Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मंजिरी फडणीस आणि अभिजीत चंद्रकला यांचं गायनात पदार्पण, ‘बाप्या’मधील ‘एकाकी’ गाणं प्रदर्शित

'बाप्या' या आगामी चित्रपटातील ‘एकाकी’ हे हळवे आणि भावनिक गाणे नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीला आले असून प्रेक्षकांच्या मनाला भिडत आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Apr 22, 2026 | 11:41 AM
(फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

वर्किंग आय फिल्म्सच्या ‘बाप्या’ या आगामी मराठी चित्रपटातून एक भावस्पर्शी संगीत कलाकृती प्रेक्षकांसमोर आली आहे. ‘एकाकी’ असे शीर्षक असलेले हे गाणे नात्यांमधील दुरावा, मनातील एकटेपणा आणि भावनांची खोलवर जाणीव यांना अत्यंत प्रभावीपणे व्यक्त करते. हळुवार चालीत गुंफलेले हे गाणे ऐकताना प्रेक्षकांना स्वतःच्या अनुभवांचीही आठवण करून देते, त्यामुळे ते थेट मनाला भिडते.या गाण्याचे संगीत दिग्दर्शन अभिजीत चंद्रकला यांनी केले असून, शौनक नारळे (असर) यांनी त्याला अर्थपूर्ण आणि हृदयस्पर्शी शब्द दिले आहेत. सुरेल संगीत आणि संवेदनशील गीतलेखन यांचा सुंदर संगम ‘एकाकी’मध्ये पाहायला मिळतो.विशेष लक्ष वेधून घेणारी बाब म्हणजे अभिनेत्री मंजिरी फडणीस हिने या गाण्याद्वारे गायन क्षेत्रात पदार्पण केले आहे. अभिनयातून आधीच प्रेक्षकांची मनं जिंकलेली मंजिरी आता आपल्या आवाजातूनही भावनांची प्रभावी अभिव्यक्ती करताना दिसते. तिच्या आवाजातील कोमलता गाण्याला एक वेगळीच उंची देते.
याचबरोबर, अभिजीत चंद्रकला यांनीही या गाण्यात आपला आवाज दिला आहे. संगीत दिग्दर्शक म्हणून ओळख असतानाही त्यांनी गायकीतही तितक्याच ताकदीने छाप पाडली आहे. ‘एकाकी’ या गाण्याच्या निमित्ताने दोघांचेही गायनातील पहिले पाऊल ठरत असून, या गाण्यामुळे ‘बाप्या’ चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे.

आजच्या धावपळीच्या आयुष्यात नात्यांमधील संवाद हरवत चालला आहे. अशा वेळी ‘एकाकी’ हे गाणे प्रत्येकाच्या मनातल्या एकटेपणाला स्पर्श करते. आपल्या जवळची माणसे असूनही आपण कधी कधी किती दूर जातो, ही भावना या गाण्यातून प्रकर्षाने जाणवते.

आदित्य धर यांची निवड ठरली यशस्वी, रणवीर सिंहच्या कामाची सर्वत्र प्रशंसा; मुकेश छाबडांनी दिली दाद

आपल्या गायकीच्या पदार्पणाबद्दल मंजिरी फडणीस म्हणते, ”संगीत हा माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. लहानपणापासूनच घरात संगीताची परंपरा असल्यामुळे स्टेजवर गाणं आणि नृत्य करत मोठी झाले. अभिनेत्री होण्याआधी ‘चॅनल व्ही पॉपस्टार्स’मध्येही सहभागी झाले होते. परंतु तिथे माझी निवड झाली नाही.अभिनयासोबतच शास्त्रीय संगीताचं शिक्षण सुरू ठेवत २०१८ पासून मी गाण्याकडे अधिक व्यावसायिक दृष्टीने पाहायला सुरुवात केली. लॉकडाउनदरम्यान सोशल मीडियावर शेअर केलेल्या गाण्यांना मिळालेल्या उत्तम प्रतिसादामुळे आत्मविश्वास वाढला. समीर आणि माझी पूर्वीपासूनची ओळख. आम्ही एकत्र जाहिराती केल्या होत्या. त्यामुळे चित्रपटाबद्दल त्याने मला सांगितले आणि संधी दिली आणि आता माझे पहिले गाणे ‘बाप्या’ मधून भेटीला येत आहे.”

दिग्दर्शक समीर तिवारी यांनी ‘एकाकी’ या गाण्यामागील भावविश्व स्पष्ट करताना सांगितले की, “हे गाणे नात्यांमधील न बोललेले भाव आणि मनात साचलेली पोकळी व्यक्त करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात कधीतरी येणाऱ्या एकटेपणाच्या हळव्या भावनेला हे गाणे स्पर्श करते. त्यामुळेच ते प्रेक्षकांच्या मनाला नक्कीच भिडेल, असा मला विश्वास आहे.”

Vishal Kotian Bigg Boss : “मी मुलींचा लकी चार्म…” Second रनर अप विशाल शेवटी व्यक्त झालाच!

समीर तिवारी दिग्दर्शित ‘बाप्या’ या चित्रपटाची निर्मिती मुत्कल तेलंग आणि समीर तिवारी यांनी केली आहे. यापूर्वीच युवावर्गाच्या उर्जेने आणि वेगळ्या दृश्यशैलीने सजलेले ‘कारट्या’ हे गाणे चर्चेत आले होते. त्यानंतर आता ‘एकाकी’ या भावनिक गाण्यानेही प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे.

१५ मे २०२६ रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढत असून, दमदार स्टारकास्टही या चित्रपटाचे वैशिष्ट्य ठरत आहे. ‘बाप्या’मध्ये गिरीश कुलकर्णी, राजश्री देशपांडे, श्रीकांत यादव, देविका दफ्तरदार, आर्यन मेंगजी आणि गौरी किरण यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Web Title: Manjiri fadnis and abhijit chandrakala make their singing debut ekaki song from bapya released

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 22, 2026 | 11:41 AM

Topics:  

  • Marathi Entertainment News
  • Marathi News

संबंधित बातम्या

World Energy Crisis : जगाची ८१% ऊर्जा अजूनही जीवाश्म इंधनांवर; युद्धामुळे पुरवठ्याची चिंता वाढली
1

World Energy Crisis : जगाची ८१% ऊर्जा अजूनही जीवाश्म इंधनांवर; युद्धामुळे पुरवठ्याची चिंता वाढली

Wai News : मांढरगडावर आदिशक्तीचा जागर! काळूबाई देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवाला भक्तिमय वातावरणात प्रारंभ
2

Wai News : मांढरगडावर आदिशक्तीचा जागर! काळूबाई देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवाला भक्तिमय वातावरणात प्रारंभ

Baramati News :सोमेश्वर कारखाना मतमोजणीचा वाहतुकीला फटका; शारदानगर ते राजहंस चौक मार्ग बंद, पर्यायी रस्त्यांचा वापर करा!
3

Baramati News :सोमेश्वर कारखाना मतमोजणीचा वाहतुकीला फटका; शारदानगर ते राजहंस चौक मार्ग बंद, पर्यायी रस्त्यांचा वापर करा!

India Business News : अंबानींच्या जिओला मस्क यांचे थेट आव्हान; भारतात स्वस्त स्टारलिंक आणण्याची तयारी!
4

India Business News : अंबानींच्या जिओला मस्क यांचे थेट आव्हान; भारतात स्वस्त स्टारलिंक आणण्याची तयारी!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.