(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
दक्षिणात्य सुपरस्टार धनुष पुन्हा एकदा दमदार अभिनयासह प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्याचा आगामी चित्रपट ‘इडली कडाई’ चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून, त्याला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळतो आहे.या चित्रपटात धनुष एका सामान्या माणासाची भूमिका साकारतो आहे जो आपल्या वडिलांचा इडलीचा व्यवसाय वाचवण्यासाठी धडपड करत असतो.
या चित्रपटाचा ट्रेलर 20 सप्टेंबरला रिलीज झाला असून चाहत्यांनी ट्रेलर पाहून सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. काही चाहत्यांनी म्हटलं आहे,”हा परफॉर्मन्स थेट ऑस्कर लेव्हलचा आहे.”
इडली कडाई या चित्रपट 1 ऑक्टोबर 2025 रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटात धनुष हा धुमिकेत बघायला मिळेल, नुकत्याच रिलीज झालेल्या ट्रेलरला प्रेक्षकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला आहे. या चित्रपटाची अधिकृत घोषणा सप्टेंबर 2024मध्ये झाली होती.,या चित्रपटाच्या शूटिंगला सप्टेंबर 2024 मध्ये सुरुवात झाली आणि ते एप्रिल 2025 च्या अखेरीस पूर्ण झाले.
‘दशावतार’ चित्रपटाने ९ व्या दिवशी तोडला कमाईचा नवा विक्रम! निर्मात्यांनी घेतला मोठा निर्णय
चित्रपटातील कलाकार आणि कथा
हा चित्रपट ग्रामीण भागावर आधारित एक भावनिक नाट्य आहे, जो ‘तिरुचिराम्बलम’ नंतर धनुष आणि नित्या मेनन हे दोघेही पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत. ‘इडली कडाई’मध्ये धनुष, नित्या मेनन, अरुण विजय, शालिनी पांडे, प्रकाश राज आणि राजकिरण यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
बॉयफ्रेंड सुकेश चंद्रशेखर प्रकरणी जॅकलिन फर्नांडिसची सर्वोच्च न्यायालयात धाव, केले मदतीचे आवाहन
14 सप्टेंबरला चेन्नईमध्ये आयोजित ऑडिओ लॉंच कार्यक्रमात, धनुषने आपल्या बालपणाची एक आठवण शेअर केली आहे.तो म्हणाला, “मी लहानपणी इडली खरेदी करण्यासाठी सकाळी 4 वाजता उठून फुले गोळा करून ती विकायचो, “आज इंटरनेटवर काही लोकांना माझी ही गोष्ट खरी वाटत नाही; त्यांना माझ्या बोलण्यावर विश्वास बसत नाही”धनुषने सांगितलेल्या या गोष्टी ऐकून कार्यक्रमात उपस्थित असलेले चाहते आणि मीडिया प्रतिनिधी भावूक झाले होते. सोशल मीडियावर त्याच्या या प्रामाणिकपणाची आणि साधेपणाची चर्चा पाहायला मिळत आहे.