Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘आशा’ला आशाताईंची पसंती ! आशा सेविकांच्या सन्मानासाठी राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद, ठेवले मोफत शो

सैराट चित्रपटातून घराघरात पोहोचलेली रिंकू राजगुरू, सध्या तिच्या ’आशा’ चित्रपटामुळे चर्चेत आली आहे. अभिनेत्रीचा हा चित्रपट चाहत्यांची प्रशंसा मिळवत आहे. तसेच या चित्रपटाचे मोफत शो देखील ठेवण्यात आले आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Dec 22, 2025 | 06:15 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • ‘आशा’ला आशाताईंची मिळाली पसंती
  • आशा सेविकांच्या चित्रपटाला उत्स्फूर्त प्रतिसाद
  • ‘आशा’ चित्रपटाचे ठेवले मोफत शो
 

महिलांचा संघर्ष, जिद्द आणि सामाजिक आरोग्य व्यवस्थेतील त्यांच्या अमूल्य योगदानाची प्रभावी कथा मांडणारा ‘आशा’ हा चित्रपट सध्या सर्वत्र प्रदर्शित झाला असून, महाराष्ट्रभरातून या चित्रपटाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. विशेष म्हणजे गावोगावी आशा सेविका स्वतः पुढाकार घेऊन, गटाने चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट पाहाताना दिसत आहेत. चित्रपट पाहाताना त्या भावूक होत आहेत. आपला चित्रपट पाहिल्याचे समाधान चेहऱ्यावर प्रत्येकाच्या दिसून येत आहे. विशेष म्हणजे यातील अनेक आशा ताई पहिल्यांदाच चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहात आहेत. त्यामुळे हा अनुभव त्यांच्यासाठी अत्यंत खास आणि प्रेरणादायी ठरत आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना देखील आवडत आहे.

2025 मधील Yami Gautam ठरली सर्वोत्तम अभिनेत्री, पडद्यावर गाजवलेल्या ‘या’ पाच भूमिकांमुळे मिळाली प्रसिद्धी

दरम्यान, समाजातील विविध घटकांकडूनही या चित्रपटाला पाठिंबा मिळताना दिसत आहे. काही सामाजिक कार्यकर्ते स्वखुशीने पुढाकार घेऊन आशा सेविकांसाठी शो आयोजित करत आहेत, तर काही सामाजिक संस्था, प्रशासन आणि राजकीय नेतेदेखील जास्तीत जास्त आशा सेविका आणि अंगणवाडी सेविकांनी हा चित्रपट पाहावा यासाठी प्रयत्नशील आहेत. आरोग्य राज्य मंत्री मेघना बोर्डीकर यांनी परभणीत आशा सेविकांसोबत चित्रपट पाहिला. तर आमदार मंजुळा गावित यांनीही हा चित्रपट पाहिला. तसेच नारायणगाव येथे डिसेंट फाऊंडेशनच्या वतीने सलग चार दिवस आशा सेविकांसाठी विशेष शोचे आयोजन करण्यात आले आहे. लेडिज क्लब धाराशिवच्या वतीनेही या चित्रपटाच्या मोफत शोचे आयोजन करण्यात आले.

अण्णाभाऊ साठे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘मायसभा’चे स्क्रीनिंग, कलाकारांची लागणार उपस्थिती

दिपक पाटील दिग्दर्शित ‘आशा’ चित्रपटात रिंकू राजगुरू, सायंकित कामत, उषा नाईक, शुभांगी भुजबळ, सुहास शिरसाट, दिशा दानडे, दिलीप घारे आणि हर्षा गुप्ते यांच्या प्रमुख भूमिका आहेत. रिंकू राजगुरुने सगळ्यांची मने जिंकले आहे. तिच्या अभिनयाचे चाहते कौतुक करत आहेत. आरोग्य व्यवस्थेचा कणा असलेल्या आशा सेविकांचा सन्मान करणारा ‘आशा’ हा चित्रपट केवळ मनोरंजन न करता सामाजिक चळवळीचे स्वरूप घेत असल्याचे चित्र सध्या महाराष्ट्रभर दिसून येत आहे.

Web Title: Rinku rajguru marathi movie aasha is receiving a good response free shows for aasha workers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 22, 2025 | 02:59 PM

Topics:  

  • entertainment
  • marathi movie
  • rinku rajguru

संबंधित बातम्या

मराठी मनोरंजनविश्वावर शोककळा; अभिनेता आणि दिग्दर्शक Ranjit Patil काळाच्या पडद्याआड, 42व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
1

मराठी मनोरंजनविश्वावर शोककळा; अभिनेता आणि दिग्दर्शक Ranjit Patil काळाच्या पडद्याआड, 42व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

निवडणूकांच्या रणधुमाळीत ‘आणीबाणी’ आता  OTTवर उपलब्ध, थिएटरमध्ये चुकलेला अनुभव आता घरबसल्या
2

निवडणूकांच्या रणधुमाळीत ‘आणीबाणी’ आता OTTवर उपलब्ध, थिएटरमध्ये चुकलेला अनुभव आता घरबसल्या

‘धुरंधर’ नंतर आता ‘डॉन ३’ साठी सज्ज Ranveer Singh; तर, ‘हा’ बॉलीवूड अभिनेता साकारणार खलनायक
3

‘धुरंधर’ नंतर आता ‘डॉन ३’ साठी सज्ज Ranveer Singh; तर, ‘हा’ बॉलीवूड अभिनेता साकारणार खलनायक

सासू-सुनेची खट्याळ जुगलबंदी! ‘अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ मधील पहिलं शीर्षक गीत प्रदर्शित
4

सासू-सुनेची खट्याळ जुगलबंदी! ‘अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ मधील पहिलं शीर्षक गीत प्रदर्शित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.