Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘उत्तर’चा भावनिक इफेक्ट! पुण्यातील अनोख्या प्रयोगामुळे आई-मुलांचं नातं पुन्हा घट्ट झालं

आईच्या मनातल्या भावना, तिची तगमग आणि न बोललेलं प्रेम अत्यंत संवेदनशीलपणे मांडणारा ‘उत्तर’ येणाऱ्या सुट्टीच्या दिवसांत कुटुंबासोबत पाहाण्यासारखा चित्रपट असल्याचं प्रेक्षकांनी सांगितलं.

  • By अमृता यादव
Updated On: Dec 20, 2025 | 04:11 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

मराठी चित्रपट ‘उत्तर’ सध्या प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण करत आहे. नातेसंबंध, भावना आणि आई-मुलांच्या अतूट नात्यावर भाष्य करणाऱ्या या चित्रपटाने पुण्यात एक आगळा-वेगळा आणि हृदयस्पर्शी प्रयोग घडवून आणला.

‘उत्तर’च्या टीमने पुण्यात तब्बल पंच्याहत्तर जेन झी मुलांना मल्टिप्लेक्समधील एका स्क्रीनमध्ये आणि त्यांच्या आयांना दुसऱ्या स्क्रीनमध्ये बसवून चित्रपट दाखवला. या अनोख्या प्रयोगादरम्यान दोन्ही स्क्रीनमध्ये हसू, अश्रू, शांतता, हुंदके अशा साऱ्या भावना अनुभवायला मिळाल्या. चित्रपट संपल्यानंतर भावनांनी भारावून गेलेल्या आयांना त्यांच्या मुलांनी कडकडून मिठी मारली आणि त्या क्षणाने संपूर्ण वातावरण भारावून टाकलं.

आजच्या टेक्नॉलॉजीप्रधान जगात आई-मुलांमधील संवाद कमी होत चालला आहे. अशा वेळी ‘उत्तर’ हा चित्रपट या नात्याला पुन्हा एकत्र आणणारा ठरत आहे, असं मत या प्रयोगाला उपस्थित असलेल्या सर्व आयांनी व्यक्त केलं. इतर पालकांनीही आपल्या मुलांसोबत हा चित्रपट आवर्जून पाहावा, अशी त्यांनी विनंती केली.

आईच्या मनातल्या भावना, तिची तगमग आणि न बोललेलं प्रेम अत्यंत संवेदनशीलपणे मांडणारा ‘उत्तर’ येणाऱ्या सुट्टीच्या दिवसांत कुटुंबासोबत पाहाण्यासारखा चित्रपट असल्याचं प्रेक्षकांनी सांगितलं.

दिग्दर्शक क्षितिज पटवर्धन म्हणतात, ” ‘उत्तर’ प्रेक्षकांच्या पसंतीला उतरतोय. दोन वेगवेगळ्या स्क्रीनवर चित्रपट दाखवण्याचं हे आयोजन संस्मरणीय ठरलं आहे, कारण या प्रयोगाने पंच्याहत्तर मुलं आणि त्यांच्या आयांना कायमस्वरूपी अधिक जवळ आणलं. सुट्टीच्या काळात जास्तीत जास्त पालक आपल्या मुलांसोबत हा पाहायला पाहायला जातील, असा मला पूर्ण विश्वास आहे.”

Neha Kakkar ने अश्लीलतेचा गाठला कळस, सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस; म्हणतात ‘हिला आवरा आता कोणीतरी…’

झी स्टुडिओजचे उमेशकुमार बन्सल आणि बवेश जानवलेकर तसेच जॅकपॉट एंटरटेनमेंटचे मयूर हरदास आणि संपदा वाघ यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटात रेणुका शहाणे, अभिनय बेर्डे, ऋता दुर्गुळे आणि निर्मिती सावंत यांच्या प्रमुख भूमिका आहेत, या शिवाय पहिल्यांदाच ‘अनमिस’नावाचं एक एआय पात्र सुद्धा यात झळकलं आहे. दिग्दर्शनासह क्षितिज पटवर्धन यांनी ‘उत्तर’ची कथा, पटकथाही लिहिली आहे.

Dashavatar : दिलीप प्रभावळकर यांच्या दमदार अभिनयाचा अनुभव झी मराठीवर, मराठी चित्रपटांचा राखणदार ‘दशावतार’ आता घराघरात

Web Title: Emotional impact of uttar unique experiment in pune strengthens the mother child bond once again

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 20, 2025 | 04:11 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • marathi actress
  • marathi movie

संबंधित बातम्या

Dashavatar : दिलीप प्रभावळकर यांच्या दमदार अभिनयाचा अनुभव झी मराठीवर, मराठी चित्रपटांचा राखणदार ‘दशावतार’ आता घराघरात
1

Dashavatar : दिलीप प्रभावळकर यांच्या दमदार अभिनयाचा अनुभव झी मराठीवर, मराठी चित्रपटांचा राखणदार ‘दशावतार’ आता घराघरात

Tarini Promo: केदारची खरी ओळख सगळ्यांसमोर, तारिणी आजीपासून दुरावणार? मालिकेत मोठा ट्विस्ट
2

Tarini Promo: केदारची खरी ओळख सगळ्यांसमोर, तारिणी आजीपासून दुरावणार? मालिकेत मोठा ट्विस्ट

Avatar Fire and Ash X Review: जुनी गोष्ट, नवं रूप, जेम्स कॅमेरॉनचा ‘अवतार ३’ पाहून प्रेक्षक भावूक
3

Avatar Fire and Ash X Review: जुनी गोष्ट, नवं रूप, जेम्स कॅमेरॉनचा ‘अवतार ३’ पाहून प्रेक्षक भावूक

परक्या देशात नवऱ्याच्या शोधात निघाली कावेरी; ‘कैरी’ चित्रपटातील सायली संजीवची लक्ष्यवेधी भूमिका
4

परक्या देशात नवऱ्याच्या शोधात निघाली कावेरी; ‘कैरी’ चित्रपटातील सायली संजीवची लक्ष्यवेधी भूमिका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.