
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
बिग बॉस मराठी ६ या नव्या सीझनची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. येत्या ११ जानेवारी २०२६ पासून रात्री ८ वाजता कलर्स मराठीवर हा शो सुरु होणार आहे, जो पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.घरात एन्ट्री घेणाऱ्या स्पर्धकांमध्ये गेल्या काही दिवसांपासून अनेक सेलिब्रिटींची, रीलस्टार्सटी नावं चर्चेत आहेत. मात्र, सहभागी होणाऱ्या स्पर्धकांबाबतची कोणतीही अपडेट कलर्स मराठीने अधिकृतरित्या शेअर केली नव्हती. मात्र आता बिग बॉस मराठी ६ च्या घरातील पहिला स्पर्धक समोर आला आहे.
शो सुरू होण्यासाठी अवघे चार दिवस बाकी राहिले आहेत. कलर्स मराठीच्या इन्स्टाग्राम पेजवर बिग बॉस मराठी ६ मधील पहिल्या स्पर्धकाचा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. यामध्ये एक महिला साडी नेसून ग्लॅमरस अंदाजाच दरवाजात उभी असल्याचं पाहायला मिळत आहे.
या वर्षी घरात एक सुपर मॉडेल एन्ट्री घेणार आहे, अशी माहिती कलर्स वाहिनीने सोशल मीडियावर पोस्टद्वारे दिली आहे. वाहिनीने दिलेल्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे, “फॅशनच्या जगातील ही सुंदरी, भल्याभल्यांवर पडणार भारी… ओळखा पाहू कोण?” असं कॅप्श वाहिनीने या पोस्टला दिलं आहे.
कलर्स मराठीने शेअर केलेल्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. नेटकऱ्यांनी अनेक अभिनेत्रींची नावं घेतली आहे.तर काहींनी हा AI ने बनवलेला व्हिडिओ आहे असं देखील म्हटलं आहे. पण तरीदेखील काही चाहत्यांनी या प्रोमोमधील ती व्यक्ती कोण आहे हे ओळखली आहे. या प्रोमोच्या कमेंट्स सेक्शनमध्ये नेटकऱ्यांनी ही व्यक्ती कोण असेल याचा अंदाज लावला आहे. एका नेटकऱ्याने यावर,”ही प्रसिद्ध युट्यूबर आणि अभिनेत्री उर्मिला निंबाळकर आहे का?” असा प्रश्न विचारला आहे. तर दुसऱ्या एक नेटकऱ्याने, ही सुपर मॉडेल सोनाली राऊत असल्याचा अंदाज कमेंट्समध्ये वर्तवला आहे. यावर्षा शोमध्ये सोनाली राऊत सहभागी होणार अशा चर्चा देखील गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत.
यंदा या शोमध्ये रितेश भाऊंच्या शब्दांचा तडका कोणाकोणाला मिळणार, हे पाहण्याची उत्सुकता आणखी वाढली आहे. हा शो नक्की प्रेक्षकांचं मनोरंजन दुप्पट करणार आहे.‘बिग बॉस’ मराठीचं यंदाचं घर हे सोपं नसणार आहे. यावेळी ‘स्वर्ग आणि नर्क’ अशी थक्क करणारी थीम प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. एका बाजूला स्पर्धकांचा आनंद आणि दुसरीकडे त्यांचा संघर्ष पाहायला मिळणार आहे. या नव्या संकल्पनेमुळे घरातील सदस्यांचे खरे चेहरे तर समोर येणारच आहे, पण मैत्री आणि गद्दारीची नवी समीकरणंही पाहायला मिळणार आहेत. हा शो प्रेक्षकांना आता टीव्हीवरच नाही तर जिओ हॉटस्टारवरही पाहायला मिळणार आहे.