Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

लोकशाहीर विठ्ठल उमप स्मृती ‘मृदगंध पुरस्कार २०२५’ दिमाखात वितरण,भीमराव पांचाळे यांना जीवनगौरव

१५ वा लोकशाहीर विठ्ठल उमप स्मृती ‘मृदगंध पुरस्कार २०२५ गझलनवाझ भीमराव पांचाळे यांना देण्यात आला आहे

  • By अमृता यादव
Updated On: Nov 28, 2025 | 05:57 PM
(फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

लोककलेसाठी आपले आयुष्य समर्पित केलेल्या संगीत नाटक अकादमी, राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त महाराष्ट्र शिरोमणी लोकशाहीर विठ्ठल उमप यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित १५ वा लोकशाहीर विठ्ठल उमप स्मृती संगीत समारोह आणि ‘मृदगंध पुरस्कार २०२५’ च्या दिमाखदार समारंभात विविध क्षेत्रातील मान्यवरांना सन्मानित करण्यात आले.

पुरस्कार वितरणाच्या समारंभात गझलनवाझ भीमराव पांचाळे यांनी त्यांच्या भावना व्यक्त करत सांगितले, “मी मातीतला माणूस असून, लोककलेने माझे भरणपोषण केले. आज लोकशाहीर विठ्ठल उमप यांच्या नावाचा जीवनगौरव पुरस्कार मिळत असल्याचा आनंद अनमोल आहे. ‘निहाल हो गयी जिंदगी मेरी’ अशा शब्दांत मी आपली कृतज्ञता व्यक्त करतो.”

आपले अवघे आयुष्य लोककलेसाठी समर्पित करणाऱ्या संगीत नाटक अकादमी, राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त महाराष्ट्र शिरोमणी लोकशाहीर विठ्ठल उमप यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी विविध क्षेत्रातील मान्यवरांना ‘मृद‌्‌गंध पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात येते. यावर्षीच्या मृदगंध पुरस्कार विजेत्यांमध्ये शाहीर श्राजेंद्र राऊत (लोककला क्षेत्र),प्रदीप शिंदे (शिल्पकला), अभिनेते जयवंत वाडकर (अभिनय क्षेत्र), परेश मोकाशी (दिग्दर्शक), श्रीमती मधुगंधा कुलकर्णी (अभिनेत्री आणि निर्माती), अभिनेत्री रिंकू राजगुरू (नवोन्मेष प्रतिभा-अभिनय क्षेत्र) यांना ‘मृद‌्‌गंध पुरस्कार २०२५’ देऊन सन्मानित करण्यात आले. लोकशाहीर विठ्ठल उमप यांच्या नावाचा हा पुरस्कार आमच्यासाठी लाखमोलाचा असल्याची भावना मान्यवर पुरस्कार विजेत्यांनी व्यक्त केली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड.आशिष शेलार, अर्थतज्ज्ञ-माजी खासदार भालचंद्र मुणगेकर, भाजपचे मुंबई अध्यक्ष आमदार अमित साटम, यांच्यासह संगीत-अभिनय क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती.

लोकशाहीर विठ्ठल उमप यांच्या स्मरणार्थ आयोजित मृदगंध पुरस्कार समारंभात, त्यांच्या चिरंजीव, प्रसिद्ध गायक आणि विठ्ठल उमप फाऊंडेशनचे अध्यक्ष नंदेश वत्सला विठ्ठल उमप यांनी उपस्थितांचे आभार मानले, “रसिक मायपाब आणि कुटुंबाच्या साथीने मी माझ्या बाबांना आठवणीतून जिवंत ठेवू शकलो. बाबांच्या स्मरणार्थ दिल्या जाणाऱ्या या पुरस्काराच्या निमित्ताने आपले ऋणानुबंध आणि रसिकांचे प्रेम आमच्यावर असंच कायम राहू द्या.”

या वेळी सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार यांनीही भाष्य केले,“लोकशाहीर विठ्ठल उमप यांचा पहाडी आवाज हा महाराष्ट्राच्या चळवळीचा आवाज होता. वंचितांच्या आवाजाचं प्रतिनिधित्व करत त्यांनी लोककलेच्या माध्यमातून जो संघर्ष उभा केला, ते अत्यंत कौतुकास्पद आहे. आता नंदेश त्यांच्या कार्याला ज्या पद्धतीने पुढे नेत आहेत आणि उत्कृष्ट कलाकारांना पुरस्काराद्वारे कौतुकाचं बळ देत आहेत, ते नक्कीच अभिनंदनीय आहे.”

लोककलेचा नवा संगम, महाराष्ट्रात धुमाकूळ घालणारे ‘द फोल्क आख्यान’ चे संगीतकार आता पहिल्यांदाच मराठी चित्रपटाला देणार संगीत

समाजातील कलावंतांच्या योगदानाचा उल्लेख करत अर्थतज्ज्ञ आणि माजी खासदार भालचंद्र मुणगेकर म्हणाले, “आपल्या भौतिक गरजा भागल्या की आपलं आयुष्य समृद्ध होतं असं नाही. सामाजिक आरोग्यासाठी कला तितकीच महत्त्वाची असते. ती जपण्याचं, वाढवण्याचं काम हे कलावंत सातत्याने करत आहेत. त्यांच्या योगदानाबद्दल मी मनापासून आभार व्यक्त करतो.”

मराठमोळ्या रोहित राऊतने मारली बाजी; भारताचा पहिला I-Popstar म्हणून देशभरात उमटवला ठसा

Web Title: Lokshahir vitthal umap memorial mrudgandh awards 2025 bhimrao panchale honoured with the lifetime achievement award

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 28, 2025 | 05:57 PM

Topics:  

  • Ashish Shelar
  • awarded
  • Entertainemnt News

संबंधित बातम्या

टोक्योत अल्लू अर्जुनची जादू! ‘पुष्पा 2’ प्रीमियरमध्ये जपानी भाषेत ऐकवला आयकॉनिक डायलॉग, चाहते चकित
1

टोक्योत अल्लू अर्जुनची जादू! ‘पुष्पा 2’ प्रीमियरमध्ये जपानी भाषेत ऐकवला आयकॉनिक डायलॉग, चाहते चकित

एक महिना घरात बंद राहिलेला ‘हा’ अभिनेता ठरला The 50 या शोचा पहिला स्पर्धेक, पोस्ट करत म्हणाला, “एका सिंहाला दुसऱ्या सिंहाने”
2

एक महिना घरात बंद राहिलेला ‘हा’ अभिनेता ठरला The 50 या शोचा पहिला स्पर्धेक, पोस्ट करत म्हणाला, “एका सिंहाला दुसऱ्या सिंहाने”

‘दिल्ली थंड आहे, गाडीतच लैंगिक संबंध ठेवायला खूप…”, लाइव्ह कॉन्सर्टमध्ये Honey Singh ने पार केली सर्व मर्यादा
3

‘दिल्ली थंड आहे, गाडीतच लैंगिक संबंध ठेवायला खूप…”, लाइव्ह कॉन्सर्टमध्ये Honey Singh ने पार केली सर्व मर्यादा

Bigg Boss Marathi 6 : ”मी वाईटच बरी”, बिग बॉसच्या घरात दोन मोठे राडे होणार, कोण ठरणार वरचढ?
4

Bigg Boss Marathi 6 : ”मी वाईटच बरी”, बिग बॉसच्या घरात दोन मोठे राडे होणार, कोण ठरणार वरचढ?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.