Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला, “रुबाब” डिजिटल प्रीमियरसाठी सज्ज; ‘या’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येणार चित्रपट

मराठी ZEE5 घेऊन येत आहे दमदार हिट चित्रपट "रुबाब". शेखर बापू राणखांबे दिग्दर्शित आणि झी स्टुडिओज व झंकार फिल्म्स यांच्या सहयोगाने निर्मित या चित्रपटात संभाजी ससाणे आणि शीतल पाटील प्रमुख भूमिकेत आहेत.

  • By अमृता यादव
Updated On: Apr 03, 2026 | 03:40 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

यंदा थिएटरमध्ये प्रेक्षकांचा उत्साह जिंकल्यानंतर, ‘रुबाब’ आता डिजिटल प्रीमियरसह अधिक लोकांपर्यंत पोहोचण्यास तयार आहे. लवकरच मराठी zee 5 वर चित्रपट पाहता येणार आहे. हा चित्रपट प्रेम, नाट्य आणि भावना यांचा सुंदर संगम आहे आणि स्वाभिमान, नातेसंबंध आणि आयुष्यात घेण्यात येणाऱ्या महत्त्वाच्या निर्णयांची कथा सांगतो. चित्रपटाची मुख्य गोष्ट सूरज आणि वैशाली यांच्या आयुष्याभोवती फिरते. हे दोघे ठाम स्वभावाचे आहेत आणि प्रेमामुळे त्यांची जीवनरेषा जोडली जाते. पण त्यांच्या स्वभावातील अहंकार आणि परिस्थितीमुळे त्यांचे नाते अनेकदा आव्हानाला सामोरे जाते. चित्रपट दाखवतो की, कधी कधी अभिमान आणि अहंकार नात्यांना मजबूत बनवतात तर कधी आव्हान देतात.

प्रेम, अ‍ॅक्शन आणि भावनिक क्षणांचा समतोल साधत ‘रुबाब’ नात्यांतील चढ-उतार टिपतो आणि आत्मसन्मान व ओळखीचे महत्त्व अधोरेखित करतो.संभाजी ससाणे, शीतल पाटील, विशाल शिर्टोडे, अभिजीत साकटे आणि सिमरन खेडकर यांच्या भूमिका असलेल्या या चित्रपटाला थिएटरमध्ये त्याच्या प्रभावी कथानक आणि अभिनयासाठी चांगली दाद मिळाली. आता डिजिटल प्रीमियरमुळे ‘रुबाब’ जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार असून मराठी कथाकथनाला एक व्यापक व्यासपीठ मिळणार आहे.

ZEE5 वरील डिजिटल प्रीमियरबद्दल बोलताना, हेमां V. R., चीफ चॅनल ऑफिसर – झी मराठी आणि बिझनेस हेड – मराठी ZEE5 म्हणाल्या, “‘रुबाब’ हा नात्यांचा, आपल्या अभिमानाचा, आपण जपलेल्या प्रेमाचा आणि आपल्याला घडवणाऱ्या भावनांचा एक हृदयस्पर्शी उत्सव आहे. सांस्कृतिक पार्श्वभूमीवर आधारित ही कथा अतिशय जवळची आणि वास्तव वाटते. मराठी सिनेमाची ओळख असलेली प्रामाणिकता आणि वास्तववाद यातून दिसून येतो, आणि ही प्रभावी कथा मराठी ZEE5 द्वारे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवताना आम्हाला अभिमान वाटतो.”

दिग्दर्शक शेखर बापू राणखांबे म्हणाले, “‘रुबाब’ ही प्रेम, आत्मसन्मान आणि भावना व अहंकार यांच्यातील संघर्षात लोक कोणते निर्णय घेतात, याची कथा आहे. ही कथा खूप वास्तवातून आलेली आहे, आणि थिएटरमध्ये प्रेक्षकांनी दिलेला प्रतिसाद आमच्यासाठी खूप खास होता. आता हा चित्रपट मराठी ZEE5 वरून अधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार याचा आनंद आहे.”

अखेर चाहत्यांची प्रतीक्षा संपली! ‘पंचायत ५’ साठी व्हा सज्ज; प्राईम व्हिडिओने शेअर केली नव्या सीझनची झलक

संभाजी ससाणे म्हणाले, “सूरज ही भूमिका साकारताना खूप वेगळा अनुभव आला, कारण त्याच्यात आत्मविश्वास आणि नाजूकपणा दोन्ही आहेत. ही कथा अनेकांना स्वतःची वाटेल अशी आहे, आणि आता जागतिक स्तरावर प्रेक्षक ‘रुबाब’ पाहतील यासाठी मी उत्सुक आहे.”

शीतल पाटील म्हणाल्या “वैशाली ही एक मजबूत आणि स्वतंत्र व्यक्तिरेखा आहे, जी आपल्या मतांवर ठाम उभी राहते—आणि हेच मला या भूमिकेकडे आकर्षित झालं. ‘रुबाब’ नात्यांतील भावनिक स्तर अतिशय सुंदरपणे मांडतो, आणि या प्रवासाचा भाग होणं माझ्यासाठी खूप खास आहे.”

अंगावर रोमांच उभे करणारी झलक! ‘राजा शिवाजी’चा फर्स्ट लूक पाहताच सोशल मीडियावर जल्लोष; चाहत्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद

प्रेम, नाट्य आणि वास्तववादी कथानकाचा संगम असलेला ‘रुबाब’ सर्व वयोगटातील प्रेक्षकांसाठी एक उत्तम अनुभव ठरणार आहे.

Web Title: Audience excitement peaks rubab ready for digital premiere the film will be available on this ott platform

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 03, 2026 | 03:40 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • marathi movie
  • OTT

संबंधित बातम्या

Prasad Oak: ‘उद्धव ठाकरे माझी वाट बघत उभे होते..’, धर्मवीर’मधील भूमिकेबद्दल प्रसाद ओकने सांगितला तो खास किस्सा
1

Prasad Oak: ‘उद्धव ठाकरे माझी वाट बघत उभे होते..’, धर्मवीर’मधील भूमिकेबद्दल प्रसाद ओकने सांगितला तो खास किस्सा

Anurag Kashyap: २० वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत अनुराग कश्यपचं अफेअर; तिसऱ्या लग्नावरही केला मोठा खुलासा!
2

Anurag Kashyap: २० वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत अनुराग कश्यपचं अफेअर; तिसऱ्या लग्नावरही केला मोठा खुलासा!

Mugdha Godbole: मुग्धा गोडबोलेंच्या लेकीला पाहिलंत का? अभिनेत्रीने शेअर केले खास फोटो; लिहिली भावुक पोस्ट
3

Mugdha Godbole: मुग्धा गोडबोलेंच्या लेकीला पाहिलंत का? अभिनेत्रीने शेअर केले खास फोटो; लिहिली भावुक पोस्ट

Babita Singh Reporting: एक हत्या अन् अनेक रहस्यं! ‘बबिता सिंग रिपोर्टिंग’ची घोषणा; रिलीज डेट जाहीर
4

Babita Singh Reporting: एक हत्या अन् अनेक रहस्यं! ‘बबिता सिंग रिपोर्टिंग’ची घोषणा; रिलीज डेट जाहीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.