Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘भुल भुलैय्या’ नाटकातून रहस्य, थरार आणि भ्रमाचा अनोखा खेळ; Priya Berde चं रंगभूमीवर दमदार पुनरागमन

सध्या रंगभूमीवर मराठी नाटकांची चर्चा सुरु आहे. आणि अशातच आता प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बेर्डे या आगामी मराठी नाटकामधून दमदार पुनरागमन करताना दिसणार आहेत. ज्याचं नाव आहे ‘भुल भुलैय्या’.

  • By सायली ससाणे
Updated On: Apr 07, 2026 | 08:45 AM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • ‘भुल भुलैय्या’ आगामी नाटक प्रेक्षकांच्या भेटीस
  • नाटकात मिळणार थरार आणि भ्रमाचा अनोखा खेळ
  • प्रिया बेर्डे यांचं रंगभूमीवर दमदार पुनरागमन
 

मनाच्या गाभाऱ्यात दडलेलं रहस्य, अनपेक्षित वळणांनी भरलेला प्रवास आणि प्रत्येक क्षणी चकित करणारा थरार अशा सगळ्या घटकांनी सजलेलं ‘भुल भुलैय्या’ हे नाटक लवकरच मराठी रंगभूमीवर रंगणार आहे. सत्य आणि भास यांच्यातील सीमारेषा इतकी धूसर होते की काय खरं आणि काय खोटं, हे ओळखणंच कठीण होतं अशा गुंतागुंतीच्या भावविश्वाचा रोमांचक अनुभव हे नाटक प्रेक्षकांना देणार आहे. या नाटकाची चर्चा आता सध्या प्रेक्षकांमध्ये होताना दिसत आहे.

या बहुप्रतीक्षित नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग रविवार, १९ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजता रवींद्र नाट्य मंदिर येथे होणार आहे. त्यानंतर २० एप्रिल रोजी डॉ. काशिनाथ घाणेकर सभागृहात आणि २१ एप्रिल रोजी दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह येथेही प्रयोग सादर केले जाणार आहेत. ‘भुल भुलैय्या’ हे नाटक रंगत संगत आणि लक्ष्मीनारायण प्रॉडक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने सादर केले जात आहे. नाटकाची कथा हेमंत एडलाबादकर यांनी लिहिली असून, रंगावृत्ती आणि दिग्दर्शनाची जबाबदारी प्रकाश कुमार सोहोनी यांनी सांभाळली आहे. तसेच नाटकाची निर्मिती रणजित देसाई आणि केदार सामंत यांनी केली आहे.

‘सुपर डुपर’मधील ‘अंगाई’ गाण्याने जिंकले मन; Swanand Kirkire यांच्या आवाजाने भावूक झाले प्रेक्षक

या नाटकाचं खास आकर्षण म्हणजे प्रिया बेर्डे यांचं रंगभूमीवर होणारं पुनरागमन. अनेक वर्षांनंतर त्या पुन्हा नाट्यरसिकांच्या भेटीला येत असून, या नव्या प्रवासाबद्दल खूप उत्सुक आहेत. या आनंदाबद्दल सांगताना त्या म्हणाल्या, “मी नाटकापासून कधीच दूर गेले नव्हते, पण पुन्हा काम करण्यासाठी एका चांगल्या स्क्रिप्टची वाट पाहत होते. ‘भुल भुलैय्या’मधून पुनरागमन करताना मला खूप आनंद होत आहे.”

या नाटकात साहिल देसाई, परिणिता पावसकर, आरती सोलंकी, अमीर तडवळकर, आशुतोष घोरपडे आणि विजय सूर्यवंशी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका पाहायला मिळणार आहेत. या नाटकाच्या नेपथ्याची जबाबदारी संदेश बेंद्रे यांनी सांभाळली असून, संगीत विजय गवंडे यांचं आहे. वेशभूषा मंगल केंकरे यांनी केली आहे, तर सूत्रधार म्हणून विजय सूर्यवंशी प्रेक्षकांना कथेत गुंतवून ठेवणार आहेत.

‘बम ल्यारी में फूटा…’, Zakir Khan चा इंडस्ट्रीवर थेट टोला; धुरंधरचे यश पचवता येणार नाही

एकंदरीत, ‘भुल भुलैय्या’ हे नाटक केवळ एक रहस्यकथा नसून, मानवी मनातील गुंतागुंत, भ्रम आणि वास्तव यांच्यातील संघर्ष यांचं प्रभावी चित्रण करणारा एक थरारक अनुभव ठरणार आहे. मराठी रंगभूमीवर एक वेगळा आणि संस्मरणीय ठसा उमटवण्याची क्षमता या नाटकात निश्चितच आहे.

Web Title: Bhul bhulaiyya marathi play priya berde comeback theatre show marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 07, 2026 | 08:45 AM

Topics:  

  • entertainment
  • marathi entertainment
  • Marathi News

संबंधित बातम्या

Jalgaon News: ‘तरुणांच्या जीवाशी खेळ नको!’ फैजपूरमधील दारूचे दुकान बंद करण्याची मागणी
1

Jalgaon News: ‘तरुणांच्या जीवाशी खेळ नको!’ फैजपूरमधील दारूचे दुकान बंद करण्याची मागणी

Nagpur News :चार उमेदवारांचे अर्ज दाखल; शक्तिप्रदर्शनाचा जोर, भाजपची रॅली मात्र रद्द
2

Nagpur News :चार उमेदवारांचे अर्ज दाखल; शक्तिप्रदर्शनाचा जोर, भाजपची रॅली मात्र रद्द

Vijayendra Kumeria Divorce: ‘नागिन’ फेम अभिनेत्याचा १० वर्षांचा संसार मोडला; अखेर घटस्फोटावर केलं भाष्य
3

Vijayendra Kumeria Divorce: ‘नागिन’ फेम अभिनेत्याचा १० वर्षांचा संसार मोडला; अखेर घटस्फोटावर केलं भाष्य

Sheeba Chaddha: नात्यात संवाद का महत्त्वाचा? ‘Bakaiti’च्या दुसऱ्या सीझनआधी शीबा चड्ढा यांनी सांगितल्या खास गोष्टी
4

Sheeba Chaddha: नात्यात संवाद का महत्त्वाचा? ‘Bakaiti’च्या दुसऱ्या सीझनआधी शीबा चड्ढा यांनी सांगितल्या खास गोष्टी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.