Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘देवमाणूस’ फेम अभिनेत्रीची फसवणूक; सोशल मीडियावर मांडले मत, म्हणाली ‘पोलिसांनाही गंडवलं…’

मराठी मालिका 'देवमाणूस' फेम अभिनेत्री अस्मिता देशमुखची चर्चेत आली आहे. अभिनेत्रीची खूप मोठी फसवणूक करण्यात आली आहे. ज्याची माहिती अभिनेत्रीने स्वतःच व्हिडीओ शेअर करत दिली आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Sep 21, 2025 | 02:09 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • ‘देवमाणूस’ फेम अभिनेत्रीची फसवणूक
  • सोशल मीडियावर शेअर केला व्हिडीओ
  • नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण?

‘देवमाणूस’ या लोकप्रिय मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री अस्मिता देशमुखची फसवणूक झाली आहे. अस्मिताने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तिने तिची फसवणूक झालेचे स्पष्ट सांगितले आहे. ‘दहीहंडी २०२५’च्या इव्हेंटसाठी अस्मिता सेलिब्रिटी म्हणून तिथे उपस्थित झाली होती. मॅनेजर सुजित सरकाळे या व्यक्तिने अस्मिताला इव्हेंटच्या आधी ठरल्याप्रमाणे अर्धी रक्कम देखील दिली होती. दहीहंडीचा कार्यक्रम झाल्यानंतर सुजितने अभिनेत्रीला उरलेले पैसे पाठवल्याचा स्क्रीनशॉट शेअर केला. पण २-३ दिवस होऊन गेल्यानंतर अभिनेत्रीच्या खात्यात ती रक्कम जमा झालीच नाही असे अस्मिताचे म्हणणे आहे.

Bigg Boss 19: सलमान खानने अशनूरचा केला पर्दाफाश! अभिषेकसोबतच्या मैत्रीवर केले प्रश्नचिन्ह उपस्थित

अभिनेत्रीने ताबोडतोब या सगळ्याची चौकशी केली. पैसे का जमा झाले नाही याची चौकशी केली असता अस्मिताला तिची फसवणूक झाल्याचे उघड झाले. तातडीने तिने पोलिसांत तक्रार दाखल केली. पण अनेक दिवस झाले तरीही काहीच घडले नाही. अस्मिताची फसवणूक केलेल्या व्यक्तीने पोलिसांनाही गंडवल्याचं अभिनेत्रीने सांगितले आहे. सुजित सरकाळे असं त्या गृहस्थाच नाव असून आजवर त्याने अनेक कलाकारांना फसवलं असल्याचं देखील उघड झालं आहे.

अस्मिता देशमुखने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “नमस्कार. मी अस्मिता देशमुख. व्हिडीओ बनवण्याचं कारण एकच आहे की जेवढे काही सेलिब्रिटी आहेत, जेवढे रिल-स्टार्स आहेत. तेवढ्या सगळ्यांना मला अलर्ट करायचं आहे. एक माहिती मला तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचवायची आहे. मध्यंतरी मी दहिहंदीचा एक इव्हेंट केला होता. सुजित सरकाळे याने मला इव्हेंट दिला होता. माझ्यासह इतरही अनेक सेलिब्रिटी या इव्हेंटमध्ये होत्या. हा किस्सा माझ्याबाबतही नाही तर तुमच्याबाबतही घडू शकतो”.

‘इडली कडाई’ चित्रपटात धनुषचा भावनिक प्रवास; ट्रेलरवर चाहत्यांची प्रतिक्रिया – “ऑस्कर लेव्हल परफॉर्मन्स!”

अस्मिता पुढे म्हणाली,”सुजित सरकाळेने मला अर्धे पैसे पाठवले आणि बाकीचे इव्हेंटदरम्यान देणार होता. ठरल्याप्रमाणे मी इव्हेंटला गेले. इव्हेंट झाल्यानंतर त्याने मला पैसे पाठवल्याचे काही स्क्रीनशॉट पाठवले. त्या स्क्रीनशॉटमध्ये पैसे आल्याचं दिसत असलं तरी माझ्या अकाऊंटला मात्र ते पैसे आलेच नव्हते. सर्वर डाऊन, बँक इश्यू अशी कारणं त्याने मला दिली. आठवडा गेल्यानंतर माझ्या ही गोष्ट लक्षात आली की हा खूप मोठा स्कॅम माझ्यासोबत घडलाय. इतरांच्या बाबतही हे घडू शकतं. फोन पे, गुगल पेच्या माध्यमातून हा स्कॅम होतोय. खूपदा मी व्यवस्थितपणे त्याच्याकडे पैशांची मागणी केली. पोलीसांकडे तक्रार केली. त्यांनासुद्धा त्याने गंडावलं. मला कळकळीची विनंती करायची आहे की, कोणताही इव्हेंट करण्याआधी पूर्ण पैसे घ्या”.

 

 

Web Title: Devmanus fame asmita deshmukh faced financial fraud mumbai shared video on social media know details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 21, 2025 | 02:09 PM

Topics:  

  • entertainment
  • marathi actress
  • marathi serial news

संबंधित बातम्या

Bigg Boss 19: सलमान खानने अशनूरचा केला पर्दाफाश! अभिषेकसोबतच्या मैत्रीवर केले प्रश्नचिन्ह उपस्थित
1

Bigg Boss 19: सलमान खानने अशनूरचा केला पर्दाफाश! अभिषेकसोबतच्या मैत्रीवर केले प्रश्नचिन्ह उपस्थित

रिंकू राजगुरूचा साऊथ इंडियन लूक! जांभळ्या साडीतली अदा पाहून चाहते झाले फिदा…
2

रिंकू राजगुरूचा साऊथ इंडियन लूक! जांभळ्या साडीतली अदा पाहून चाहते झाले फिदा…

प्रिया मराठेच्या निधनानंतर शंतनू मोघेची माध्यमांसमोर पहिलीच प्रतिक्रिया; म्हणाला तिला वेळ देणं….
3

प्रिया मराठेच्या निधनानंतर शंतनू मोघेची माध्यमांसमोर पहिलीच प्रतिक्रिया; म्हणाला तिला वेळ देणं….

प्रियाच्या निधनानंतर शंतनु हळू-हळू सावरतोय, 15 दिवसांनी मालिकेत झाली एन्ट्री…
4

प्रियाच्या निधनानंतर शंतनु हळू-हळू सावरतोय, 15 दिवसांनी मालिकेत झाली एन्ट्री…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.