
(फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)
कलर्स मराठीवरील जय जय स्वामी समर्थ ही मालिका प्रत्येक भागागणिक भक्तिभाव, चमत्कार आणि जीवनाचे गूढ अर्थ उलगडत नेते. या आठवड्यात प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे एक भावनिक आणि अध्यात्मिक प्रवास. ‘सावित्रीचा अक्कलकोटचा ध्यास’ या भागामध्ये. स्वामींवरील श्रद्धा, स्त्रीचा आत्मविश्वास आणि कर्माचा अर्थ उलगडणारे हे भाग प्रेक्षकांच्या मनाला भिडणारे आहेत. कर्जात बुडालेली पण स्वामींवरील अखंड श्रद्धेने जगणारी सावित्री अक्कलकोटला जाऊन स्वामी समर्थांचे दर्शन घेण्याचं स्वप्न पाहते. गतिमंद गौतमसाठी ती केवळ आया नाही तर आई आहे, पण स्वामींसाठी ती अढळ भक्त आहे. तिच्या हातांनी थापलेल्या गोवऱ्या म्हणजे तिच्या श्रद्धेचं प्रतीक. त्या विकून ती स्वामींच्या दर्शनासाठी पैसे जमवते आणि आनंदाने म्हणते, “गोवऱ्या विकून पैसे जमले… आता मला अक्कलकोटला जाता येईल… स्वामींना भेटता येईल!”
पण जिथे भक्ती असते तिथे परीक्षा हमखास येते. आता ती अक्कलकोटला जाऊ शकेल का? स्वामी तिची कशी मदत करणार? गतिमंद गौतमचे वडील सावकार भानुदासला कसा धडा शिकवणार? हे जाणून घेण्यासाठी पहा जय जय स्वामी समर्थ – आदेश स्वामींचा – योग्य अक्कलकोट दर्शनाचा.
सावित्रीच्या आयुष्यात परीक्षा बनून येतात. पैशांच्या आणि अहंकाराच्या गर्वात बुडालेले गतिमंद गौतमचे वडील सावकार भानुदास. तो सावित्रीच्या हातातून तिच्या मेहनतीचे पैसे हिसकावतो आणि म्हणतो, “माझं कर्ज फिटत नाही तोवर हे पैसे माझे!” तिचं स्वप्न तुटतं, पण सावित्री खंबीर आवाजात म्हणते, “माझे स्वामी खंबीर आहेत.” श्रद्धा आणि अहंकारातील हा संघर्ष प्रेक्षकांना थरारून टाकणारा ठरणार आहे. याच क्षणी घडते एक अद्भुत लीला. स्वामी स्थानावर स्वामी हातातली गोवरी जमिनीवर सोडतात आणि ती घरंगळत जात असताना तिच्या मार्गात उसळते आगीची भिंत. स्वामींचा गंभीर पण प्रेमळ आवाज घुमतो.“माझ्या आदेशाशिवाय अक्कलकोटास कोणी पोहोचू शकत नाही… आणि माझा आदेश आला की कुणी अडवू शकत नाही.”क्षणात आग नाहीशी होते आणि गोवरी पुन्हा पुढे घरंगळते – जणू भक्तीचा प्रवास पुन्हा सुरू होतो.या विशेष आठवड्यात सावित्री आणि भानुदास समोरासमोर उभे आहेत. एकीकडे अहंकार आणि दुसरीकडे श्रद्धा. त्यांच्या मध्ये प्रकट होतो स्वामी समर्थांचा दिव्य आभास, जणू सांगतोय – जो भक्तीवर विश्वास ठेवतो त्याचं रक्षण स्वामी स्वतः करतात.‘जय जय स्वामी समर्थ’चे हे भाग केवळ एक कथा नाही, तर ती आहे श्रद्धेची परीक्षा, स्त्रीशक्तीचा गौरव आणि गुरुकृपेची अनुभूती.जी प्रत्येक प्रेक्षकाला जगण्याचा नवा अर्थ शिकवते
धर्मेंद्र यांना रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज, आयुष्यातील शेवटच्या लढाईतून घरी परतला He-Man