Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 8 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिग्पाल लांजेकर यांच्या श्री शिवराज अष्टकातील सहावे पुष्प भेटीला; ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’चा दमदार टिझर प्रदर्शित

शिवचरित्रातील हा थरारक अध्याय ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ भव्य चित्रपटातून शिवजयंतीदिनी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Dec 16, 2025 | 04:09 PM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

शिवजयंतीनिमित्त, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमावर आधारित ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ हा चित्रपट १९ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.शिवजयंतीनिमित्ताने रणपति शिवराय स्वारी आग्रा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य उभारणीत त्यांच्या तेजस्वी पराक्रमासोबत त्यांचे बुद्धिचातुर्य हा त्यांच्या संपूर्ण कार्याचा केंद्रबिंदू राहिला आहे. छत्रपती शिवाजी महाराज मुत्सद्दी योद्धे होते. असंख्य मोहिमांमधून ते अनेकदा सिद्ध झाले आहे. महाराजांनी गनिमी कावा ही कूटनीती अत्यंत प्रभावीपणे वापरली. शत्रू सावध नसतानाच त्याच्यावर घाला घालायचा, ही पद्धत तर महाराजांनी अनेक वेळा अतिशय यशस्वीरीत्या वापरली. औरंगजेबाचं मुघल साम्राज्य सर्वात मोठं आणि मजबूत साम्राज्य मानलं जायचं.

अशा या साम्राज्याला शिवाजी महाराजांनी केवळ जोरदार हादराच दिला नाही, तर मुघल सम्राट औरंगजेबाची झोपही त्यांनी उडवली. आग्य्राला जाण्याचं निश्चित करणं आणि भर दरबारात मुघल साम्राज्याला निडरपणे आव्हान देणं हा स्वराज्याच्या उभारणीतील महत्त्वाचा अध्याय आहे. यात राजांची विचारसरणी, तल्लख बुद्धीमत्ता, गनिमी कावा, प्रसंगावधान राखून आखलेली रणनीती, शत्रूला गाफील ठेवून रक्ताचा एक थेंब ही न सांडता केलेला पराभव आदी गुण दिसतात. शिवचरित्रातील हा थरारक अध्याय ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ भव्य चित्रपटातून शिवजयंतीदिनी १९ फेब्रुवारीला आपल्यासमोर येणार आहे.


महाराजांचा देदिप्यमान इतिहास आणि त्यातील ज्वलंत अध्याय लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या श्री शिवराज अष्टक संकल्पनेअंतर्गत रुपेरी पडद्यावर सादर झाले. या संकल्पनेतील सहावे चित्रपटरुपी पुष्प ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ या चित्रपटाचा टिझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. औरंगजेबाच्या बलाढ्य मुघलसत्तेचा पोलादी पहारा भेदून महाराजांनी घेतलेली मोठी जोखीम, औरंगजेबाच्या दरबारातील बाणेदार प्रसंग याची रोमांचकारी झलक या टिझर मधून दिसून येत आहे.

Border 2 X Review: लोकांनी केली ‘बॉर्डर 2 साठी Akshaye Khanna ची मागणी; टीझर पाहून प्रेक्षक म्हणाले…

पॅनोरमा स्टुडिओज आणि मुगाफी निर्मित ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ या भव्य चित्रपटाचे लेखन-दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर यांचे आहे. कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक (पॅनोरमा स्टुडिओज), विपुल अग्रवाल, जेनील परमार (मुगाफी), मुरलीधर छतवानी (पॅनोरमा स्टुडिओज) चित्रपटाचे निर्माते आहेत. सहनिर्माते रवींद्र औटी (पॅनोरमा स्टुडिओज), तान्शा बत्रा,आलोक शर्मा (मुगाफी)आहेत.

छत्रपती शिवाजी महाराजांनी अत्यंत कठीण परिस्थितीतही हार मानली नाही, त्यांच्या शौर्याची, धैर्याची आठवण करून देत इतिहासाच्या सुवर्णपानांमध्ये दडलेला हा प्रेरणादायी अध्याय ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ चित्रपटाच्या माध्यमातून भव्य स्वरूपात आणण्याचा आनंद दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी व्यक्त केला आहे.

”त्याला ऑस्कर देऊन टाका..”, स्मृती इराणी यांची ‘ती’ पोस्ट चर्चेत, धुरंधरमधील ‘या’ अभिनेत्याबद्दल लिहिली कौतुकास्पद पोस्ट

Web Title: Powerful teaser of ranpati shivray swari agra released

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 16, 2025 | 04:09 PM

Topics:  

  • chatrapati Shivaji Maharaj
  • marathi actor
  • marathi movie

संबंधित बातम्या

New Marathi Serial: तब्बल १८ वर्षांनंतर ‘हा’ मराठी अभिनेता छोट्या पडद्यावर; ‘इच्छाधारी नागीन’मध्ये साकारणार प्रमुख भूमिका
1

New Marathi Serial: तब्बल १८ वर्षांनंतर ‘हा’ मराठी अभिनेता छोट्या पडद्यावर; ‘इच्छाधारी नागीन’मध्ये साकारणार प्रमुख भूमिका

Pravin Tarde : ‘मी छाती ठोकून बोलणार..’; हिंदुत्ववादी प्रोपोगंडाच्या आरोपांवर प्रवीण तरडे स्पष्टच बोलले
2

Pravin Tarde : ‘मी छाती ठोकून बोलणार..’; हिंदुत्ववादी प्रोपोगंडाच्या आरोपांवर प्रवीण तरडे स्पष्टच बोलले

Frame: ‘फ्रेम’ चित्रपटाचा होणार प्रीमियर! कर्तव्य आणि विवेकबुद्धी यांच्यातील संघर्षाची प्रभावी कथा लवकरच ZEE5 मराठीवर
3

Frame: ‘फ्रेम’ चित्रपटाचा होणार प्रीमियर! कर्तव्य आणि विवेकबुद्धी यांच्यातील संघर्षाची प्रभावी कथा लवकरच ZEE5 मराठीवर

Out Of Syllabus Movie: प्रदर्शनाआधीच ‘आऊट ऑफ सिलॅबस’ची हवा! भव्य प्रीमियरला मान्यवरांची मांदियाळी
4

Out Of Syllabus Movie: प्रदर्शनाआधीच ‘आऊट ऑफ सिलॅबस’ची हवा! भव्य प्रीमियरला मान्यवरांची मांदियाळी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.