(फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)
सहा अविस्मरणीय आठवडे आणि तब्बल 85 ओरिजनल ट्रॅक्सनंतर देशभरात नव्या, स्वतंत्र पॉप आवाजांची लाट आणणाऱ्या अॅमेझॉन एमक्स प्लेयरवरील आय- पॉपस्टारच्या पहिल्या सीझनची सांगता झाली. भारतातील म्युझिक रिअलिटी शोजमधे नवा मापदंड प्रस्थापित करणाऱ्या या शो ची सांगता एका दिमाखदार अंतिम फेरीसह करण्यात आली. प्रेक्षकांचा अभूतपूर्व प्रतिसाद, सोशल मीडियावर गाजणारी नवी गाणी आणि एका रात्रीत स्टार बनणारे आर्टिस्ट यांच्यासह झालेल्या या अंतिम फेरीत अस्सल कला आणि भारतीय पॉप संगीताचा पुनर्जन्म साजरा करण्यात आला.
अंतिम फेरीची सुरुवात स्पर्धकांनी स्टेजवर जबरदस्त परफॉर्मन्स सादर करत झाली. प्रत्येकाच्या आवाजातून भारताच्या या सर्वात मोठ्या स्टेजवर त्यांचा प्रवास उलगडला. चरण पथानिया याने कॉन्सर्ट- स्टाइलमधे आपला परफॉर्मन्स सादर करत अंतिम फेरीची दमदार सुरुवात केली. यावेळी गायिका राधिका भिडेने आपला परफॉर्मन्स सादर करण्यापूर्वी मुनावर फारूकी याची अनोखी ओळख करून दिली तो क्षण सर्वांसाठीच हृद्यस्पर्शी होता. त्यानंतर राधिकाने सर्वांसमोर, विशेषतः रत्नागिरीवरून आलेल्या आपल्या कुटुंबासमोर गायन सादर केलं. त्यानंतर मुनावर ने आपली एका नर्मविनोदी स्टँडअपमधून सर्वांचा मूड बदलला आणि त्याचवेळेस प्रिन्स नरूला खास पाहुणे म्हणून मेंटॉर्समधे सहभागी झाले. त्यांनी या शोला मिळत असलेल्या लोकप्रियतेचं भरभरून कौतुक केलं आणि आपल्या मुलीचा आय- पॉपस्टारमधल्या गाण्यांवर ताल धरत असतानाचा व्हिडिओही दाखवला. अंतिम स्पर्धकांनी त्यांचं सादरीकरण पूर्ण केल्यानंतर संपूर्ण भारत ज्या क्षणाची वाट पाहात होता, त्या क्षणासाठी स्टेज सज्ज करण्यात आलं.
टॉप 2 मधे टीम किंगचे रिषभ पांचाल आणि टीम पर्मिशचे रोहित राऊत यांचा समावेश होता. काही क्षणानंतर रोहित राऊतला पहिल्यावहिल्या आय- पॉपस्टारचा विजेता घोषित करण्यात आलं आणि 7,00,000 रुपयांचं बक्षिस प्रदान करण्यात आलं. रनर अप ठरलेल्या रिषभ पांचाल याला 3,00,000 रुपयांचं बक्षिस मिळालं. दोघांना यावेळी केवळ बक्षिसंच नव्हे, तर देशभरात चाहतावर्गही मिळाला.
रणवीर सिंगचा ‘धुरंधर’ अडकला कायद्याच्या कचाट्यात! रिलीजआधीच उच्च न्यायालयात पोहचले प्रकरण
रोहित राऊतने अतिशय भावनिक शब्दांत आपला प्रवास उलगडला. तो म्हणाला, ‘आय- पॉपस्टारमधे मी कलाकार म्हणून स्वतःची वेगळी ओळख शोधायचा प्रयत्न केला आणि काही आठवड्यांनंतर आज मी विजेतेपदी उभा आहे. या विजेतेपदानं मला माझ्या कलेचा पाठपुरावा करण्यासाठी आत्मविश्वास दिला आहे. मी माझे मेंटॉर परमिश पाजी यांचा आभारी आहे. त्यांच्याशिवाय आणि अर्थातच माझ्यावर विश्वास दाखवणाऱ्या चाहत्यांशिवाय हे शक्य झालं नसतं. हा पुरस्कार मी आपल्या चौकटीबाहेर पडून गुणवत्ता सिद्ध करण्याची इच्छा असलेल्या प्रत्येक प्रादेशिक कलाकाराला अर्पण करतो. सरतेशेवटी अॅमेझॉन एमएक्स प्लेयरनं माझ्यासारख्या स्वतंत्र कलाकाराला हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करत गुणवत्ता दर्शवण्याची आणि लाखो लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी दिल्याबद्दल मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो.’
रोहितच्या यशाबद्दल आनंद व्यक्त करत परमिश वर्मा म्हणाले, ‘या कलाकारांनी दाखवलेली पॅशन असामान्य आहे. ते इथे आले, तेव्हा आपलं अस्तित्व शोधत होते आणि हळूहळू त्यांनी आपली कला अधिक दमदारपणे देशभरातील प्रेक्षकांसमोर सादर करायला सुरुवात केली. पहिलावहिला आय- पॉपस्टार माझ्या टीमचा आहे याचा मला अभिमान वाटतो. पहिल्या दिवसापासूनच रोहितने आपली गुणवत्ता दाखवायला सुरुवात केली होती आणि त्याला विकसित होताना, प्रयोग करताना, सर्वांना खिळवून ठेवताना पाहणं निव्वळ आनंददायी होती. आमच्यासाठी ही गोष्ट या शोच्या यशापेक्षाही मोठी आहे. हा भारत मोठ्या स्तरावर स्वतंत्र पॉपसाठी तयार असल्याचा पुरावा आहे.’






