Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

छोट्या पडद्यावरील अभिनेत्री झाली उद्योजिका! रेश्मा शिंदेने दाखवली नव्या ज्वेलरी शॉपची पहिली झलक!

अभिनेत्री रेश्मा शिंदेने अनेक मराठी मालिकेमध्ये काम केले आहे. तिच्या अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. तसेच अभिनेत्रीने प्रेक्षकांचे प्रेम देखील मिळवले आहे. याचदरम्यान आता अभिनेत्रीने अभिनयासह उद्योजक क्षेत्रात देखील पाऊल टाकले आहे. अभिनेत्रीने पुण्यात एक नवीन व्यवसाय सुरु केला आहे. रेश्माने व्हिडीओ शेअर करत या व्यवसायाची झलक शेअर केली आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Sep 26, 2024 | 02:24 PM
छोट्या पडद्यावरील अभिनेत्री झाली उद्योजिका! रेश्मा शिंदेने दाखवली नव्या ज्वेलरी शॉपची पहिली झलक (फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)

छोट्या पडद्यावरील अभिनेत्री झाली उद्योजिका! रेश्मा शिंदेने दाखवली नव्या ज्वेलरी शॉपची पहिली झलक (फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

अभिनय क्षेत्रात आपल्या कलेसह अनेक कलाकारांनी गेल्या काही दिवसांत वैयक्तिक आयुष्यात नवनवीन व्यवसाय सुरू केल्याचे दिसले आहे. ज्यामध्ये महेश मांजरेकर, अनघा अतुल, हार्दिक जोशी, सई ताम्हणकर, प्रसाद लिमये, अक्षया देवधर यांसारख्या अनेक कलाकारांनी गेल्या काही वर्षांत हॉटेल, कपड्यांचे व्यवसाय सुरू केले आहे. आणि त्यांना या व्यवसायात यश देखील मिळाले आहे. या यादीत आता छोट्या पडद्यावरील महाराष्ट्राच्या लाडक्या अभिनेत्रीच्या नावाचा समावेश झाला आहे. ती म्हणजे रेश्मा शिंदे.

मराठी मालिका ‘रंग माझा वेगळा’, ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकांमधून अभिनेत्री रेश्मा शिंदे प्रेक्षकांच्या घरोघरी पोहचली. अभिनेत्री सोशल मीडियावर देखील जास्त सक्रिय असल्यामुळे तिचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. आपल्या सहज सुंदर अभिनयाने रेश्मा नेहमीच सर्वांचं लक्ष वेधून घेत असते. आता सध्या ती आणखी एका गोष्टीमुळे चर्चेत आहे. ती गोष्ट म्हणजे रेश्माने आता व्यवसाय क्षेत्रात पदार्पण केले आहे. छोट्या पडद्यावरील ही अभिनेत्री आता उद्योजिका झाली आहे. यासंदर्भात रेश्माने स्वत: पोस्ट शेअर करत सर्वांना आनंदाची माहिती दिली आहे. याशिवाय तिने आपल्या नव्या व्यवसायाची झलक देखील सर्वांना दाखवली आहे.

 

रेश्माने पालमोनास या ज्वेलरी ब्रँडबरोबर भागीदारी करून पुण्यात कोथरुड येते स्वत:चे ज्वेलरी शॉप उघडले आहे. याबाबत सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून अभिनेत्रीने स्वतः ही बातमी चाहत्यांना सांगितली आहे. रेश्माने ज्वेलरी शॉपच्या ओपनिंगला पांढर्‍या रंगाचा ऑफ शोल्डर गाऊन घालून वेस्टर्न लूक केल्याचे या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. अभिनेत्री पोस्ट शेअर करता चाहत्यांचे आभार मानले आहेत तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, “अभिनयाच्या प्रवासात तुम्ही माझ्यावर भरभरून प्रेम केलंत. आता एक नवीन प्रवास तुमच्या साक्षीने सुरू करते आहे. तुमचं प्रेम आणि आशीर्वाद कायम माझ्या पाठिशी असू दे. उद्योजिका म्हणून नवीन प्रवास सुरू करताना मला अतिशय आनंद होत आहे. मी पालमोनास या ब्रँडबरोबर पार्टनरशिप करून हा व्यवसाय सुरू केला आहे. तुम्ही सर्वांनी दिलेल्या प्रेमाबद्दल खूप खूप आभार” असे अभिनेत्रीने लिहिले आहे. ही पोस्ट पाहून अभिनेत्रीने चाहत्यांची पुन्हा एकदा मने जिंकली आहेत.

हे देखील वाचा- आलिया भट्ट भावाच्या सुरक्षेसाठी जीव धोक्यात घालणार, “जिगरा” चा ट्रेलर पाहून चाहते थक्क!

दरम्यान, रेश्मा शिंदेने या शेअर केलेल्या पोस्टवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव सुरु केला आहे. चाहत्यांसह अभिनेत्रीला मराठी कलाकार देखील शुभेच्छा देताना दिसत आहेत. ज्यामध्ये श्रेया बुगडे, शिवानी बावकर, अभिज्ञा भावे, अनघा अतुल, ऋजुता देशमुख, अपूर्वा नेमळेकर, शिवानी सोनार, अश्विनी कासार यांसारख्या कलाकारांचा समावेश आहे.

Web Title: Reshma shinde started new business in pune shared first video of her jewellery shop

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 26, 2024 | 02:20 PM

Topics:  

  • entertainment
  • Marathi Television Show

संबंधित बातम्या

9 वर्षांनी मोठ्या BF सह करणार अभिनेत्री तेजस्वी प्रकाश लग्न? करण कुंद्राने BB मध्येच केलं होतं प्रपोज, का झाला उशीर?
1

9 वर्षांनी मोठ्या BF सह करणार अभिनेत्री तेजस्वी प्रकाश लग्न? करण कुंद्राने BB मध्येच केलं होतं प्रपोज, का झाला उशीर?

चौथ्या एनिवर्सीच्या दिनी Rajkummar Rao – Patralekha च्या घरी आली लक्ष्मी! लग्नाच्या वाढदिवशी दिला मुलीला जन्म
2

चौथ्या एनिवर्सीच्या दिनी Rajkummar Rao – Patralekha च्या घरी आली लक्ष्मी! लग्नाच्या वाढदिवशी दिला मुलीला जन्म

‘Body Language, Expression वर विशेष मेहनत आणि…; शिवानी सुर्वेच्या ‘आफ्टर ओएलसी’ चित्रपटातील लुकची चर्चा
3

‘Body Language, Expression वर विशेष मेहनत आणि…; शिवानी सुर्वेच्या ‘आफ्टर ओएलसी’ चित्रपटातील लुकची चर्चा

Bigg Boss 19 : Mridul Tiwari ला बाहेर केल्यानंतर सोशल मिडीयावर चाहते संतापले! म्हणाले – हा एक स्क्रिप्टेड
4

Bigg Boss 19 : Mridul Tiwari ला बाहेर केल्यानंतर सोशल मिडीयावर चाहते संतापले! म्हणाले – हा एक स्क्रिप्टेड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.