Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“मी स्वतः एका मुलीचा वडील म्हणून …” शुभ श्रावणी मालिकेतील पात्राबद्दल लोकेश गुप्तेंनी सांगितली खास गोष्ट, म्हणाले…

लोकेश गुप्ते हे ९ वर्षांनंतर छोट्या पडद्यावर येण्यासाठी सज्ज झाले असून त्यांनी या पात्रासाठी का होकार दिला हे सांगितले आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Jan 13, 2026 | 03:32 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेता लोकेश गुप्ते ९ वर्षांनंतर छोट्या पडद्यावर परत येणार आहेत. ते झी मराठीवरील ‘शुभ श्रावणी’ या मालिकेत शिक्षणमंत्री विश्वंभर राजेशिर्के याची भूमिका साकारणार आहेत.या मालिकेची कथा वडील आणि मुलगी यांच्या नात्यावर आधारित आहे. लोकेश म्हणाले की, विश्वंभरच्या भूतकाळातील काही कठीण आठवणी आहेत, ज्यांचा त्याच्या वागणुकीवर परिणाम आहे, पण तो आपल्या मुलीच्या शिक्षण आणि वाढीबाबत नेहमीच काळजी घेतो. तो शिस्तप्रिय, कडक पण लोकांना मदत करणारा नेता आहे. घरातील इतर सदस्यांशी त्याचे चांगले नाते आहे.लोकेश म्हणाले की, ९ वर्षांनंतर छोट्या पडद्यावर येणे आणि ही भूमिका साकारणे त्यांना खूप आवडले. विशेषतः वडील-मुलगीच्या नात्याची ही कथा त्यांना खूप भावली, म्हणून त्यांनी या भूमिकेस होकार दिला.

माझी भूमिका चॅलेंजिंग आणि खूप वेगळी आहे, ज्यात मला बऱ्याच वेगवेगळ्या इमोशनस साकारायची संधी मिळणार आहे. समाजात विश्वंभर हा एक नामांकित आणि समाज हितासाठीची काम करणारा व्यक्ती आहे. ह्या मालिकेत, घरात धाकटा भाऊ आहे, वहिनी आहे, मोठी बहीण आहे तिची मुलगी आहे, मुलगा आहे… असे बरेच नातेसंबंध आहेत ज्यांच्याशी विश्वंभरच खूप छान असं नातं आहे पण तिथेच त्याच त्याच्या मुलीशी अगदीच उलट विपरीत असं अबोल कठोर असे संबंध आहेत.

भूमिकेच्या तयारीबद्दल सांगायचे झाले तर निर्माते संदीप सिकंद, मालिकेचे दिग्दर्शक,लेखक आणि चॅनेल यांच्याकडून जी भूमिकेबद्दलची माहिती मिळाली ती माहिती मी सध्या गोळा करण्याच्या प्रयत्न करत आहे. विश्वंभरचा घरातला आणि बाहेरचा वावर, त्याची बॉडी लँग्वेजवर काम करत आहे. मी या आधी ज्या भूमिका केल्या त्यापेक्षा काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न मी करणार आहे. माझ्या आधीच्या भूमिकेपेक्षा माझी हि भूमिका नक्कीच लोकांना आवडेल, कारण माझ्या आधीच्या भूमिकेपेक्षा खूप काही चांगलं… वेगळं…ह्या भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळेल. या व्यक्तीरेखेसाठी मी माझं पुरेपूर देण्याचा प्रयत्न करणार आहे.

प्रेक्षकांचा अतिशय उत्तम असा प्रतिसाद मिळतोय. मला स्वतः ह्या गोष्टीचा आनंद होता कारण खूप वर्षांनी मी टेलिव्हिजन करत आहे. प्रेक्षकांची उत्कंठा बघून खूप बर वाटलं आणि खूप आनंद झाला. कंमेंट बद्दल सांगायचं तर मालिका कधी सुरु होणार आहे, यासाठी आम्ही खूप उत्सुक आहोत, हे वाचून खूप छान वाटलंच. पण माझ्या लक्षात राहणारी कंमेंट म्हणजे मला बऱ्याच वर्षाच्या गॅप नंतर टीव्हीवर बघायला, माझी भूमिका बघायला अजूनही प्रेक्षक उत्सुक आहेत, हे प्रेम बघून मस्त वाटलं. आमच्या शुभ श्रावणीच्या प्रोमोला जो प्रतिसाद मिळाला तो पाहून पण मी खूपच खुश झालो असच प्रेम कायम राहो.

“बेडरूममध्ये बंद करून माझ्यासोबत…”, प्रिती झिंटाच्या जवळच्या व्यक्तीने तिच्यासोबत केलं असं घाणेरडं कृत्य, भीतीने थरथर कापत होती

आमच्या शूटिंगच्या सेट वर भरपूर धमाल आणि पॉजीटीव्ह एनर्जी बघायला मिळते. प्रॉडक्शन, आमचे डायरेक्टर असोत किंवा आम्ही सहकलाकार असोत या बद्दल बोलायचं झालं तर सगळं एकदम उत्तम आहे. आसावरी सोबत मी पूर्वी हि काम केलेलं आहे, पण बाकी सगळे नवीन कलाकार हि खूप छान आहेत. पहिल्याच दिवसापासून छान सहयोग, एकोपा, धमाल सेटवर मला बघायला मिळाली आणि त्याच्यामुळे मला काम करताना जे सकारात्मक वातावरण लागत ते आमच्याकडे भयंकर आहे. सहकालाकांसोबत टीम म्हणून काम करताना मला तर खूपच छान उर्जावानआणि धमाल मज्जा वाटते. सध्या आम्ही सर्वच एकमेकांशी ओळखी वाढवतोय, व्यक्तीरेखेबद्दल चर्चा करतोय. आम्ही प्रत्येकजण स्वतःची व्यक्तीरेखा उत्तम साकारण्याच्या प्रयत्नात आहेत, प्रत्येकजण मेहनत घेतोय.

“मोदीजी, तुम्ही तमिळ जनतेचा आवाज दाबू शकत नाही,” विजयच्या “जन नायकन” चित्रपटाच्या समर्थनार्थ पुढे आले राहून गांधी!

Web Title: Lokesh gupte shared a special insight about his character in the show shubh shravani saying

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 13, 2026 | 03:32 PM

Topics:  

  • marathi actor
  • marathi serial news
  • zee marathi

संबंधित बातम्या

येड लागलं प्रेमाचं! विशाल निकमने दिली प्रेमाची कबुली, कोण आहे अभिनेत्याची ‘सौंदर्या’?
1

येड लागलं प्रेमाचं! विशाल निकमने दिली प्रेमाची कबुली, कोण आहे अभिनेत्याची ‘सौंदर्या’?

मकरसंक्रांत विशेष: ‘कमळी’ आणि ‘लक्ष्मी निवास’चा महासंगम, झी मराठीवर ७ दिवस ७ खुलासे
2

मकरसंक्रांत विशेष: ‘कमळी’ आणि ‘लक्ष्मी निवास’चा महासंगम, झी मराठीवर ७ दिवस ७ खुलासे

Exclusive: महत्त्वाची आणि आव्हानात्मक भूमिका, हळवी पण निर्भिड आजी – इला भाटे
3

Exclusive: महत्त्वाची आणि आव्हानात्मक भूमिका, हळवी पण निर्भिड आजी – इला भाटे

‘लग्नाचा शॉट’चा टिझर रिलीज, प्रियदर्शिनी-अभिजीत या नव्या जोडीचा चित्रपट ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित
4

‘लग्नाचा शॉट’चा टिझर रिलीज, प्रियदर्शिनी-अभिजीत या नव्या जोडीचा चित्रपट ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.