
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
मराठी मनोरंजनसृष्टीत सध्या लगीनसराई सुरू आहे. गेल्या काही दिवसांत अनेक लोकप्रिय मराठी कलाकार लग्नबंधणात अडकल्याचे आपण पाहिले. गेल्या वर्षात अनेक मराठी कलाकारांच्या मुलांनी आयुष्यात एक नवीन सुरूवात केली आहे. अलीकडेच आदेश आणि सुचित्रा बांदेकर यांचा मुलगा सोहम बांदेकर लग्नबंधणात अडकला. आता या पाठोपाठ प्रसाद ओकच्या घरातून देखील एक आनंदाची बातमी येत आहे. अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक प्रसाद ओकच्या घरी ही लवकरच सनई चौघडे वाजवणार आहेत.
अभिनेता प्रसाद ओक आणि मंजिरी ओक यांचा मोठा मुलगा लवकरच विवाहबंधणात अडकणार आहे. नुकताच सार्थक ओकचा साखरपुडा पार पडला आहे. काल 19 जानेवारी 2026 रोजी त्याचा साखरपुडा झाला. या साखरपुड्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अभिनेत्री अमृता खानविलकरने ही आनंदाची बातमी सोशल मीडियावर शेअर केली आहे. अमृताने शेअर केलेल्या फोटोमध्ये संपूर्ण ओक कुटुंबीयांची आणि प्रसाद – मंजिरीच्या होणाऱ्या सुनेची झलक पाहायला मिळत आहे.
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
प्रसाद ओकच्या होणाऱ्या सुनेचं नाव रितू आहे, अमृताने शेअर केलेल्या फोटोला एक कॅप्शन देखील दिले आहे. यामुळे तिचे नाव समोर आले आहे. तिने कॅप्शनमध्ये लिहिले, ” तुझं कुटुंबात स्वागत आहे रितू”. अमृतासह तिची आई सुद्धा सार्थकच्या साखरपुड्याला उपस्थित राहिली होती. याशिवाय या साखरपुड्याला अनेक मराठी कलाकार उपस्थित होते.
साखरपुड्यासाठी सार्थकने फिकट पिस्ता रंगाची सफारी सूट परिधान केली, तर होणारी पत्नी गुलाबी रंगाचा घागरा घालून दिसली. मंजिरी आणि प्रसाद देखील अत्यंत सुंदर दिसले; मंजिरीने निळ्या रंगाची फॅन्सी साडी परिधान केली तर प्रसाद कुर्ता आणि झब्बा लुकमध्ये होते. त्यांचा लहान मुलगा मयंक हिरव्या रंगाची शेरवानी परिधान करून खूपच गोड दिसत होता