Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वडील – मुलीच्या नात्यावर अनोखी सांगड घालणारं नाटक प्रेक्षकांच्या भेटीस; रंगभूमीवर परतले महेश मांजरेकर

भरत जाधव - महेश मांजरेकर यांची जोडी पुन्हा रंगभूमीवर परतली आहे. पहिल्यांदाच हे दोन दिग्गज अभिनेते एकत्र काम करताना दिसणार आहे. या दोघांना एकत्र पाहण्यासाठी त्यांचे चाहते उत्सुक आहेत.

  • By सायली ससाणे
Updated On: Nov 25, 2025 | 02:32 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • वडील – मुलीच्या नात्यावर अनोखं नाटक
  • रंगभूमीवर परतले महेश मांजरेकर
  • भरत जाधव – महेश मांजरेकरची रंगणार जोडी
 

मराठी रंगभूमीवर एक विनोदी, हृदयस्पर्शी आणि नातेसंबंधांचा वेध घेणारं नाटक ‘शंकर-जयकिशन’ लवकरच नाट्यरसिकांच्या भेटीला येत आहे. वडिल- मुलीचे गुंतागुंतीचे नाते, वर्षानुवर्षे दडलेली कटुता आणि अचानक जीवनात घडलेल्या अनपेक्षित व्यक्तीच्या आगमनाने बदलणारे समीकरण अशी या नाटकाची कथा आहे. कथानकात वडिल मुलीच्या नात्यात कोणी तिसरा येतो. त्याच्या येण्यामागंच नेमकं कारण काय ? की त्याच्या आयुष्यात काही गूढ रहस्य दडलंय ? याचं उत्तर नाट्यरसिकांना नाटक पाहूनच मिळणार आहे.

हे मजेदार, हटके आणि भावनिक नाटक विशेष ठरणार आहे, कारण पहिल्यांदाच भरत जाधव आणि महेश मांजरेकर हे दोन प्रभावी कलाकार रंगभूमीवर एकत्र दिसणार आहेत. त्यातही महेश मांजरेकर तब्बल २९ वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन करत आहेत. त्यामुळे महेश मांजरेकर यांच्यासाठीही आणि प्रेक्षकांसाठीही हा एक खास क्षण असणार आहे. महेश मांजरेकर यांनी अनेक मराठी चित्रपटामध्ये काम केले आहे आणि आता त्यांना रंगभूमीवर पाहण्यासाठी चाहते खूप आनंदित आहेत.

आजोबांच्या अस्थी घेण्यासाठी स्मशानभूमीत पोहचला नातू, धर्मेंद्रजींच्या जाण्याने देओल कुटुंबात शोक

या आगामी नाटकाचे दिग्दर्शक सुरज पारसनीस या नाटकाबद्दल सांगताना म्हणाले, “हे नाटक फक्त हसवणारं नाही तर नात्यांमधल्या अदृश्य धाग्यांना भिडणारं आहे. मैत्री आणि पित्याच्या नात्याची वेगळी बाजू यातून प्रेक्षकांसमोर येणार आहे.” या नाटकाची कथा नक्कीच प्रेक्षकांना मोहित करणार आहे. तसेच या नाटकामध्ये भरत जाधव आणि महेश मांजरेकर यांच्याशिवाय शिवानी रांगोळे ही अभिनेत्री देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

निर्माते, अभिनेते भारत जाधव म्हणाले, ‘’महेशजी आणि मी अनेक वर्षे एकाच इंडस्ट्रीमध्ये काम करत आहोत, त्यामुळे आमची चांगली मैत्री आहे. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या अनेक चित्रपटांमध्येही मी भूमिका केल्या आहेत. एकमेकांना कामामध्ये काय अपेक्षित असतं, हे आम्ही उत्तम जाणतो. त्यामुळेच त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव हा नेहमीच अनोखा असतो आणि आता तर आम्ही एकत्र रंगमंचावर झळकणार आहोत. त्यामुळे आम्हाला एकत्र पाहाण्यासाठी प्रेक्षक जितके आतुर आहेत. तितकीच उत्सुकता आम्हालाही लागून राहिली आहे. मला खात्री आहे, आमची केमिस्ट्री रंगभूमीवर वेगळी जादू निर्माण करेल.”

परदेशी थाटात खुललेली मराठी लव्हस्टोरी! ‘असा मी अशी मी’चा भव्य ट्रेलर प्रदर्शित

तर महेश मांजरेकर आपल्या या प्रवासाबद्दल म्हणाले, ” २९ वर्षांनंतर रंगभूमीवर परत येणं ही माझ्यासाठी भावनिक गोष्ट आहे. नाटक हे माझ्यासाठी नेहमीच अग्रस्थानी आहे. मात्र चित्रपटांमुळे मला नाटकाला वेळ देता आला नाही. परंतु आता जितका जमेल तेवढा वेळ मी रंगभूमीसाठी देणार आहे. ‘शंकर जयकिशन’चं कथानक वाचताना मला जाणवलं, हे नाटक रंगभूमीवर आलंच पाहिजे. भरतसोबत मी अनेकदा काम केलं आहे, मी त्यांच्या अभिनयाचा आदर करतो. तो प्रामाणिक, संवेदनशील आणि ऊर्जा असलेला कलाकार आहे. आता रंगभूमीवर आम्ही एकत्र येतोय. एकमेकांच्या अनुभवांची देवाणघेवाण रंगमंचावर एक वेगळाच रंग उमटवेल, याची मला खात्री आहे.”

भरत जाधव एण्टरटेन्मेंट निर्मित सुरज पारसनीस दिग्दर्शित या नाटकाचे लेखन विराजस कुलकर्णी याने केले आहे. क्षितिज पटवर्धन यांचे गीत लाभलेल्या या नाटकात शिवानी रांगोळे, भरत जाधव आणि महेश मांजरेकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. विनोद, भावना आणि नात्यांचे सुंदर मिश्रण असलेल्या ‘शंकर-जयकिशन’ या नाटकाचा शुभारंभ १९ डिसेंबर रोजी विलेपार्ले येथील दिनानाथ मंगेशकर नाट्यगृह येथे होणार आहे.

Web Title: Bharat jadhav mahesh manjrekar shankar jaykishan marathi nathak latest

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 25, 2025 | 02:32 PM

Topics:  

  • Bharat Jadhav
  • entertainment
  • mahesh manjrekar

संबंधित बातम्या

आजोबांच्या अस्थी घेण्यासाठी स्मशानभूमीत पोहचला नातू, धर्मेंद्रजींच्या जाण्याने देओल कुटुंबात शोक
1

आजोबांच्या अस्थी घेण्यासाठी स्मशानभूमीत पोहचला नातू, धर्मेंद्रजींच्या जाण्याने देओल कुटुंबात शोक

अभिजीत सावंत आणि गौतमी पाटीलच्या AI व्हिडीओ ने वेधले लक्ष, चाहत्यांची वाढवली उत्सुकता
2

अभिजीत सावंत आणि गौतमी पाटीलच्या AI व्हिडीओ ने वेधले लक्ष, चाहत्यांची वाढवली उत्सुकता

Bigg Boss 19 : मालतीने तान्या मित्तलला मारली कानशिलात! म्हणाली – आणखी जोरात मारली…, पहा Video
3

Bigg Boss 19 : मालतीने तान्या मित्तलला मारली कानशिलात! म्हणाली – आणखी जोरात मारली…, पहा Video

वयाच्या चाळीशीत संतोष जुवेकरला लग्न करण्याची घाई? लग्नाविषयी चाहत्यांना दिली मोठी हिंट
4

वयाच्या चाळीशीत संतोष जुवेकरला लग्न करण्याची घाई? लग्नाविषयी चाहत्यांना दिली मोठी हिंट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.