
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
संगीत देवबाभळीमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री शुभांगी सदावर्ते हिने काही महिन्यांपूर्वीच घटस्फोटाची घोषणा केली होती.2025 मध्ये प्रसिद्ध संगीतकार आनंद ओकसोबत विभक्त होत असल्याचे सोशल मीडियावर जाहीर केले होते. त्यांच्या या निर्णयामुळे चाहत्यांना धक्का बसला होता. दरम्यान आता अभिनेत्री शुभांगी दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकणार आहे. तिने नुकतेच तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर तिच्या होणाऱ्या नवऱ्यासोबतचा केळवणाचा व्हिडिओ शेअर केला आहे. शुभांगी सदारवर्ते हिच्या होणाऱ्या पतीचे नाव सुमित म्हशेळकर आहे. शुभांगी आणि सुमित यांच्या मित्र मैत्रिणींनी त्यांचे केळवण केले आहे. या केळवणाचे व्हिडिओ दोघांनीही त्यांच्या अकाऊंटवर पोस्ट केले आहेत.
लग्नाच्या पाच वर्षांतच तीने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला होता. घटस्फोटानंतर शुंभागी आयुष्यात पुन्हा एकदा नवी सुरूवात करते आहे. त्यासाठी चाहत्यांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत.शुभांगीने केळवणाचा व्हिडिओ पोस्ट केला असून त्याला ‘जुळली गाठ गं असे कॅप्शन शुभांगीने दिले आहे. या व्हिडिओमध्ये तिचे मित्रमैत्रिणी देखील दिसत आहेत. नंतर शुभांगी आणि सुमित साठी केलेली सजावट पाहायला मिळत आहे.
Family Man Season 3 मध्ये मनोज बाजपेयींची बंपर कमाई ! फी एवढी की दुबईतही आलिशान घर मिळेल
सुमित म्हशेळकरने ‘नवराई माझी नवसाची’ असं कॅप्शन लिहून सरप्राइज केळवण प्लॅन करण्यासाठी मित्र-मैत्रिणींचे आभार मानले. सुमित व शुभांगी दोघांनीही शेअर केलेले व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत.ॉ
शुभांगी आणि आनंद ओक संगीत देवबाभळी या नाटकात एकत्र काम करत आहे. आनंद ओक हा संगीत देवबाभळीचा संगीतकार आहे. २०२० मध्ये दोघांनी लग्न केले होते. लग्नाच्या ५ वर्षांनी त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला होता. कोरोना काळात त्यांनी या दोघांनी लग्न केले होते. लग्नानंतर कोरोना काळ त्यांच्यासाठी खूप कठीण होता. हातात काम नसल्याने दोघांनी नाशिकमध्ये फुड स्टॉल सुरू केला होता. दोघांनी एकमेकांना खंबीर साथ दिली होती.