Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘दशावतार’नंतर सिद्धार्थ मेनन गाण्यातून करणार धमाका, ‘मना’चे श्लोकमधील ‘हैय्या हो’ गाणं प्रदर्शित

सिद्धार्थ मेनन, हरीश दुधाडे, सुव्रत जोशी या तिन्ही कलाकारांचं एकत्र असलेलं गाणं ‘हैय्या हो’ प्रदर्शित झालं आहे. 'मना'चे श्लोक' मधील असलेलं हे नवं गाणं प्रेक्षकांना चांगलंच आवडलेलं दिसत आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Sep 24, 2025 | 03:23 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • ‘मना’चे श्लोकमधील ‘हैय्या हो’ गाणं प्रदर्शित
  • सिद्धार्थ मेनन, हरीश दुधाडे, सुव्रत जोशी यांनी गायलं गाणं
  • ‘मना’चे श्लोक चित्रपट कधी होणार प्रदर्शित?
मृण्मयी देशपांडे दिग्दर्शित ‘मनाचे श्लोक’ या चित्रपटातील ‘तू बोल ना’ गाण्याला प्रेक्षकांची भरभरून पसंती मिळाल्यानंतर आता या चित्रपटातील दुसरं गाणं ‘हैय्या हो’ प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. सिद्धार्थ सौमिल यांचे कमाल संगीत लाभलेल्या या गाण्याला प्राजक्त देशमुख यांचे शब्द लाभले आहेत. ‘हैय्या हो’मधील सिद्धार्थ मेनन, हरीश दुधाडे आणि सुव्रत जोशी यांचा जबरदस्त लूक सोशल मीडियावर सध्या चर्चेचा विषय बनला आहे.

‘हैय्या हो’ या गाण्याचे वैशिष्टय म्हणजे यात सिद्धार्थ मेनन, हरीश दुधाडे, सुव्रत जोशी या तिघांनी अभिनयासोबत पहिल्यांदाच गायनही केलं आहे. त्यामुळे अभिनयाबरोबरच त्यांची ही नवीन बाजूही प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. तिघांचा पेहराव पाहून त्यांच्या नेमक्या व्यक्तिरेखा काय आहेत, हे जाणून घेण्याची प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. दरम्यान, त्यांच्या भूमिकेबाबत तिघांनी गोपनीयता ठेवली असली तरी गाण्याचा अनुभव मात्र त्यांनी शेअर केला आहे.

Lokhandwala Durgotsav: गायक अभिजीत भट्टाचार्यने केला खुलासा, ३० वर्षांपूर्वी का सुरु केला हा उत्सव?

सिद्धार्थ मेनन या गाण्याबद्दल म्हणाला, “हे गाणं इतकं एनर्जेटिक आणि उत्साही आहे की, आम्हाला तिघांना हे गाणं गाताना फार मजा आली. गाण्याची ऊर्जा आणि उत्साह प्रेक्षकांपर्यंत पोहोचतोय, याचा आनंद होत आहे.” हरीश दुधाडे म्हणाला, “गायक म्हणून ही आमच्या तिघांसाठी हा एक नवीन प्रवास खूप मजेशीर होता. ‘हैय्या हो’ हे गाणं प्रेक्षकांच्या आयुष्यात सकारात्मक दृष्टिकोन आणेल.” सुव्रत जोशी म्हणाला, “अभिनयासोबत गाणं गाण्याचा हा माझा पहिलाच अनुभव आणि तो खूप धमाल ठरला. ‘हैय्या हो’ गाताना आम्ही जितकी मजा केली, तितकीच मजा प्रेक्षकांनाही मिळेल.” असे सुव्रत म्हणाला.

 

चित्रपटाची दिग्दर्शिका आणि अभिनेत्री मृण्मयी देशपांडे म्हणाली, “सिद्धार्थ, हरीश आणि सुव्रत हे तिघेही उत्तम अभिनेते आहेत. ‘हैय्या हो’ गाण्यात त्यांनी गायक म्हणून जे काही केलं आहे ते खरंच अप्रतिम आहे. या गाण्यातून त्यांनी दाखवलेला उत्साह, मजा आणि सकारात्मकता प्रेक्षकांच्या मनात नक्की पोहोचेल. अभिनयाबरोबरच त्यांच्या या नव्या बाजूचा अनुभव प्रेक्षकांसाठी एक सरप्राईज आहे. हे गाणं चित्रपटात खूप महत्वाची भूमिका बजावते. आता ती कशाप्रकारे हे मात्र चित्रपट पाहिल्यावरच कळेल.”

मिलान फॅशन वीकमध्ये आलिया भट्ट आणि BTS’ जिनची भेट; सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल

या गाण्यानंतर या चित्रपटाने स्वतःचे वेगळपण पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. त्यामुळे यात काहीतरी भन्नाट पाहायला मिळणार आहे, अशी चर्चा सध्या प्रेक्षकांमध्ये सुरु झाली आहे. ‘मना’चे श्लोक’ हा चित्रपट १० ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. याचे लेखन आणि दिग्दर्शन मृण्मयी देशपांडे यांनी केले असून निर्माते श्रेयश जाधव आणि संजय दावरा आहेत. चित्रपटात मृण्मयी देशपांडे, राहुल पेठे, पुष्कराज चिरपुटकर, सुव्रत जोशी, सिद्धार्थ मेनन, हरीश दुधाडे आणि करण परब असे कलाकार आहेत. हा चित्रपट स्टारलाईट बॉक्स थिएटर्स आणि नितीन वैद्य प्रॉडक्शन्स यांच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर येणार आहे.

Web Title: Haiya ho song released from marathi movie manache shlok

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 24, 2025 | 03:23 PM

Topics:  

  • entertainment
  • marathi cinema
  • Marathi News

संबंधित बातम्या

‘पहलगाम हल्ला विसरलात का?’, शहनाज गिलवर चाहत्यांचा संताप, हानिया आमिरच्या Pak गाण्यावर केला डान्स
1

‘पहलगाम हल्ला विसरलात का?’, शहनाज गिलवर चाहत्यांचा संताप, हानिया आमिरच्या Pak गाण्यावर केला डान्स

‘The Lion King’ मधील अभिनेत्रीचा दुःखद मृत्यू; दीर्घकालीन बॉयफ्रेंडवर हत्या केल्याचा आरोप? सुरु आहे चौकशी
2

‘The Lion King’ मधील अभिनेत्रीचा दुःखद मृत्यू; दीर्घकालीन बॉयफ्रेंडवर हत्या केल्याचा आरोप? सुरु आहे चौकशी

Sangli News : भाजपच्या तासगाव ग्रामीण तालुका अध्यक्षांची हकालपट्टी करण्याची मागणी
3

Sangli News : भाजपच्या तासगाव ग्रामीण तालुका अध्यक्षांची हकालपट्टी करण्याची मागणी

नाशिक-पुणे रेल्वे जुन्या प्रस्तावित मार्गानेच हवी, पालकमंत्री विखे यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे
4

नाशिक-पुणे रेल्वे जुन्या प्रस्तावित मार्गानेच हवी, पालकमंत्री विखे यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.