Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘आतली बातमी फुटली’ चित्रपटाचा रंजक टिझर प्रदर्शित, मोहन आगाशे आणि रोहिणी हट्टगंडी पहिल्यांदाच एकत्र

सध्या मराठी चित्रपटांची मेजवानी प्रेक्षकांना मिळणार आहे, याचदरम्यान आता 'आतली बातमी फुटली’ या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटामध्ये मोहन आगाशे, रोहिणी हट्टगंडी आणि सिद्धार्थ जाधव एकत्र दिसणार आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Jul 15, 2025 | 05:36 PM
(फोटो सौजय -इन्स्टाग्राम)

(फोटो सौजय -इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

पती पत्नीचं नातं हे प्रेम आणि विश्वास यावर खंबीरपणे टिकून असते. काही कारणाने याच नात्यात कटुता येऊन जोडीदाराच्या खुनाची सुपारी देण्याची वेळ आलेल्या एका नवऱ्याची आणि सुपारी घेणाऱ्या व्यक्तीची उडणारी त्रेधातिरपीट दाखविणारा ‘आतली बातमी फुटली’ या आगामी मराठी चित्रपटाचा रंजक टिझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. अभिनेते मोहन आगाशे यांनी संवादातून आणि अभिनेता सिद्धार्थ जाधव यांनी आपल्या देहबोलीतून या टिझरची रंगत वाढवली आहे.

का पाहावा ‘आता थांबायचं नाय’ चित्रपट? ‘ही’ आहेत ५ कारण, ज्याने बदलेल तुमचा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन

केवळ शक्यतांचा अंदाज बांधून खुनाच्या सुपारी भोवती फिरणाऱ्या चित्रपटाच्या टिझरमधून एकमेकांवर कुरघोडी करण्याचा खेळ असा काहीसा गमतीशीर मामला प्रथमदर्शनी वाटतोय. वीजी फिल्म्स या बॅनरअंतर्गत दिग्दर्शक विशाल पी. गांधी आणि जैनेश इजरदार ‘आतली बातमी फुटली’ हा नवाकोरा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी घेऊन आले आहेत. येत्या १९ सप्टेंबरला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची रंजक कथा प्रेक्षकांचं नक्कीच भरभरून मनोरंजन करेल.

ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे, ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टगंडी, पॉवरपॅक्ड अभिनेता सिद्धार्थ जाधव असे मराठीतले नामवंत चेहरे या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र आले आहेत. या तिघांसोबत विजय निकम, भारत गणेशपुरे,आनंदा कारेकर, प्रीतम कागणे, त्रिशा ठोसर आदि कलाकारांची जमून आलेली भट्टी आणि खिळवून ठेवणारी कथा असलेला ‘आतली बातमी फुटली’ प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची ट्रीट ठरणार आहे. या चित्रपटाची निर्मिती विशाल पी.गांधी आणि ग्रीष्मा अडवाणी यांची आहे. सहनिर्माता अम्मन अडवाणी तर सहयोगी दिग्दर्शक जीवक मुनतोडे आहेत.

अरिशफा खानची बिघडली प्रकृती, ‘Bigg Boss’ च्या घरात जाण्याआधीच रुग्णालयात दाखल

‘आतली बातमी फुटली’ चित्रपटाचे छायांकन अमित सुरेश कोडोथ तर संकलन रवी चौहान यांचे आहे. संगीत एग्नेल रोमन यांनी दिले आहे. कथा जैनेश इजरदार यांनी तर पटकथा जीवक मुनतोडे, अम्मन अडवाणी,जैनेश इजरदार, विशाल पी. गांधी यांचेआहे. संवाद लेखन जीवक मुनतोडे आणि अद्वैत करंबेळकर यांनी केले आहेत. वेशभूषा ग्रीष्मा अडवाणी यांची, नृत्यदिग्दर्शन राहुल ठोंबरे, तिजो जॉर्ज यांचे आहे. प्रॉडक्शन डिझायनर रवी नाईक आहेत. कास्टिंग दिग्दर्शन जोकीम थोरास यांनी केले आहे, तर कार्यकारी निर्माते अब्दुल खान आहेत. १९ सप्टेंबरला प्रदर्शित होणाऱ्या ‘आतली बातमी फुटली’ चित्रपटाच्या वितरणाची जबाबदारी फिल्मास्त्र स्टुडिओजने सांभाळली आहे.

Web Title: Mohan agashe rohini hattangadi first time together in aatli batmi putali release teaser

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 15, 2025 | 04:07 PM

Topics:  

  • Bollywood
  • entertainment
  • marathi cinema

संबंधित बातम्या

फिनाले आधीच Bigg Boss 19 च्या विजेत्यांचे नाव आले समोर, ही बघा TOP 5 फायनलिस्टची यादी
1

फिनाले आधीच Bigg Boss 19 च्या विजेत्यांचे नाव आले समोर, ही बघा TOP 5 फायनलिस्टची यादी

उद्योगपती वेदांत बिर्ला अडकला लग्नबंधनात, दीर्घकालीन मैत्रीण तेजल कुलकर्णीशी केले लग्न
2

उद्योगपती वेदांत बिर्ला अडकला लग्नबंधनात, दीर्घकालीन मैत्रीण तेजल कुलकर्णीशी केले लग्न

सोनाक्षीला लग्नानंतर सासू- सासऱ्यांसोबत राहण्याची नव्हती इच्छा? पती झहीरला आधीच केले स्पष्ट
3

सोनाक्षीला लग्नानंतर सासू- सासऱ्यांसोबत राहण्याची नव्हती इच्छा? पती झहीरला आधीच केले स्पष्ट

Bigg Boss 19: मालतीने तान्याला दिली कानफडात मारण्याची धमकी; ‘या’ ५ स्पर्धकांच्या डोक्यावर लटकली नॉमिनेशनची तलवार
4

Bigg Boss 19: मालतीने तान्याला दिली कानफडात मारण्याची धमकी; ‘या’ ५ स्पर्धकांच्या डोक्यावर लटकली नॉमिनेशनची तलवार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.