
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरात रोज नवा दंगा, कल्ला आणि बॉण्डिंग पाहायला मिळत आहेत. घरात दररोज नवनवीन धक्के आणि जबरदस्त ट्विस्ट रंगात रंगत आहेत. खेळाचा प्रत्येक टप्पा सदस्यांसाठी आव्हानात्मक ठरत असतानाच, आता घरात एका अशा गोष्टीची एन्ट्री होणार आहे ज्यामुळे संपूर्ण गेमच बदलून जाणार आहे. आजच्या भागात प्रेक्षकांना एक मोठा बदल पाहायला मिळणार आहे. घरामध्ये आता ‘उल्टा-पुल्टा’ रूमचं दार उघडणार आहे. या रूममध्ये अशी ताकद आहे की ती संपूर्ण खेळाचा नूर पालटून टाकू शकते. ‘या आठवड्यात सदस्यांचं ट्रबल होणार डबल’ असं म्हणत बिग बॉसने सदस्यांना इशाराच दिला आहे. बिग बॉस यांनी सदस्यांना सांगितले, ” या रूममध्ये ताकद आहे अख्खा गेम उल्टा-पुल्टा करून टाकण्याची.”
‘धुरंधर २’ च्या टीझरची वाट पाहताय का? सनी देओलच्या ‘Border 2’ सोबत सिनेमागृहात होणार प्रदर्शित
या नवीन रूममुळे कोणाचे कोणाशी असलेले समीकरण बदलणार? कोणाचं नशीब चमकणार आणि कोणाच्या अडचणी वाढणार? हे पाहणे रंजक ठरणार आहे. ज्यामुळे घरातील वातावरण चांगलेच तापल्याचे दिसते आहे. बिग बॉसच्या नव्या प्रोमोने चाहत्यांना थक्क केले आहे. आजच्या भागात नक्की काय पाहायला मिळणार यासाठी बिग बॉस प्रेमी उत्सुक आहेत.
तसेच ‘बिग बॉस’चा दुसरा प्रोमो देखील समोर आला आहे, ज्यामध्ये अनुश्री आणि राकेश बापट यांच्यात वादाची ठिणगी पडल्याचे दिसत आहे. हा वाद नेमका का झाला आहे हे समोर आलं नसले तरी अनुश्रीने बोललेलं राकेशला पटलेलं दिसत नाही आहे. इतकंच नाहीतर राकेश ‘बिग बॉस’च्या घरात तोडफोड देखील करताना दिसला आहे. आणि यामुळे घराबाहेरही जायला निघतो. वादादरम्यान अनुश्री म्हणते, “जिथे तू हात धरुन मला उठवलंस ना, तिथे तू माझ्या डोक्यात गेलास. यावर राकेश म्हणतो, “डू नॉट ब्लडी से दॅट अगेन. २५ वर्ष मी एवढं काम केलंय पण कोणाची हिंमत नाही झाली मला कोणी असं बोलेल. मला नाही राहायचं या घरात”. असे तो म्हणताना दिसत आहे.
‘बिग बॉस’च्या घरात आता खरा खेळ सुरु झाले आहे. तसेच प्रेक्षकांना हे पाहताना मज्जा येणार आहे. तसेच ‘बिग बॉस’ सुरु होऊन आता एक आठवडा देखील झाला आहे. आणि नुकताच भाऊंचा धक्का देखील पार पडला ज्यामध्ये कोणतेच नॉमिनेशन झालेले दिसले नाही. तसेच आता या आठवड्यात नक्कीच नॉमिनेशन होणार आणि कोणताही एक स्पर्धक घराबाहेर जाणार असे रितेश देशमुखने आधीच सांगितले आहे. म्हणून आता या आठवड्यात कोण घराबाहेर पडणार याकडे सगळ्यांचे लक्ष वेधले आहे.