
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
सैराट फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू नेहमीच तिच्या कामामुळे आणि चित्रपटांसाठी चर्चेत राहिली आहे. रिंकूचा सोशल मीडियावर चाहते वर्ग देखील जास्त आहे. रिंकू सोशल मीडियावर कमालीची सक्रीय असते. सैराटमधील रिंकू आणि आताची रिंकू यात खूप फरक पाहायला मिळत आहे. रिंकूने सैराटनंतर अनेक चित्रपटामध्ये का केले आहे. आणि तिचा अभिनय सुरु ठेवला आहे. रिंकू राजगुरूच्या आतापर्यंतच्या प्रवासात तिला तिच्या आई वडिलांची खूप साथ मिळाली आहे. आई आणि बाबा यांच्याबरोबर रिंकू आता मुंबईत स्थायिक झाली आहे. दरम्यान रिंकूच्या आई आणि बाबांनी दुसऱ्यांदा लग्न केल्याची बातमी समोर आली आहे. रिंकूच्या आई-बाबांच्या दुसऱ्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर आता व्हायरल होत आहेत.
रिंकूच्या आई-बाबांनी केले दुसरे लग्न
रिंकूची आई आशा राजगुरू यांनी सोशल मीडियावर दुसऱ्या लग्नाचे फोटे शेअर केले आहेत जे पाहून चाहते चकित झाले आहेत. आता रिंकूच्या आई-बाबांनी दुसरं लग्न का केलं असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. याचं कारणही तितकंच खास आहे. रिंकूची आई आशा आणि वडील महादेव राजगुरू यांच्या लग्नाला 25 वर्ष पूर्ण झाली आहेत. याचनिमित्ताने त्यांनी ही पोस्ट शेअर केली आहे. लग्नाच्या 25 वर्षपूर्तीनिमित्तानं पुन्हा एकदा लग्न करण्याचा ट्रेंड सध्या सुरू आहे. त्यामुळे रिंकूच्या आई-बाबांनीही दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकले आहेत.
रिंकूच्या आईने शेअर केले लग्नाचे फोटो
रिंकूची आई आशा यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर लग्नाच्या सेलिब्रेशनचे फोटो कुटूंबासोबत शेअर केले आहेत. लग्नाच्या 25 व्या वाढदिवसाची शेअर करून त्यांनी कॅप्शनही दिले आहे. चाहत्यांनी त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच, खास म्हणजे आईच्या दुसऱ्या लग्नात रिंकू करवली झाली होती. निळी साडी नेसून रिंकू आई-वडिलांच्या लग्नात मिरवताना दिसली आहे.
यामी-प्रतिकच्या ‘धूम धाम’ चित्रपटाचा टीझर रिलीज; यादिवशी ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार चित्रपट प्रदर्शित!
सुंदर दिसल्या माई – लेकी
रिंकूची आई आशा आणि वडील महादेव राजगुरू यांच्या २६ व्या लग्नाच्या वाढदिवशी रिंकू खूप सुंदर आणि आकर्षित दिसत होती. तिची आई आशा राजगुरू देखील सुंदर दिसत होत्या. रिंकूने या सेलिब्रेशनमध्ये जांभळ्या रंगाची साडी परिधान केली होती. तसेच रिंकूच्या आईने केसरी रंगाची साडी नेसली होती. या दोघेही प्रत्येक फोटोमध्ये आनंदी दिसत होत्या.