Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 6 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘हळदीत माखले’ गाण्याने लग्नसोहळ्यांत आणली रंगत; अभय जोधपूरकरच्या आवाजाने केली जादू

'बाप्या' या आगामी मराठी चित्रपटामधील 'हळदीत माखले' गाण्याची क्रेझ सध्या चाहत्यांमध्ये पाहायला मिळाली आहे. लग्नसोहळ्यांना हे गाणं सध्या गाजत असून, सोहळ्याची रंगत तो वाढवत आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Apr 07, 2026 | 02:57 PM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • ‘हळदीत माखले’ गाण्याने लग्नसोहळ्यांत आणली रंगत
  • अभय जोधपूरकरच्या आवाजाने केली जादू
  • ‘बाप्या’ चित्रपट कधी होणार?
 

लग्न म्हटलं की हळदी समारंभाचा जल्लोष, रंगांची उधळण, नृत्य आणि आनंदाचा उत्सव आणि या सगळ्या भावना एकवटून सादर करत ‘हळदीत माखले’ हे भन्नाट गाणं तयार करण्यात आले आहे. समीर तिवारी दिग्दर्शित ‘बाप्या’ या आगामी मराठी चित्रपटातील हे गाणं सध्या प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरत असून, लग्नसोहळ्यांमध्ये हमखास वाजणारं गाणं ठरण्याची चिन्हं दिसत आहेत.

गाण्याची सुरुवात होताच त्याचे जोशपूर्ण बीट्स आणि उत्साही वाईब प्रेक्षकांना अक्षरशः थिरकायला भाग पाडतात. हळदी समारंभातील मस्ती, नात्यांमधील आपुलकी आणि आनंदाचे क्षण यांचं रंगतदार चित्र या गाण्यातून उभं राहतं. अभय जोधपूरकर यांच्या खास आवाजामुळे गाण्याला वेगळीच उंची लाभली आहे. गीतकार शौनक नारळे (असर) यांनी शब्दांमधून हळदीच्या सोहळ्याचं सुंदर आणि जिवंत चित्र रेखाटलं आहे. तर अभिजीत चंद्रकला यांच्या जोशपूर्ण संगीतामुळे हे गाणं डान्सफ्लोरवर थिरकायला लावणारं बनलं आहे.

११ वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर डान्सचा जलवा; रेमो डिसूजा घेऊन येतोय ABCD 3,नव्या भागात कोणाची होणार एन्ट्री?

दिग्दर्शक समीर तिवारी यांनी या गाण्याविषयी बोलताना म्हणाले की, ‘हळदी समारंभ हा केवळ एक विधी नसून आनंद, मोकळेपणा आणि नात्यांमधील रंग भरून टाकणारा उत्सव असतो. ‘हळदीत माखले’ तयार करताना प्रत्येक क्षण जिवंत करण्याचा प्रयत्न केला असून, हे गाणं ऐकताना प्रेक्षकांना त्यांच्या स्वतःच्या लग्नाच्या आठवणींमध्ये हरवून जावंसं वाटेल, असा त्यांचा विश्वास आहे.’

 

तसेच ते पुढे म्हणाले की, ‘आजच्या लग्नसोहळ्यांमध्ये काहीतरी हटके आणि एंटरटेनिंग असण्याची अपेक्षा असते, आणि ‘हळदीत माखले’ हे गाणं त्या अपेक्षांना पूर्ण करणारे आहे. येत्या काळात प्रत्येक हळदी समारंभात हे गाणं वाजताना आणि लोक त्यावर मनसोक्त थिरकताना दिसतील, याची खात्री त्यांनी व्यक्त केली.’

मराठी वेबविश्वात पुन्हा गुंजणार ‘पौर्णिमेचा फेरा’; तिसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

‘बाप्या’ या चित्रपटाची निर्मिती मुत्कल तिवारी आणि समीर तिवारी यांनी केली असून, हा चित्रपट १५ मे २०२६ रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. लग्नसोहळ्यांमधील आनंद, रंगत आणि उत्साह यांचा सुरेख मिलाफ असलेलं ‘हळदीत माखले’ हे गाणं प्रेक्षकांना नक्कीच ठेका धरायला भाग पाडणार आहे. तसेच ‘बाप्या’ हा चित्रपट पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

Web Title: Haldit makhle marathi song bapya movie wedding haladi song 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 07, 2026 | 02:57 PM

Topics:  

  • Bollywood
  • entertainment
  • Marathi News

संबंधित बातम्या

Maya Tata: कोण आहेत 37 वर्षीय माया टाटा? टाटा समूहाच्या व्यवसायाची सूत्रे घेणार हाती
1

Maya Tata: कोण आहेत 37 वर्षीय माया टाटा? टाटा समूहाच्या व्यवसायाची सूत्रे घेणार हाती

Raigad News: धाटाव MIDC मध्ये नालेसफाईचा फज्जा? केमिकलयुक्त पाणी रस्त्यावर; नागरिकांची चिंता वाढली
2

Raigad News: धाटाव MIDC मध्ये नालेसफाईचा फज्जा? केमिकलयुक्त पाणी रस्त्यावर; नागरिकांची चिंता वाढली

Market Outlook: Sensex आणि Nifty ची तेजी कायम राहणार की…? ‘या’ चार प्रमुख घटकांवर लक्ष ठेवणं महत्त्वाचं
3

Market Outlook: Sensex आणि Nifty ची तेजी कायम राहणार की…? ‘या’ चार प्रमुख घटकांवर लक्ष ठेवणं महत्त्वाचं

सरकारचा मास्टरस्ट्रोक! इथेनॉल मिश्रण कार्यक्रमामुळे देशाचे वाचले 1.90 लाख कोटी रुपये; शेतकऱ्यांनाही मोठा फायदा
4

सरकारचा मास्टरस्ट्रोक! इथेनॉल मिश्रण कार्यक्रमामुळे देशाचे वाचले 1.90 लाख कोटी रुपये; शेतकऱ्यांनाही मोठा फायदा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.