Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tighee Movie: तीन स्त्रिया, एक भावस्पर्शी कथा, पीआयएफएफच्या मराठी सिनेमा कॉम्पिटिशन विभागात ‘तिघी’ची अधिकृत निवड

२४ व्या पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलच्या 'मराठी सिनेमा कॉम्पिटिशन' विभागात 'तिघी' ची अधिकृत निवड झाली आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Jan 02, 2026 | 06:00 PM
(फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

सुप्री मीडिया प्रस्तुत, कोक्लिको पिक्चर्स निर्मित आणि जीजिविषा काळे दिग्दर्शित ‘तिघी’ या चित्रपटाची काही दिवसांपूर्वीच घोषणा झाली होती. घोषणेपासूनच प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबद्दल चर्चा सुरु आहे. हा भावस्पर्शी चित्रपट आता आणखी एका महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचला आहे. २४ व्या पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल (पीआयएफएफ) च्या मराठी सिनेमा कॉम्पिटिशन विभागात ‘तिघी’ची अधिकृत निवड झाली आहे. आई-मुलींच्या नात्यातील न बोललेल्या भावना, आठवणी आणि स्त्रियांच्या भावविश्वाचा हळुवार वेध घेणारा हा चित्रपट येत्या ६ मार्च २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची निर्मिती नेहा पेंडसे बायस, निखिल महाजन, सुहृद गोडबोले, स्वप्निल भंगाळे यांनी केली आहे. तसेच या आधी या टीमचे ‘पुणे ५२’, ‘गोदावरी’, ‘जून’, ‘रावसाहेब’ हे चित्रपट या फेस्टिवलमध्ये झळकले आहेत. ‘तिघी’ च्या निमित्ताने पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलसोबत त्यांचा हा प्रवास पुढे सुरु आहे.

‘तिघींच्या जगण्यातलं चौथं पान’ उलगडत असताना, बदलत्या काळात नात्यांमध्ये येणारे भावनिक चढ-उतार आणि आयुष्याकडे पाहाण्याचे वेगवेगळे दृष्टिकोन प्रभावीपणे या चित्रपटात मांडण्यात आले आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन जीजिविषा काळे यांनी केले असून, चित्रपटात भारती आचरेकर, नेहा पेंडसे बायस आणि सोनाली कुलकर्णी या तीन दमदार अभिनेत्री महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत.

रणवीर सिंगचा ‘धुरंधर’ ‘या’ राज्यात झाला Tax Free, निर्मात्यांना नवीन वर्षात मिळाली आनंदाची बातमी

संवेदनशील विषय, सशक्त अभिनय आणि नात्यांवर भाष्य करणारी कथा यामुळे हा चित्रपट महोत्सवाच्या चौकटीतही ठळकपणे लक्ष वेधून घेत आहे. प्रेक्षकांना केवळ मनोरंजन नव्हे, तर आशयघन आणि संवेदनशील कथा अनुभवायला मिळाव्यात, हाच कोक्लिको पिक्चर्सचा मुख्य उद्देश आहे. समाजाशी जोडलेल्या, मनाला स्पर्श करणाऱ्या कथा पडद्यावर साकारत प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणे यावर या निर्मितीसंस्थेचा भर असतो. प्रेक्षकांसाठी दर्जेदार आशय देण्याचे ध्येय कोक्लिको पिक्चर्स सातत्याने जपत आहे.

‘महाकाली’च्या सेटवरून Akshaye Khanna चा पहिला लूक व्हायरल, चाहत्यांची उत्सुकता वाढली; चित्रपट कधी होणार रिलीज?

Web Title: Official selection of tighee in the marathi cinema competition at the 24th pune international film festival

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 02, 2026 | 06:00 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • marathi movie

संबंधित बातम्या

‘Battle Of Galwan’चे फुटेज लीक? बर्फावर जखमी अवस्थेत रांगताना दिसला सलमान खान
1

‘Battle Of Galwan’चे फुटेज लीक? बर्फावर जखमी अवस्थेत रांगताना दिसला सलमान खान

‘महाकाली’च्या सेटवरून Akshaye Khanna चा पहिला लूक व्हायरल, चाहत्यांची उत्सुकता वाढली; चित्रपट कधी होणार रिलीज?
2

‘महाकाली’च्या सेटवरून Akshaye Khanna चा पहिला लूक व्हायरल, चाहत्यांची उत्सुकता वाढली; चित्रपट कधी होणार रिलीज?

व्हॅलेंटाईन्सनिमित्त येणार हटके लव्हस्टोरी ‘रुबाब’, चित्रपटाद्वारे शेखर बापू रणखांबे यांचे दिग्दर्शनात पदार्पण
3

व्हॅलेंटाईन्सनिमित्त येणार हटके लव्हस्टोरी ‘रुबाब’, चित्रपटाद्वारे शेखर बापू रणखांबे यांचे दिग्दर्शनात पदार्पण

Movie Review : ‘मराठी शाळा टिकवा, मराठी भाषा जगवा’, प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयाला भिडेल असा चित्रपट!
4

Movie Review : ‘मराठी शाळा टिकवा, मराठी भाषा जगवा’, प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयाला भिडेल असा चित्रपट!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.