
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
प्रार्थना बेहरेची पोस्ट पाहून चाहते देखील भावुक
प्रार्थना बेहेरेने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केल्यानतंर तिला लगेचच चाहते प्रतिसाद देऊ लागले. व्हिडिओमध्ये प्रार्थना म्हणताना दिसत आहे की, ‘नमस्कार! आजचा व्हिडिओ करतेय कारण, आज १४ तारीख आहे. आज दोन महिने झाले माझ्या बाबांना जाऊन. बाबांसाठी हा व्हिडिओ करतेय. मला खरंतर आज काहीच सुचत नाहीये. मी आजवर कधीच अशाप्रकारे व्यक्त झालेले नाही. मी आता कोणत्या मनस्थितीत आहे हे तुम्हाला सर्वांना समजलंच असेल. बऱ्याच जणांचे मला मेसेजसुद्धा आलेत. हे दु:ख आता कायम राहणार. ते मी सांगू शकत नाहीये.’
अभिनेत्री पुढे म्हणाली, ‘पण, माझे बाबा नेहमी मला म्हणायचे. आयुष्यात नेहमी खूश राहा. आनंदी राहायचा प्रयत्न कर. तू एक अभिनेत्री आहेस. सगळ्यांचं मनोरंजन करायचं हे तुझं काम आहे. कायम तू छान काम कर. ते असताना मी जे काम केलं होतं, ते काम आता बाबा नसताना तुमच्या भेटीला येणार आहे. त्यांचे आशीर्वाद असणार आहेत पण, मला तुमचेही आशीर्वाद हवे आहेत.’
‘Dhurandhar’ मधील एका सीनमुळे भडकलं पाकिस्तान; चित्रपटाची चांगली कमाई सुरु असतानाही खटला दाखल
प्रार्थना व्हिडीओच्या शेवटी म्हणाली, ‘बाबा मला नेहमी म्हणायचे, मी तुझा खूप मोठा फॅन आहे. आता बाबा तर नाहीयेत. पण, मला माहितीये तुम्ही सगळे माझ्याबरोबर आहात. मी उद्या काहीतरी स्पेशल घेऊन येतेय. जे खरंतर माझ्या बाबांसाठी आहे. तुम्हा सगळ्यांसाठी आहे. यासाठी मला तुमचा सपोर्ट, आशीर्वाद हवाय. बाबा असताना त्यांनी माझं हे काम आधीच पाहिलं होतं. आता बाबा नसताना हे काम प्रदर्शित होणार आहे. आता तुमचा सपोर्ट हवा आहे. तो पाठिंबा कायम ठेवा…थँक्यू सो मच’ असं प्रार्थनाने पुढे म्हटलं आहे.’
अभिनेत्रीचा पुढचा प्रोजेक्ट
तसेच, आता शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये प्रार्थनाने म्हटल्या प्रमाणे ती उद्या प्रेक्षकांचा काय सरप्राईज देणार हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. तसेच चाहते तिला पुन्हा पाहण्यासाठी आणि तिच्या नव्या प्रोजेक्टसाठी आनंदी आहेत.