Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘मी मोदीजी अन् भाजपाचा भक्त…’, म्हणणाऱ्या महेश कोठारेंना संजय राऊतांचा टोला; म्हणाले “रात्री तात्या विंचू…”

नुकताच दिवाळी पहाटनिमित्त झालेल्या कार्यक्रमात महेश कोठारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाला पाठिंबा दर्शविताना दिसले. आता याच प्रकरणी संजय राऊतांनी अभिनेत्याला एक प्रश्न विचारला आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Oct 21, 2025 | 04:18 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • महेश कोठारेंना संजय राऊतांचा टोला
  • “रात्री तात्या विंचू…” – संजय राऊत
  • नक्की काय म्हणाले महेश कोठारे
सर्वत्र दिवाळी मोठ्या थाटात साजरी होताना दिसत आहे. बऱ्याच ठिकाणी दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जिथे टीव्ही किंवा सिनेमांमध्ये काम करणारे कलाकार मोठ्या प्रमाणात उपस्थित राहिली. बोरिवली मध्ये प्रवीण दरेकर यांनी सुद्धा दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन केले होते जिथे मराठीतील दिग्गज अभिनेते महेश कोठारे उपस्थित राहिले. या ठिकाणी भाषणादरम्यान महेश कोठारे असे काही बोलून गेले की जे सध्या सीनेवर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे. आणि त्यांचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

“डोक्यात कचरा भरला आहे…” राम गोपाल वर्मा यांची दिवाळी पोस्ट चर्चेत, नेटकरी संतापले; करतायत ट्रोल

दिवाळी पहाट २०२५ च्या कार्यक्रमांमध्ये महेश कोठारे यांनी मी मोदीजींचा भक्त आहे असे म्हटले आहे. तसंच त्यांनी पुढे असंही म्हटलं की मी भाजपाचा भक्त आहे, मी मोदीजीं चा भक्त आहे, मुंबईत नक्कीच कमळ फुलेल… निवडणुकीदरम्यान सुद्धा महेश कोठारे यांनी भाजपच्या वतीने समर्थन दर्शवले होते. यावेळी कार्यक्रमात ते म्हणाले की जेव्हा मी पियुष गोयल यांच्या प्रचारासाठी आलो होतो तेव्हा मी म्हटलं होतं की ते खासदार निवडून देत नाहीत तर मंत्री निवडून देत आहे. आता या विभागातून नगरसेवक नाही तर महापौर निवडला जाईल असे त्यांनी म्हटले.

याआधी अंबरनाथमध्ये धर्मवीर आनंद दिघे नाट्यमंदिराच्या लोकार्पण सोहळ्यात कोठारेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कामाचं कौतुक केलं होतं. “आपल्या सर्वांचे लाडके, धडाकेबाज नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि झपाटलेला आमचा खासदार श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांतून साकार झालेलं हे रंगमंच पाहून मी भारावून गेलो आहे. तुम्ही कलाकाराला इथे स्थान दिलं, हे पाहून आम्ही खूप खुश आहोत. इथे कलाकारांचे पेंटिंग्स बघून मी भारावून गेलो. श्रीकांतजी.. तुम्ही कायम झपाटलेले राहा आणि एकनाथजी.. तुम्ही जे काम करता ते धडाकेबाज पद्धतीनेच करता. या नाट्यमंदिराचं उद्धाटनदेखील इतकं दण्यात केलंय. असं मी याआधी पाहिलं नव्हतं. आम्हा कलावंतांसाठी तुम्ही खूप काही कराल,” अशी अपेक्षा कोठारेंनी या कार्यक्रमात व्यक्त केली होती.

Hardik Pandya ने गर्लफ्रेंड Mahieka Sharma सोबत साजरी केली दिवाळी, दोघांवरही चढला प्रेमाचा लाल रंग!

आता आज (मंगळवार) याप्रकरणी पत्रकार परिषदेत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत म्हणाले “महेश कोठारे नक्की मराठीच आहेत ना? मला शंका वाटते. प्रत्येकाला मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. पण तुम्ही कलाकार आहात आणि तुमचे चित्रपट फक्त भाजपच्या लोकांनी पाहिलेले नाहीत”, अशी टीका संजय राऊतांनी पत्रकार परिषदेत केली. यानंतर ते मस्करीत म्हणाले, “तुम्ही असं काही बोलला असाल तर तुम्हाला तात्या विंचू चावेल. रात्री येऊन तुमचा गळा दाबेल.”

 

 

 

 

Web Title: Sanjay raut reacted on mahesh kothare praising bjp and pm narendra modi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 21, 2025 | 04:18 PM

Topics:  

  • entertainment
  • PM Narendra Modi
  • sanjay raut

संबंधित बातम्या

‘Krantijyoti Vidyalaya Marathi Madhyam’ चित्रपटाने दिलं मराठी शाळांच्या शिक्षक अन् विद्यार्थ्यांना नवं बळ!
1

‘Krantijyoti Vidyalaya Marathi Madhyam’ चित्रपटाने दिलं मराठी शाळांच्या शिक्षक अन् विद्यार्थ्यांना नवं बळ!

आमिर खानने केला गौरीचा मनापासून स्वीकार, वयाच्या 60 व्या वर्षी तिसरे लग्न? म्हणाले ‘आम्ही पार्टनर आहोत…’
2

आमिर खानने केला गौरीचा मनापासून स्वीकार, वयाच्या 60 व्या वर्षी तिसरे लग्न? म्हणाले ‘आम्ही पार्टनर आहोत…’

India-US Trade Deal: ‘मोदींवर माझा मोठा विश्वास!’ 50% टॅरिफच्या वादात ट्रम्प यांची भारतावर स्तुतीसुमनं; काय आहे नवी चाल?
3

India-US Trade Deal: ‘मोदींवर माझा मोठा विश्वास!’ 50% टॅरिफच्या वादात ट्रम्प यांची भारतावर स्तुतीसुमनं; काय आहे नवी चाल?

आता जावेद जाफरीने AR Rahman यांना दिली साथ, वाढत्या वादाबद्दल स्पष्टच म्हणाले; ‘जगाप्रमाणे इंडस्ट्रीही बदलली…’
4

आता जावेद जाफरीने AR Rahman यांना दिली साथ, वाढत्या वादाबद्दल स्पष्टच म्हणाले; ‘जगाप्रमाणे इंडस्ट्रीही बदलली…’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.