Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिशाहीन समाजाला नवी दिशा देणारा ‘माणूस नावाचं वादळ’ चित्रपट लवकरच मोठ्या पडद्यावर, ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

‘माणूस नावाचं वादळ’ या सामाजिक चित्रपटातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची उजळणी आता पुन्हा एकदा होणार आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Dec 11, 2025 | 04:45 PM
(फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समाजाला फक्त विचारांनी नव्हे, तर कृतीने दिशा दिली. त्यांनी स्वतः अनुभवलेलं दुःख, अन्याय आणि भेदभाव त्यांची प्रेरणा बनवली. “शिका, संघटित व्हा, संघर्ष करा” हे त्यांचे संदेश समाजाला पुढे जाण्यासाठी मार्गदर्शन ठरले.अस्पृश्यता, स्त्री-पुरुष विषमता, अन्याय आणि दडपशाही याविरुद्ध त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला. ते फक्त नेता नव्हते, तर एका युगाचे परिवर्तनकर्ते होते. त्यांच्या विचारांनी समाजाला नवीन आत्मविश्वास मिळाला, जीवनासाठी दिशा मिळाली आणि मानवतेचा मार्ग दाखवला.

मात्र आजकाल समाजात त्यांचे विचार कुठेतरी पुसले जात आहेत की काय असे चित्र काळानुसार बदलताना दिसले. दरम्यान, त्यांचे विचार आचरणात आणून त्यांनी दिलेला लढा लक्षात घेऊन आज आपण तसे वागलो तर कदाचित पूर्वीसारखं चित्र पाहायला मिळेल. कारण त्यांचे विचार कायम समाजाला दिशा देणारे ठरले आणि पुसट झालेल्या या विचारांची उजळणी आता पुन्हा एकदा होणार आहे. हो. कारण ‘माणूस नावाचं वादळ’ हा मराठी सामाजिक चित्रपट लवकरच दिशाहीन समाजाला दिशा देण्यासाठी मोठा पडद्यावर येत आहे. येत्या २ जानेवारीला हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

महामानव विश्वरत्न भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करत या चित्रपटाची घोषणा करण्यात आली. ‘माणूस नावाचं वादळ’ या चित्रपटात प्रशांत विलास सोनावणे, प्रीती वर्हाडे, प्रमोद सुर्वे, परेश मोरे, चंद्रकांत सावंत, दर्शना मोहिते, राजकुमार सावंत, विकास सूर्यवंशी, तुषार मिलिंद, साक्षी कदम, रूही जाधव, शर्वरी, उदयभान भारती, वैशाली जाधव ही कलाकार मंडळी महत्त्वपूर्ण भूमिकेत मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहेत.

‘Dhurandhar’ मुळे Pakistan मध्ये खळबळ! चित्रपट पाहिल्यानंतर काहींनी उपस्थित केले प्रश्न, तर काही म्हणाले…

ठाणे-रायगड जिल्यातील बहुजन युवा नेतृत्व श्री प्रविण भाऊ राऊत प्रस्तुत, डिजिम्स आर्टिस्ट्री निर्मित, एस पी एफ एन्टरटेन्मेंट आणि अमायरा स्टुडिओस यांच्या संयुक्त सहकार्याने हा चित्रपट असणार आहे. निर्माता योगेश जगदीश लाड यांनी चित्रपटाच्या निर्मितीची धुरा सांभाळली आहे तर दिग्दर्शक प्रशांत विलास सोनावणे याने हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. प्रशांत सोनावणे यांनी चित्रपटात दिग्दर्शक आणि अभिनेता अशी दुहेरी धुरा सांभाळली आहे. तर विलास सोनावणे, पुरुषोत्तम वेल्हे यांनी चित्रपटाच्या लेखनाची जबाबदारी सांभाळली. तर संगीताची जबाबदारी विशाल पाटील, केदार पानसरे, यशोधन बापट यांनी सांभाळली. नववर्षात म्हणजेच २ जानेवारी २०२६ ला हा सिनेमा मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

‘आता वेळ आली आहे…’ Sonu Sood चे सरकारकडे आवाहन; १६ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया बंद करण्याची मागणी

Web Title: Dr babasaheb ambedkar biopic manus navach vadal will be released on 2nd january 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 11, 2025 | 04:45 PM

Topics:  

  • Dr. Babasaheb Ambedkar
  • Entertainemnt News
  • marathi movie

संबंधित बातम्या

शब्दांशिवाय नात्यांची गोष्ट  उलगडणाऱ्या ‘माया’चा टीझर प्रदर्शित; मुक्ता बर्वे दिसणार अनोख्या भूमिकेत
1

शब्दांशिवाय नात्यांची गोष्ट उलगडणाऱ्या ‘माया’चा टीझर प्रदर्शित; मुक्ता बर्वे दिसणार अनोख्या भूमिकेत

‘अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ बॉक्स ऑफिसवर सुस्साट; केदार शिंदेंच्या चित्रपटाचीही कोट्यवधींची कमाई
2

‘अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ बॉक्स ऑफिसवर सुस्साट; केदार शिंदेंच्या चित्रपटाचीही कोट्यवधींची कमाई

‘मन आतले मनातले’ चित्रपटाचा ॲक्शनपॅक्ड टीझर लाँच, उपेंद्र लिमये साकारणार खलनायकाची भूमिका
3

‘मन आतले मनातले’ चित्रपटाचा ॲक्शनपॅक्ड टीझर लाँच, उपेंद्र लिमये साकारणार खलनायकाची भूमिका

विजय देवरकोंडाच्या VD14 चं टायटल रिव्हील; ‘राणा बाली’मध्ये झळकणार रश्मिका मंदाना ,रिलीज डेट जाणून घ्या
4

विजय देवरकोंडाच्या VD14 चं टायटल रिव्हील; ‘राणा बाली’मध्ये झळकणार रश्मिका मंदाना ,रिलीज डेट जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.