Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सुबोध भावेच्या दमदार आवाजात “फुला”चा टीझर रिलीज! वाघ्या-मुरळी संस्कृतीवर भाष्य करणारा चित्रपट

"फुला" हा मराठी आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटाचा नुकताच अभिनेते सुबोध भावे यांच्या आवाजात टीझर रिलीज झाला आहे. ज्यामध्ये वाघ्या-मुरळी संस्कृती प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Mar 17, 2026 | 10:41 AM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • सुबोध भावेच्या आवाजात “फुला”चा टीझर रिलीज
  • वाघ्या-मुरळी संस्कृतीवर भाष्य करणारा चित्रपट
  • “फुला” चित्रपट कधी होणार प्रदर्शित?
 

वाघ्या-मुरळीच्या पारंपरिक लोकसंस्कृतीवर आधारित कथा मांडणाऱ्या ‘फुला’ या चित्रपटाचा दमदार टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. या टीझरमध्ये सुबोध भावे यांच्या दमदार आणि प्रभावी आवाजामुळे एक वेगळंच वातावरण निर्माण होताना दिसले आहे. १७ एप्रिल रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाने टीझरपासूनच प्रेक्षकांची उत्सुकता चांगलीच वाढवली आहे. विशेष म्हणजे आटपाडीतील काही तरुणांनी एकत्र येऊन साकारलेला हा वेगळ्या धाटणीचा चित्रपट असल्यामुळे त्याबद्दल अधिकच कुतूहल निर्माण झाले आहे.

“फुला” या चित्रपटाची निर्मिती पैलवान अजित शिवजी जाधव यांनी केली असून, शिवशर्विल चित्रपट आणि बोधी सिनेमा यांनी चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन अभिषेक जावीर यांचे असून पटकथा रविकिरण जावीर यांनी लिहिली आहे. संगीत दिग्दर्शन समाधान ऐवाले यांनी केले असून सर्जनशील दिग्दर्शन अमर देवकर यांनी सांभाळली आहे. छायांकन प्रताप जोशी यांचे तर संकलन राहुल प्रजापती यांनी केले आहे. निर्मिती रचना अतुल लोखंडे यांनी केली आहे.

Bigg Boss Marathi 6 : ‘बिग बॉस मराठी’मध्ये नवा ट्विस्ट! कॅप्टन संकेत पाठकच्या एका निर्णयाने वाढला घरातील सदस्यांचा वाद

चित्रपटातील गाण्यांना वैशाली सामंत, वैशाली माडे, रोहित राऊत, रवींद्र खोमणे, वैशाली कुलकर्णी, वैष्णवी आदोडे आणि आकाश नवगिरे यांनी आवाज दिला आहे. तसेच नृत्य दिग्दर्शन आशुतोष कीर्तिकर आणि सृष्टी जाधव यांचे आहे. वेशभूषा कोमल जवीर आणि अक्षता पाटील यांनी सांभाळली असून रंगभूषा समाधान भोरे यांनी केली आहे.

 

“फुला” ही एका मुरळीच्या पोटी जन्मलेल्या निरागस मुलीची संघर्षमय कथा आहे. तमाशा फड, जागरण-गोंधळ यांसारख्या पारंपरिक सांस्कृतिक पार्श्वभूमीवर उभी राहणारी ही कथा महाराष्ट्राच्या समृद्ध लोकपरंपरेतून आकार घेताना दिसते. टीझरमधील साखळदंडाने बांधलेली, जमिनीवर आडवी पडलेली आणि आजूबाजूला हळद विखुरलेली दृश्यरचना प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडते.

Dhurandhar 2 Review: ‘धुरंधर 2’चा पहिला रिव्ह्यू समोर; 3000 कोटींचा गल्ला पार, ‘पुष्पा’-‘बाहुबली’ला दिली टक्कर

विशेष म्हणजे सुबोध भावे यांच्या आवाजात उच्चारलेल्या “यत्र नार्यस्तु पूज्यन्ते, रमन्ते तत्र देवता” या संस्कृत ओळींनी टीझरची सुरुवात होते आणि पुढील दृश्यांमधून चित्रपटाचा गंभीर आणि प्रभावी आशय स्पष्ट होत जातो. एका मुलीच्या अस्तित्वावर समाजाने उभे केलेले प्रश्न आणि तिचा संघर्ष या चित्रपटातून प्रभावीपणे मांडला जाणार आहे. टीझरमधील देखण्या दृश्यप्रतिमा, प्रभावी पार्श्वसंगीत आणि दमदार सादरीकरणामुळे ‘फुला’ या चित्रपटाने प्रदर्शित होण्यापूर्वीच प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केले आहे. त्यामुळे १७ एप्रिल रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाकडून प्रेक्षकांच्या अपेक्षा मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.

Web Title: Phula marathi movie teaser release waghya murali tradition film release 17 april marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 17, 2026 | 10:40 AM

Topics:  

  • entertainment
  • marathi cinema
  • marathi movie

संबंधित बातम्या

Devghar On Rent Movie: मराठमोळ्या ठेक्यावर गौतमी पाटीलचा जलवा; ‘अगं आई गं…’ गाणं रिलीज
1

Devghar On Rent Movie: मराठमोळ्या ठेक्यावर गौतमी पाटीलचा जलवा; ‘अगं आई गं…’ गाणं रिलीज

Afratafri Marathi Movie Trailer: एक कोटींच्या हव्यासापायी तीन भाऊ भिडले; ‘अफरातफरी’चा भन्नाट ट्रेलर रिलीज, ‘या’ दिवशी होणार रिलीज
2

Afratafri Marathi Movie Trailer: एक कोटींच्या हव्यासापायी तीन भाऊ भिडले; ‘अफरातफरी’चा भन्नाट ट्रेलर रिलीज, ‘या’ दिवशी होणार रिलीज

Abhay Jodhpurkar: ‘अवतरली… लाडाची… नवसाची गौराई…!’ सिंगर अभय जोधपूरकरचा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान
3

Abhay Jodhpurkar: ‘अवतरली… लाडाची… नवसाची गौराई…!’ सिंगर अभय जोधपूरकरचा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान

Sahal Marathi Movie: देविका दफ्तरदार यांच्या संवेदनशील अभिनयाची पुन्हा झलक पाहायला मिळणार; ‘सहल’चा पोस्टर लॉन्च
4

Sahal Marathi Movie: देविका दफ्तरदार यांच्या संवेदनशील अभिनयाची पुन्हा झलक पाहायला मिळणार; ‘सहल’चा पोस्टर लॉन्च

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.