
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
आज साहित्य संमेलनाच्या उदघाटनाला प्रमुख पाहुणे म्हणून राज्यचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर हिंदीची सक्ती मागे घेण्याची मागणी केली. नेमके मिलिंद जोशी आणि विनोद कुलकर्णी काय म्हणाले ते जाणून घेऊयात.
महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष मिलिंद जोशी म्हणाले, “ महाराष्ट्रावर केवळ मराठीचाच अधिकार आहे. महाराष्ट्रात मराठीचीच सक्ती झाली पाहिजे. माय मराठीची अवहेलना होत असताना हिंदी भाषेची सक्ती मागे घेतली पाहिजे. प्रत्येक गावातील ग्रंथालये समृद्ध झाली पाहिजेत. मराठीला तिच्या हक्काचा वाटा मिळालाच पाहिजे.”