Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘Krantijyoti Vidyalaya Marathi Madhyam’ चित्रपटाने दिलं मराठी शाळांच्या शिक्षक अन् विद्यार्थ्यांना नवं बळ!

सध्या सिनेमागृहात मराठी चित्रपट ‘क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम’ गाजत आहे. आणि भरभरून कमाई करताना दिसत आहेत. तसेच आता या चित्रपटाने मराठी शाळांच्या शिक्षक अन् विद्यार्थ्यांना नवं बळ दिलं आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Jan 22, 2026 | 09:47 AM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • ‘क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम’ चर्चेत
  • चित्रपटाने दिलं मराठी शाळांच्या शिक्षक-विद्यार्थ्यांना नवं बळ
  • चित्रपटाचे दिग्दर्शक हेमंत ढोमे यांनी आनंद केला व्यक्त
 

मराठी चित्रपटसृष्टीत क्वचितच असा एखादा चित्रपट येतो, जो केवळ पडद्यावर कथा सांगत नाही, तर प्रेक्षकांच्या मनात चळवळ उभी करतो. ‘क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम’ हा चित्रपट सध्या नेमकं तेच काम करत आहे. तांत्रिकदृष्ट्या सक्षम असलेल्या या चित्रपटाचा निर्मिती खर्च हा ६.५० करोड असून या चित्रपटाने आज २० कोटींच्या वर कमाई करत बॉक्स ऑफिसवर मोठा टप्पा गाठला आहे. हे यश केवळ आकड्यांचं नाही, तर भावनांचं देखील आहे. तसेच, या चित्रपटाने सगळ्यांचे मन देखील जिंकले आहे.

सद्यस्थितीवर भाष्य, नात्यातली गुंतागुंत, थोडं हास्य, पनवेलमध्ये रंगणार “एक नातं असंही” नाटकाचा रौप्य महोत्सवी प्रयोग

चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांनी त्याला लगेचचं आपलंसं केलं. कथेमधील प्रामाणिकपणा, शिक्षक-विद्यार्थ्यांमधील नातं आणि मराठी माध्यम शाळेचा आत्मसन्मान या सगळ्या गोष्टी प्रेक्षकांना थेट भिडल्या. राज्यभरातील अनेक शाळा आणि शिक्षकांनी स्वतः पुढाकार घेत सामूहिक शोज आयोजित केले आहेत. माजी विद्यार्थ्यांसोबत शिक्षकही चित्रपट पाहाताना दिसत आहेत. यानिमित्ताने त्यांचे रियुनिअनही ते आयोजित करत आहेत. या चित्रपटाने मराठी माणसांना, शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना नव्यानं बळ दिलं आहे. मराठी माध्यम शाळांविषयी असलेली न्यूनगंडाची भावना दूर करत, ‘आपली शाळा, आपली भाषा आणि आपली ओळख’ याचा अभिमान पुन्हा जागा केला आहे. चित्रपट संपल्यानंतर दिसणारे टाळ्यांचे गजर, भारावलेले चेहरे आणि डोळ्यांतला विश्वास यावरूनच या चित्रपटाचा प्रभाव स्पष्ट जाणवतो.

प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या प्रतिसादाबद्दल चित्रपटाचे दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणाले, “आम्ही हा चित्रपट करताना फक्त एक गोष्ट मनात ठेवली होती, मराठी शाळेची कथा प्रामाणिकपणे सांगायची. आज विद्यार्थी, शिक्षक आणि पालक हा चित्रपट पाहून जे बळ घेत आहेत, त्यातूनच मला वाटतं की, या सगळ्या जागृतीमुळे शिक्षण व्यवस्थेलाही याची जाणीव होईल. आपल्या मराठी शाळा टिकाव्यात, फुलाव्यात आणि पुढच्या पिढ्यांपर्यंत जाव्यात, हीच एकमेव आशा आणि इच्छा या चित्रपटामागे होती.”

आमिर खानने केला गौरीचा मनापासून स्वीकार, वयाच्या 60 व्या वर्षी तिसरे लग्न? म्हणाले ‘आम्ही पार्टनर आहोत…’

या चित्रपटात सचिन खेडेकर, अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर, क्षिती जोग, कादंबरी कदम, हरीश दुधाडे, निर्मिती सावंत, पुष्कराज चिरपुटकर आणि प्राजक्ता कोळी हे सगळे दमदार भूमिकेत दिसले आहेत. चलचित्र मंडळी निर्मित या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन हेमंत ढोमे यांचे असून, क्षिती जोग निर्माती आहे. तर सहनिर्माते विराज गवस, उर्फी काझमी (क्रेझी फ्यू फिल्म्स) आणि अजिंक्य ढमाळ आहेत. हा चित्रपट अजूनही कमाईच्या मार्गवर उत्तम पुढे चालला आहे.

Web Title: Krantijyoti vidyalaya marathi medium gives new strength to teachers and students of marathi schools

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 22, 2026 | 09:47 AM

Topics:  

  • entertainment
  • marathi movie
  • Marathi News

संबंधित बातम्या

आमिर खानने केला गौरीचा मनापासून स्वीकार, वयाच्या 60 व्या वर्षी तिसरे लग्न? म्हणाले ‘आम्ही पार्टनर आहोत…’
1

आमिर खानने केला गौरीचा मनापासून स्वीकार, वयाच्या 60 व्या वर्षी तिसरे लग्न? म्हणाले ‘आम्ही पार्टनर आहोत…’

आता जावेद जाफरीने AR Rahman यांना दिली साथ, वाढत्या वादाबद्दल स्पष्टच म्हणाले; ‘जगाप्रमाणे इंडस्ट्रीही बदलली…’
2

आता जावेद जाफरीने AR Rahman यांना दिली साथ, वाढत्या वादाबद्दल स्पष्टच म्हणाले; ‘जगाप्रमाणे इंडस्ट्रीही बदलली…’

म्हाळुंगे नाणेकर गटातील उमेदवारांच्या प्रचाराचा दणदणीत शुभारंभ; उमेदवारी अर्ज दाखल
3

म्हाळुंगे नाणेकर गटातील उमेदवारांच्या प्रचाराचा दणदणीत शुभारंभ; उमेदवारी अर्ज दाखल

Panchayat Season 5 कधी होणार प्रदर्शित? कलाकारांपासून ते कथानकाच्या ट्विस्टपर्यंत, जाणून घ्या सर्वकाही…
4

Panchayat Season 5 कधी होणार प्रदर्शित? कलाकारांपासून ते कथानकाच्या ट्विस्टपर्यंत, जाणून घ्या सर्वकाही…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.