Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘निर्धार’ चित्रपटाचा ट्रेलर पाहून चाहत्यांची वाढली उत्सुकता, जाणून घ्या चित्रपट कधी होणार रिलीज?

मराठी 'निर्धार' हा चित्रपट लवकरच सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये तगडी स्टारकास्ट पप्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. तसेच चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Nov 20, 2025 | 09:00 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • ‘निर्धार’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित
  • ट्रेलरने चाहत्यांची वाढली उत्सुकता
  • जाणून घ्या चित्रपट कधी होणार रिलीज?
 

नेहमीच तरुणाईने इतिहास घडवला असल्याची साक्ष इतिहास देताना दिसला आहे. कोणत्याही पिढीतील तरुणाईमध्ये समाजातील कोणत्याही क्षेत्रात क्रांती घडविण्याची धमक असते. यासाठी केवळ तरुणाईने एकजूट होण्याची गरज असते. समाजात बदल घडविण्याची अद्भुत शक्ती असलेल्या तरुणाईच्या संघर्षाची कथा ‘निर्धार’ या आगामी मराठी चित्रपटाद्वारे प्रेक्षकांसमोर येणार आहे. ‘वंदे मातरम…’ या सुमधूर गीतानंतर या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. २८ नोव्हेंबर रोजी हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

Bigg Boss 19: गौरव खन्ना आणि प्रणीतमध्ये जबरदस्त टक्कर! ‘या’ दोन स्पर्धकांना मिळाले कमी वोट, कोण जाईल घराबाहेर?

निर्मात्या पद्मजा वालावलकर यांनी जयलक्ष्मी क्रिएशनच्या बॅनरखाली ‘निर्धार’ चित्रपटाची निर्मिती केली आहे. दिनानाथ वालावलकर यांनी लिहिलेल्या कथेवर चित्रपट बनविण्याची जबाबदारी दिग्दर्शक दिलीप भोपळे यांनी यशस्वीपणे पार पाडली आहे. ‘निर्धार’ची कथा संघर्षाची असल्याचे सांगत चित्रपटाचा ट्रेलर सुरू होतो. हातात मशाली घेऊन धावणारे लोक आणि पेटलेली वस्ती ट्रेलरमध्ये सुरुवातीला दिसत आहे. या चित्रपटातील लढा भ्रष्टाचाराविरोधी असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. एकजुटीच्या क्रांतीची मशाल पेटलेली या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

आगीत भस्मसात होणाऱ्या वस्तीतून ‘अरे कुणीतरी वाचवा रे…’, अशी आर्त किंकाळी ऐकू येते आणि थेट हृदयाला भिडते. त्यानंतर ‘वंदे मातरम…’ गाण्याची झलक पाहायला मिळते. खरोखर भ्रष्टाचारावर काही उपाय आहेत का, त्याचं उत्तर सर्वसाधारण नाहीच असे असणार. मग तो नष्ट कसा होईल? काय उपाय आहे? लेखकांनी याचे उत्तर या चित्रपटातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर उत्तरोत्तर उत्कंठा वाढविण्याचे काम करणारा आहे. संघर्षाची ही कथा प्रेरणेचे वादळ घेऊन २८ नोव्हेंबरला येत असल्याचे ट्रेलरच्या शेवटी सांगण्यात आले आहे.

हार्दिक पांड्याने गुपचूप उरकला साखरपुडा? कथित गर्लफ्रेंड महिका शर्मासोबतच्या पोस्टने वेधले लक्ष

‘निर्धार’च्या ट्रेलरबाबत दिग्दर्शक दिलीप भोपळे यांनी सांगितले की, हा चित्रपट केवळ मनोरंजन करणारा नसून, समाजाला विचारांची खूप मोठी शिदोरी देणारा आहे. चित्रपट हे रसिकांपर्यंत पोहोचण्याचे प्रभावी माध्यम असल्याने तरुणाईची कथा तरुणाईच्याच माध्यमातून पोहोचवण्याचे काम ‘निर्धार’ करणार असल्याचे दिग्दर्शक दिलीप भोपळे म्हणाले आहे. या चित्रपटात समाजातील आणि राजकीय पटलावरील विविध मुद्द्यांवर भाष्य करण्यात आले आहे. तरुणाईची मानसिकता, विचारसरणी आणि दृष्टिकोन या चित्रपटाद्वारे समाजासमोर येणार आहे. समाजात वावरताना आणि समाजासाठी कार्य करताना आपणही समाजाचे काही देणे लागतो या भावनेतून ‘निर्धार’ची निर्मिती केल्याची भावना निर्मात्या पद्मजा वालावलकर यांनी व्यक्त केली.

‘निर्धार’मध्ये डॉ. गिरीश ओक, सौरभ गोगटे, पल्लवी पटवर्धन, प्रज्ञा केळकर, मिलिंद ऊके, उमेश बोळके, अभिनव कुरणे, जान्हवी सावंत, ऋतुजा कनोजिया, अभय पाटील, श्रेयस मोहिते, दिनानाथ वालावलकर, युवराज झुगर, केतकी पाटील, पल्लवी प्रसाद, आनंद पाटील, सुरेंद्र केतकर, विद्या डांगे, एन. डी. चौगुले, कोमल रणदिवे आदी कलाकारांच्या भूमिका प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. वितरणाद्वारे महाराष्ट्रभरातील तमाम रसिकांपर्यंत ‘निर्धार’ पोहोचवण्याची जबाबदारी पिकल एंटरटेनमेंट करणार आहे. डिओपी अतुल सुपारे यांनी सिनेमॅटोग्राफी केली असून, विकी बिडकर यांनी कला दिग्दर्शन केले आहे.

Web Title: Exciting trailer of the marathi film nirdhar released film will released across maharashtra soon

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 20, 2025 | 09:00 PM

Topics:  

  • entertainment
  • marathi cinema
  • Marathi News

संबंधित बातम्या

Sangli News -दिवसाढवळ्या खून मारामाऱ्या दरोडे; पालकमंत्र्यांसह पोलिस अधीक्षकांनी ॲक्शन प्लॅन राबवावा- मनोज भिसे
1

Sangli News -दिवसाढवळ्या खून मारामाऱ्या दरोडे; पालकमंत्र्यांसह पोलिस अधीक्षकांनी ॲक्शन प्लॅन राबवावा- मनोज भिसे

‘बहर नवा’ या गाण्यातून खुलवणारा नव्या नात्यातील दरवळ, ‘असंभव’मधील पहिलं गाणं प्रदर्शित
2

‘बहर नवा’ या गाण्यातून खुलवणारा नव्या नात्यातील दरवळ, ‘असंभव’मधील पहिलं गाणं प्रदर्शित

‘120 Bahadur’ मधील सर्व १२० सैनिकांचा होणार सन्मान, निर्मात्यांनी दिले दिल्ली उच्च न्यायालयाला आश्वासन
3

‘120 Bahadur’ मधील सर्व १२० सैनिकांचा होणार सन्मान, निर्मात्यांनी दिले दिल्ली उच्च न्यायालयाला आश्वासन

Raid 3: अजय देवगण पुन्हा रेड मारण्यास सज्ज, चित्रपटाच्या तिसऱ्या भागाचे शूटिंग लवकरच होणार सुरु
4

Raid 3: अजय देवगण पुन्हा रेड मारण्यास सज्ज, चित्रपटाच्या तिसऱ्या भागाचे शूटिंग लवकरच होणार सुरु

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.