आलिया भट्ट भावाच्या सुरक्षेसाठी जीव घालणार धोक्यात, ट्रेलर पाहून चाहते झाले थक्क (फोटो सौजन्य- YouTube)
आलिया भट्ट आणि वेदांग रैना स्टारर ‘जिगरा’ या चित्रपटाची चाहत्यांनी प्रतीक्षा केली आहे. या चित्रपटात आलियाने वेदांग रैनाच्या बहिणीची भूमिका साकारली असून ती तिच्या भावाची सुरक्षा कवच बनणार असल्याचे चित्रपटाच्या पोस्टरवरून आधीच स्पष्ट झाले आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला, ज्यामध्ये तिने आपल्या भावाचे रक्षण करण्याचे वचन दिले आहे आणि आता चाहत्यांची प्रतीक्षा कमी करत निर्मात्यांनी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज केला आहे. वासन बाला दिग्दर्शित या चित्रपटात आलियाने दमदार व्यक्तिरेखा साकारली आहे, त्याची झलक ट्रेलरमध्ये पाहायला मिळाली आहे.
c
आलिया भट्टच्या ॲक्शनने चित्रपगृहात होणार धुमाकूळ
जिगरा या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये वेंदाग रैना परदेशात राहतो आणि तिथे तुरुंगात जातो असे पाहायला मिळते. वेंदगचा तुरुंगात प्रचंड छळ होतो आणि आलिया भट तिच्या भावाला वाचवण्यासाठी निघते. आलिया तिच्या भावाला बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करते. ती आपल्या भावासाठी मरायला आणि मारायला तयार आहे. चित्रपटात आलियाची जबरदस्त ॲक्शन पाहायला मिळणार आहे, त्याची झलक ट्रेलरमध्ये दिसली आहे. यात आलिया कहर करताना दिसणार आहे. या ट्रेलरनेही चाहत्यांच्या मनात अनेक प्रश्न सोडले आहेत. आता सर्वांना जाणून घ्यायचे आहे की आलियाच्या भावाने असे काय केले की तो तुरुंगात गेला. या चित्रपटाचा ट्रेलर चाहत्यांना खूप आवडला आहे. आलियाचे नाव ट्विटरवर ट्रेंड करत आहे. तसेच चाहते आलियाचे कौतुक देखील करताना दिसत आहेत.
हे देखील वाचा- Netflix वर करोडो रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप, BMCM चित्रपटाच्या निर्मात्याने केला खुलासा!
कधी होणार चित्रपट प्रदर्शित
आलिया भट्टचा हा चित्रपट ११ ऑक्टोबरला प्रदर्शित होत आहे. यापूर्वी असे सांगितले जात होते की या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलू शकते. आलिया आणि वेदांगशिवाय या चित्रपटात शोभिता धुलिपाला, मनोज पाहवा आणि राहुल रवींद्रन यांच्याही भूमिका आहेत. या चित्रपटाची निर्मिती करण जोहर, अपूर्व मेहता, शालिन भट्ट्स, सोमेन मिश्रा आणि आलिया भट्ट यांनी संयुक्तपणे केली आहे. आलियाचा हा चित्रपट अनेक चित्रपटांना टक्कर देणार आहे.