Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘असंभव’मध्ये सचित पाटील झळकणार तिहेरी भूमिकेत, प्रिया आणि मुक्ता देखील दिसणार मुख्य भूमिकेत

‘असंभव’ हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तसेच हा चित्रपट सचित पाटील दिग्दर्शित करत आहेत. तसेच या चित्रपटामध्ये अनेक कलाकार काम करताना दिसणार आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Nov 07, 2025 | 03:56 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • ‘असंभव’मध्ये सचित पाटील झळकणार तिहेरी भूमिकेत
  • प्रिया आणि मुक्ता देखील दिसणार मुख्य भूमिकेत
  • ‘असंभव’ चित्रपट कधी होणार प्रदर्शित
मराठी चित्रपटसृष्टीतील एक बहुआयामी, प्रभावी आणि दर्जेदार अभिनेता म्हणून आपली ओळख निर्माण करणारा सचित पाटील आता प्रेक्षकांसाठी एक वेगळा अनुभव घेऊन येत आहे. ‘असंभव’ या थरारक आणि रहस्यमय चित्रपटातून सचित पाटील पहिल्यांदाच तिहेरी भूमिकेत झळकणार आहे. तसेच अभिनेता निर्माता, दिग्दर्शक आणि नवीन भूमिकेत या तिन्ही जबाबदाऱ्या तो एकाचवेळी सांभाळता दिसणार आहे. तसेच हा चित्रपट पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.

‘साडे माडे तीन’, ‘क्षणभर विश्रांती’, ‘झेंडा’, ‘अर्जुन’, ‘क्लासमेट्स’, ‘फ्रेंड्स’ सारख्या चित्रपटांमधून तसेच ‘राधा प्रेम रंगी रंगली’ आणि ‘अबोली’ या मालिकांमधून सचितने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर खोल ठसा उमटवला आहे. ‘साडे माडे तीन’ आणि ‘क्षणभर विश्रांती’ या चित्रपटांचे दिग्दर्शन करून त्याने आपल्या सर्वगुणसंपन्नतेचा ठसा आधीच उमटवला होता. आता ‘असंभव’मधून तो एका नव्या रूपात, नव्या जबाबदारीत आणि नव्या आव्हानासह परतला आहे.

Indian Idol ग्रँड प्रीमियर, श्रेया घोषाल आणि जसपिंदर नरुलाने २३ वर्षांनंतर गायले ‘मोर पिया’

काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘असंभव’च्या टीझरने प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण केली आहे. रहस्य आणि थरार यांच्या उत्तम मेळ असलेला हा चित्रपट प्रेक्षकांना एक वेगळाच अनुभव देणार असल्याचे दिसतेय. या चित्रपटामध्ये तगडी स्टारकास्ट देखील दिसणार आहे. तसेच या चित्रपटामध्ये मराठीमधील उत्कृष्ट अभिनेत्री प्रिया बापट आणि मुक्त बर्वे या दोन्ही अभिनेत्री पुन्हा एकत्र दिसणार आहेत.

आपल्या या अनुभवाबद्दल अभिनेता सचित पाटील म्हणाला, “एकाच वेळी निर्मिती, दिग्दर्शन आणि अभिनय या तिन्ही भूमिका निभावणं, ही माझ्या आयुष्यातली मोठी परीक्षा होती. ज्यावेळी कपिल भोपटकर यांनी ही कथा मला ऐकवली, त्याक्षणी हा चित्रपट पडद्यावर आणणं हाच माझा ध्यास बनला. तिहेरी भूमिकेतील प्रत्येक जबाबदारी एकमेकांपेक्षा वेगळी आहे. या जबाबदाऱ्या साकारताना मी स्वतःलाही नव्यानं शोधलं. ही संपूर्ण प्रक्रिया मला सकारात्मक अनुभव देणारी होती आणि या सगळ्या प्रवासात मला मोलाची साथ लाभली ती माझ्या जीवलग मित्राची म्हणजेच नितीन प्रकाश वैद्यची.’

अभिनेता पुढे म्हणाला, ‘त्याने माझ्यावर ठेवलेल्या विश्वासामुळेच मी या तिहेरी भूमिका यशस्वीपणे पार पाडू शकलो आणि आम्ही दोघं मिळून मुंबई पुणे फिल्म्स एंटरटेनमेंटची स्थापना करू शकलो. माझ्या टीमचा माझ्यावरील विश्वास, त्यांच्या प्रामाणिक प्रयत्नांमुळेच ‘असंभव’चा हा प्रवास शक्य झाला. मला खात्री आहे, हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात ठसा उमटवेल.’

Zarine Katrak: सुझान खानच्या आईचे निधन; शबाना- सबासह अनेक कलाकारांनी व्यक्त केला शोक, कधी होणार अंत्यसंस्कार ?

‘असंभव’चे दिग्दर्शन सचित पाटील यांनी तर सह दिग्दर्शन पुष्कर श्रोत्री यांनी केलं आहे. या चित्रपटात मराठीतील चार नामवंत कलाकार सचित पाटील, मुक्ता बर्वे, प्रिया बापट आणि संदीप कुलकर्णी पहिल्यांदाच एकत्र झळकणार आहेत. या चौघांच्या अभिनयाची जुगलबंदीच या चित्रपटाचे मोठे आकर्षण ठरणार आहे.

‘मुंबई पुणे फिल्म्स एंटरटेनमेंट’चे सचित पाटील आणि नितीन प्रकाश वैद्य हे चित्रपटाचे निर्माते असून, एरिकॉन टेलिफिल्म्सच्या शर्मिष्ठा राऊत, तेजस देसाई आणि पी अँड पी एंटरटेनमेंटचे मंगेश परुळेकर आणि संजय पोतदार हे सहनिर्माते आहेत. रहस्य, भावना आणि नात्यांच्या गाठींच्या थरारात प्रेक्षकांना गुंतवून ठेवणारा ‘असंभव’ हा चित्रपट २१ नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Web Title: Sachit patil will be seen in a triple role in the film asambhaav the film will be released on november 21st

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 07, 2025 | 03:56 PM

Topics:  

  • entertainment
  • marathi film
  • marathi movie

संबंधित बातम्या

Spirit First Look: जखमी प्रभास अन् तृप्तीच्या हातात लायटर…, ‘अ‍ॅनिमल’ पेक्षाही खतरनाक ‘स्पिरिट’!
1

Spirit First Look: जखमी प्रभास अन् तृप्तीच्या हातात लायटर…, ‘अ‍ॅनिमल’ पेक्षाही खतरनाक ‘स्पिरिट’!

अर्जुन बिजलानीच्या सासऱ्यांची बिघडली तब्येत, ICU मध्ये दाखल; दुबई ट्रिप अर्ध्यात सोडून पत्नीसह परतला अभिनेता
2

अर्जुन बिजलानीच्या सासऱ्यांची बिघडली तब्येत, ICU मध्ये दाखल; दुबई ट्रिप अर्ध्यात सोडून पत्नीसह परतला अभिनेता

‘Ikkis’मधील भारत-पाकिस्तान संवादावर CBFC ची कात्री, अनेक सीन कट केल्यानंतर मिळाले U/A प्रमाणपत्र
3

‘Ikkis’मधील भारत-पाकिस्तान संवादावर CBFC ची कात्री, अनेक सीन कट केल्यानंतर मिळाले U/A प्रमाणपत्र

1100 कोटींची कमाई करूनही ‘धुरंधर’ला बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींचा तोटा, डिस्ट्रीब्यूटरने सांगितले कारण
4

1100 कोटींची कमाई करूनही ‘धुरंधर’ला बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींचा तोटा, डिस्ट्रीब्यूटरने सांगितले कारण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.