Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘राजा शिवाजी’च्या ‘छत्रपती’ अँथमचा BTS व्हिडिओ प्रदर्शित; चाहत्यांसाठी अजय-अतुलच्या संगीताची खास भेट

निर्मात्यांनी चित्रपटातील ‘छत्रपती’ या अँथम गाण्याचा BTS (बिहाइंड द सीन) व्हिडिओही रिलीज केला आहे.या व्हिडिओमधून गाण्याच्या शूटिंगची भव्यता, संगीताची ताकद आणि संपूर्ण टीमची मेहनत दिसून येते. त्यामुळे ‘राजा शिवाजी’ चित्रप

  • By अमृता यादव
Updated On: Apr 11, 2026 | 02:15 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

‘जिओ स्टुडिओज’ आणि ‘मुंबई फिल्म कंपनी’ यांच्या वतीने बनवण्यात येणाऱ्या बहुप्रतिक्षित ‘राजा शिवाजी’ या ऐतिहासिक चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता आहे.अलीकडेच चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले होते, ज्यामुळे चर्चेला उधाण आले होते. आता निर्मात्यांनी चित्रपटातील ‘छत्रपती’ या अँथम गाण्याचा BTS (बिहाइंड द सीन) व्हिडिओही रिलीज केला आहे.या व्हिडिओमधून गाण्याच्या शूटिंगची भव्यता, संगीताची ताकद आणि संपूर्ण टीमची मेहनत दिसून येते. त्यामुळे ‘राजा शिवाजी’ चित्रपटाबाबतची उत्सुकता आणखी वाढली आहे.

या चित्रपटातील ‘छत्रपती’ हे गीत प्रसिद्ध संगीतकार जोडी अजय-अतुल यांनी संगीतबद्ध केले आहे. विशेष म्हणजे त्यांनी हे गीत स्वतःच्या दमदार आवाजातही गायले आहे.नुकत्याच प्रदर्शित झालेल्या BTS व्हिडिओमध्ये या गाण्याच्या निर्मितीमागची भव्यता स्पष्ट दिसते. मोठ्या पडद्यावर प्रभावी अनुभव देण्यासाठी हे संगीत अतिशय ताकदीने आणि बारकाईने तयार करण्यात आले आहे.या व्हिडिओत प्रत्येक बीट, प्रत्येक स्वर आणि प्रत्येक दृश्यामागील मेहनत जाणवते.
याआधी या गाण्याचा मुखडा प्रदर्शित झाला होता आणि त्याला प्रेक्षकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला होता. आता संपूर्ण गाण्याची प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

या महत्त्वाकांक्षी चित्रपटाचे दिग्दर्शन रितेश विलासराव देशमुख यांनी केले असून, त्यांनीच लेखक, निर्माता आणि छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारत तिहेरी जबाबदारी समर्थपणे सांभाळली आहे. त्यांच्या या बहुआयामी भूमिकेमुळे चित्रपटाला एक वेगळीच उंची मिळणार असल्याचे स्पष्ट दिसते. चित्रपटात संजय दत्त, अभिषेक बच्चन, विद्या बालन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, बोमन इराणी, भाग्यश्री, फरदीन खान, जितेंद्र जोशी, अमोल गुप्ते आणि जिनिलिया देशमुख यांसारख्या दिग्गज कलाकारांचा समावेश असलेला एक भक्कम कलाकार संच पाहायला मिळणार आहे.

‘राजा शिवाजी अँथम’ “छत्रपती” हे १३ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार असून, या गीतातून हिंदवी स्वराज्याचा आत्मा, शौर्य आणि प्रेरणा नव्या पिढीपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. संगीत, दृश्यरचना आणि भावनिक उंची यांचा संगम असलेले हे गीत चित्रपटाचा आत्मा ठरणार असल्याची सर्वत्र चर्चा आहे.

 

”मासिक पाळी असतानाही मी..”, अभिनेत्रीच्या वक्तव्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा, नेटकऱ्यांनी घेतली शाळा

‘जिओ स्टुडिओज’ प्रस्तुत आणि ‘मुंबई फिल्म कंपनी’ निर्मित या चित्रपटाची निर्मिती ज्योती देशपांडे आणि जिनिलिया देशमुख यांनी केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आणि आधारित राजा शिवाजी १ मे २०२६ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

बॉलिवूड हादरले! प्रसिद्ध नाव वापरून मोठा फ्रॉड उघडकीस, कैलाश खेर यांच्या नावाने गीतकाराची ३.२५ लाखांची फसवणूक

एकूणच, “राजा शिवाजी” हा चित्रपट केवळ एक सिनेमा नसून, तो भारतीय इतिहासाचा गौरवशाली अध्याय मोठ्या पडद्यावर सजीव करणारा एक भव्य अनुभव ठरणार आहे. ‘राजा शिवाजी अँथम’ “छत्रपती” या गाण्याच्या माध्यमातून प्रेक्षकांना या ऐतिहासिक प्रवासाची एक प्रभावी झलक मिळाली असून, आता संपूर्ण चित्रपटाची प्रतीक्षा अधिकच उत्कंठावर्धक झाली आहे.

Web Title: Chhatrapati anthem bts video from raja shivaji released a special musical treat from ajayatul for fans

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 11, 2026 | 02:15 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • marathi movie
  • ritesh deshmukh

संबंधित बातम्या

Kapus Konda Movie Teaser: एका कुत्र्यामुळे उलगडणार नात्यांची गोष्ट; ‘कापूसकोंडा’चा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला
1

Kapus Konda Movie Teaser: एका कुत्र्यामुळे उलगडणार नात्यांची गोष्ट; ‘कापूसकोंडा’चा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला

Janak Marathi Movie : सत्यासाठी पेटणार स्वाभिमानाची लढाई; ‘जनक’च्या मोशन पोस्टरने वेधलं लक्ष
2

Janak Marathi Movie : सत्यासाठी पेटणार स्वाभिमानाची लढाई; ‘जनक’च्या मोशन पोस्टरने वेधलं लक्ष

Dharau Marathi Movie: ग्रामीण मातीचा सुगंध अन् गाईसोबतचं हळवं नातं; ‘धाराऊ’चा पोस्टर पाहिलात का?
3

Dharau Marathi Movie: ग्रामीण मातीचा सुगंध अन् गाईसोबतचं हळवं नातं; ‘धाराऊ’चा पोस्टर पाहिलात का?

Sohla Movie Trailer: सोनाली बेंद्रेची मराठी सिनेसृष्टीत एन्ट्री; हळुवार नात्यांची गोष्ट घेऊन येतोय ‘सोहळा’, ट्रेलरने वेधलं लक्ष
4

Sohla Movie Trailer: सोनाली बेंद्रेची मराठी सिनेसृष्टीत एन्ट्री; हळुवार नात्यांची गोष्ट घेऊन येतोय ‘सोहळा’, ट्रेलरने वेधलं लक्ष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.