अस्वस्थ करतोय, तसंच टीजर मधील खबर कलली का ? हा डायलॉग मात्र त्याचवेळी उत्सुकता देखील निर्माण करतोय. आपल्या भव्य मांडणीने आणि गूढ वातावरणाने टीझर प्रेक्षकांना खिळवून ठेवतो.

स्वप्नस्वरूप प्रस्तुत ‘असुरवन’ चित्रपटाचे दिग्दर्शक आणि लेखक सचिन आंबात आहेत. तसेच या चित्रपटात विश्वास पाटील, सुरज नेवरेकर, दीप्ती धोत्रे, अनुज ठाकरे, सचिन चांदवडे, विपुल साळुंखे, विनायक चव्हाण, पूजा मौली, मयूरेश जोशी, रोहिणी थोरात, हर्षद वाघमारे, सिद्धेश शिंदे, विशाल साठे, संदीप पाटील, सूरज परब, योगिता पाखरे, योगेश शेडगे, प्रणव दळवी, तनिषा जाधव, निकिता मेस्त्री, व्यंकटेश गावडे, श्याम सावंत, सनी जाधव, कल्पेश डुकरे, मनोज कदम यांच्या प्रमुख भूमिका आहेत. येत्या ५ डिसेंबर रोजी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Bigg Boss 19 : भैया की सैया…सलमानने तान्या मित्तलला केले एक्सपोझ! अमाल मलिकला नॉमिनेट करण्याच्या योजनेबद्दल सल्लूने फटकारले

चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक सचिन आंबात चित्रपटाच्या टीजरविषयी म्हणतात, “‘असुरवन’ हा चित्रपट महाराष्ट्राच्या मातीतील परंपरेचे आणि श्रद्धेचे दर्शन आहे. “असुरवन” महाराष्ट्रातील श्रद्धा, जंगल, डोंगर, गूढता आणि परंपरा यांचं प्रतिबिंब दाखवणार आहे. आमचं उद्दिष्ट हेच होतं की ही माती, हे जंगल, हा रंग आणि ही ऊर्जा पडद्यावर जिवंत करायची. मराठी चित्रपटात असा प्रयत्न कदाचित पहिल्यांदाच झाला असावा. त्यामुळे माझी सर्व रसिक प्रेक्षकांना विनंती आहे की त्यांनी हा चित्रपट ५ डिसेंबरला आपल्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन नक्की बघावा.”

या चित्रपटाच्या टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून या टीझरमधील थरारक दृश्यांनी सगळ्याचं लक्ष वेधून घेतले आहे.

Web Title: Asurvan movie teaser released watch video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 08, 2025 | 12:55 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • marathi cinema
  • marathi movie

संबंधित बातम्या

Movie Trailer: ‘लास्ट स्टॉप खांदा’तून उलगडणार प्रेमाचा इमोशनल कॉमेडी ड्रामा, चित्रपटाचा दमदार ट्रेलर प्रदर्शित
1

Movie Trailer: ‘लास्ट स्टॉप खांदा’तून उलगडणार प्रेमाचा इमोशनल कॉमेडी ड्रामा, चित्रपटाचा दमदार ट्रेलर प्रदर्शित

तेजश्री प्रधानची पोस्ट चर्चेत; फोटो शेअर करत नवीन भूमिकेचे नाव केले उघड
2

तेजश्री प्रधानची पोस्ट चर्चेत; फोटो शेअर करत नवीन भूमिकेचे नाव केले उघड

‘असंभव’मध्ये सचित पाटील झळकणार तिहेरी भूमिकेत, प्रिया आणि मुक्ता देखील दिसणार मुख्य भूमिकेत
3

‘असंभव’मध्ये सचित पाटील झळकणार तिहेरी भूमिकेत, प्रिया आणि मुक्ता देखील दिसणार मुख्य भूमिकेत

Michael Teaser: पुन्हा परतला पॉप स्टार! मायकेल जॅक्सनच्या डान्सची दिसणार झलक
4

Michael Teaser: पुन्हा परतला पॉप स्टार! मायकेल जॅक्सनच्या डान्सची दिसणार झलक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.