Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘निर्धार’चे धमाकेदार युथफूल गाणे प्रदर्शित; ‘वंदे मातरम…’ रसिकांना भुरळ घालणार!

मनोरंजनासोबतच प्रबोधन करीत तरुणाईला नवी दिशा देण्याचेही काम करणारा हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Nov 15, 2025 | 12:55 PM
(फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

तरुणाईवर आधारलेल्या चित्रपटांनी नेहमीच रसिकांच्या मनाचा ठाव घेतला आहे. अशाच तरुणाईची गोष्ट ‘निर्धार’ या आगामी मराठी संगीतप्रधान चित्रपटात पाहायला मिळणार आहे. ‘निर्धार’ या शीर्षकातच काहीतरी सांगायचे असल्याचे संकेत देणारा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज आहे. मनोरंजनासोबतच प्रबोधन करीत तरुणाईला नवी दिशा देण्याचेही काम करणारा हा चित्रपट येत्या २८ नोव्हेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातील युथफूल गाणे नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे. प्रदर्शित झाल्यापासून हे गाणे सोशल मीडियावर रसिकांचे लक्ष वेधत आहे.

निर्मात्या पद्मजा वालावलकर यांनी जयलक्ष्मी क्रिएशनच्या बॅनरखाली ‘निर्धार’ चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटाचे लेखन दिनानाथ वालावलकर यांनी केले असून, दिग्दर्शन दिलीप भोपळे यांनी केले आहे. ‘निर्धार’मधील ‘वंदे मातरम…’ हे आजच्या तरुणाईच्या उत्स्फूर्त भावना व्यक्त करणारे गाणे प्रदर्शित झाले आहे. लेखक-गीतकार दिनानाथ वालावलकर यांनी लिहिलेले हे गाणे लयश्री वेणुगोपाल आणि ओंकार सोनावणे यांनी गायले आहे. संगीत दिग्दर्शन आणि संगीत, संगीत संयोजन राज जनार्दन पादारे यांनी केले आहे. तरुण मुले-मुली ओपन जीपने रस्त्याने प्रवास करत असतानाचे हे गाणे आहे. त्यातील एक तरुण गिटार, तर दुसरा बासरी वाजवून गाण्यात सुरेल स्वर भरण्याचे काम करतो. अर्थपूर्ण शब्दरचना आणि कर्णमधूर संगीत हे या गाण्याचे मुख्य वैशिष्ट्य आहे. निसर्गरम्य लोकेशन्स आणि प्रसंगानुरूप सिनेमॅटोग्राफी ही या गाण्याची जमेची बाजू आहे. कथेच्या प्रवाहाशी एकरूप होणारे हे गाणे महत्त्वाची भूमिका बजावणारे आहे. कथानकाला गती मिळवून देणारे हे गाणे चित्रपटात एका महत्त्वाच्या टप्प्यावर येते.

चौथ्या एनिवर्सीच्या दिनी Rajkummar Rao – Patralekha च्या घरी आली लक्ष्मी! लग्नाच्या वाढदिवशी दिला मुलीला जन्म

पिकल एंटरटेनमेंट वितरक असलेल्या ‘निर्धार’मध्ये डॉ. गिरीश ओक, सौरभ गोगटे, पल्लवी पटवर्धन, प्रज्ञा केळकर, मिलिंद ऊके, उमेश बोळके, अभिनव कुरणे, जान्हवी सावंत, ऋतुजा कनोजिया, अभय पाटील, श्रेयस मोहिते, दिनानाथ वालावलकर, युवराज झुगर, केतकी पाटील, पल्लवी प्रसाद, आनंद पाटील, सुरेंद्र केतकर, विद्या डांगे, एन. डी. चौगुले, कोमल रणदिवे हे कलाकार आहेत. सिनेमॅटोग्राफी अतुल सुपारे यांनी केली असून, नृत्य दिग्दर्शन संग्राम भालकर यांनी केले आहे. कला दिग्दर्शन विकी बिडकर यांनी केलं असून, निर्मिती व्यवस्थापन कैलास भालेराव यांचे आहे. रंगभूषा अतुल शिधये करत असून, वेशभूषा प्रशांत पारकर यांनी केली आहे. राहुल पाटील या चित्रपटाचे सहदिग्दर्शक असून, संतोष जाधव प्रमुख सहाय्य्क दिग्दर्शक आहेत. अजय खाडे लाईन प्रोड्युसर, तर अथर्व वालावलकर क्रिएटिव्ह प्रोड्यूसर आहेत.

Bigg Boss 19 : खरं की काय? कुनिका सदानंद मालती चहरला म्हणाली ‘लेस्बियन’ तान्या मित्तलला सांगितली की, “मला खात्री आहे…”

Web Title: Nirdhar film releases its new track vande mataram

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 15, 2025 | 12:55 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • marathi cinema
  • marathi movie

संबंधित बातम्या

”कपडे काढ अन् नाच…”, सेटवर धक्कादायक प्रकार, दिग्दर्शकाने प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत केली होती गैरवर्तणूक
1

”कपडे काढ अन् नाच…”, सेटवर धक्कादायक प्रकार, दिग्दर्शकाने प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत केली होती गैरवर्तणूक

”सूर्यकुमार यादव खूप मेसेज करायचा,पण आता..”, बोल्ड अभिनेत्रीचा धक्कादायक दावा
2

”सूर्यकुमार यादव खूप मेसेज करायचा,पण आता..”, बोल्ड अभिनेत्रीचा धक्कादायक दावा

‘आमचा तिच्याशी काहीही संबंध नाही..’ टीव्ही अभिनेत्रीच्या सुनेचा कांड, 10 कोटी खंडणी प्रकरणात केली अटक
3

‘आमचा तिच्याशी काहीही संबंध नाही..’ टीव्ही अभिनेत्रीच्या सुनेचा कांड, 10 कोटी खंडणी प्रकरणात केली अटक

‘Jabrat’मध्ये पाहायला मिळणार महाराष्ट्राची खास लावणी, हिंदवी पाटील –  सुरेखा कुडची गाजवणार लावणीचा फड
4

‘Jabrat’मध्ये पाहायला मिळणार महाराष्ट्राची खास लावणी, हिंदवी पाटील – सुरेखा कुडची गाजवणार लावणीचा फड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.