Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तुम्ही प्रेमात कुठपर्यंत जाता? ललित प्रभाकर-ऋता दुर्गुळेच्या ‘आरपार’ चित्रपटाचा भन्नाट टिझर रिलीज

Aarpar Romantic Marathi Movie: पहिल्यांदाच ललित प्रभाकर आणि ऋता दुर्गुळेची केमिस्ट्री 'आरपार' चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर अनुभवायला मिळणार आहे. नुकतेच या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झाला आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Aug 11, 2025 | 07:10 PM
ललित प्रभाकर-ऋता दुर्गुळेच्या 'आरपार' चित्रपटाचा भन्नाट ट्रेलर रिलीज

ललित प्रभाकर-ऋता दुर्गुळेच्या 'आरपार' चित्रपटाचा भन्नाट ट्रेलर रिलीज

Follow Us
Close
Follow Us:

Aarpar Marathi Movie Teaser: मराठी चित्रपटसृष्टीत नेहमीच वेगवेगळे विषयाचे चित्रपट पाहायला मिळतात. त्यातही प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर फ्रेश जोडी पाहण्यास आवडते. म्हणूनच हल्लीच्या चित्रपटात खासकरून रोमँटिक चित्रपटात फ्रेश जोडी पाहायला मिळते. अशीच एक नवीन जोडी ‘आरपार’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या समोर येणार आहे.

नुकतेच आरपार या मराठी चित्रपटाचा (Marathi Movie) टिझर रिलीज झाला आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेता ललित प्रभाकर आणि अभिनेत्री हृता दुर्गुळे ही जोडी पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र येणार आहे. ही जोडी एकत्र दिसण्याआधीपासूनच या चित्रपटाची जोरदार चर्चा रंगू लागली आहे.

टायगर श्रॉफच्या ‘Baaghi 4’ चा टीझर प्रदर्शित, टायगर श्रॉफ दिसणार अ‍ॅक्शन मोडमध्ये

ललित व ऋता ‘आरपार’ या सिनेमातून पहिल्यांदाच रुपेरी पडदा गाजवणार आहेत. रोमँटिक कथा असलेल्या या सिनेमात ललित व ऋता यांचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळणार आहे. ‘प्रेमात अधलं मधलं काही नसतं’, याचे वर्णन दर्शविणारा हा सिनेमा आहे.

चित्रपट कधी होणार प्रदर्शित?

ललित प्रभाकर व हृता दुर्गुळे या दोघांच्याही वाढदिवसाच्या दिवशी म्हणजेच 12 सप्टेंबर रोजी त्यांचा हा पहिल्यांदाच एकत्रित काम केलेला ‘आरपार’ सिनेमा प्रदर्शित होणार आहे. दोन्ही कलाकारांसाठी ही अगदीच आनंदाची बाब आहे. या कलाकारांच्या चाहत्यांसाठी ही पर्वणीच म्हणायला हवी. हृता व ललित यांनी या चित्रपटासाठी पहिल्यांदाच एकत्रित काम केलं आहे. अर्थात ही जोडी एकत्र खूपच सुंदर दिसत असून त्यांचा रोमँटिक अंदाज प्रेक्षकांना नक्कीच भावणार यात काही शंका नाही.

विजय तेंडुलकरांचं ‘सखाराम बाईंडर’ पुन्हा एकदा रंगभूमीवर! सयाजी शिंदे साकारणार मुख्य पात्र

दमदार आणि तितकाच भावनिक टिझर

‘आरपार’ या चित्रपटाचा टीझरही प्रेमी युगुलांना संभ्रमात पाडणारा आहे. टीझर पाहून ऋता व ललित यांचा रोमँटिक अंदाज चित्रपटात पाहायला मिळणार की त्यांच्यातील वाद-विवाद आणि दुरावा दिसणार, हे अद्याप स्पष्ट होत नाही आहे. अर्थात हा टीझर ऋता व ललित यांच्यातील प्रेम आणि दुरावा याचे समीकरण असल्याचं पाहायला मिळत आहे. प्रेमात वेड लावायची ताकद असते फक्त पार्टनर चांगला मिळायला हवा हे टीझर पाहून स्पष्ट होतंय. टीझर पाहून अखेर ही जोडी एकमेकांना सोडून तर जाणार नाही ना हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात निर्माण होतोय.

‘लिऑन्स मीडिया प्रॉडक्शन एलएलपी’ प्रस्तुत, निर्माते नामदेव काटकर, रितेश चौधरी निर्मित ‘आरपार’ हा सिनेमा आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन, कथा, पटकथा, संवाद या धुरा गौरव पत्की यांनी सांभाळल्या आहेत. प्रेमाची अनोखी परिभाषा मांडणारा हा रोमँटिक सिनेमा हृता व ललित या नव्या जोडीसह 12 सप्टेंबरला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

Web Title: Lalit prabhakar hruta durgule new marathi film aarpar teaser released

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 11, 2025 | 03:09 PM

Topics:  

  • marathi entertainment
  • marathi movie
  • Marathi Movie News

संबंधित बातम्या

कढीपत्ता! ‘अ बिटरस्वीट लव्ह स्टोरी’, भूषण पाटीलच्या नव्या चित्रपटातून उलगडणार अनोखी प्रेमकहाणी
1

कढीपत्ता! ‘अ बिटरस्वीट लव्ह स्टोरी’, भूषण पाटीलच्या नव्या चित्रपटातून उलगडणार अनोखी प्रेमकहाणी

‘टँगो मल्हार’ चित्रपटातून उलगडणार एका रिक्षा चालकाचा प्रेरणादायी प्रवास, ‘या’ दिवशी चित्रपट होणार प्रदर्शित
2

‘टँगो मल्हार’ चित्रपटातून उलगडणार एका रिक्षा चालकाचा प्रेरणादायी प्रवास, ‘या’ दिवशी चित्रपट होणार प्रदर्शित

‘इतके दिवस गप्प राहिलो, ६,७०,१५१ चं पेमेंट अडकवलं…,’ मंदार देवस्थळींसाठी मालिकेच्या दिग्दर्शकाची पोस्ट चर्चेत
3

‘इतके दिवस गप्प राहिलो, ६,७०,१५१ चं पेमेंट अडकवलं…,’ मंदार देवस्थळींसाठी मालिकेच्या दिग्दर्शकाची पोस्ट चर्चेत

“छत्रपती शिवरायांची शपथ, आमच्या उद्देशांवर तुम्ही…” ‘खालिद का शिवाजी’ चित्रपटाच्या टीमचे ‘त्या’ वादग्रस्त डायलॉग्सवर स्पष्टीकरण
4

“छत्रपती शिवरायांची शपथ, आमच्या उद्देशांवर तुम्ही…” ‘खालिद का शिवाजी’ चित्रपटाच्या टीमचे ‘त्या’ वादग्रस्त डायलॉग्सवर स्पष्टीकरण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.