(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
भारतीय क्रिकेटर हार्दिक पांड्या सध्या त्याच्या व्यावसायिक आयुष्यापेक्षा वैयक्तिक जीवनामुळे अधिक चर्चेत आहे. हार्दिक आणि मॉडेल माहिका शर्मा हे दोघ डेट करत असल्याच्या चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू होत्या. घटस्फोटानंतर वर्षभराने हार्दिक पंड्याने डेटिंग लाइफबद्दल अपडेट शेअर केली आहे. हार्दिक पंड्या मॉडेल मालिका शर्माच्या प्रेमात आहे. हार्दिकने त्याच्या वाढदिवशी माहिकाबरोबरचे फोटो पोस्ट केले होते. त्यानंतर आता माहिका व हार्दिक यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
या व्हिडिओमध्ये दोघे ट्विनिंग लूकमध्ये एकत्र बाहेर पडताना दिसत आहेत.व्हिडीओमध्ये माहिकाने गडद लाल रंगाचा बांधणी प्रिंट ड्रेस परिधान केला आहे, तर हार्दिकने त्याच रंगाचा कुर्ता घातलेला आहे.दोघांनीही केलेल्या या ट्विनिंगने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे आणि चाहत्यांकडून खूप पसंती मिळत आहे.
“डोक्यात कचरा भरला आहे…” राम गोपाल वर्मा यांची दिवाळी पोस्ट चर्चेत, नेटकरी संतापले; करतायत ट्रोल
हार्दिक व माहिका डेटिंगच्या चर्चा दीर्घकाळ सुरू होत्या, अखेर हार्दिकने मालदीवमधून वाढदिवसाच्या फोटोंसह माहिकाला टॅग करत नातं पक्कं केलं. आता पुन्हा या जोडीचा एक नवीन व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.
हार्दिक पंड्या व माहिका शर्मा यांच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव केला आहे. काही नेटकऱ्यांनी तर हार्दिकला ट्रोलही केलं आहे. ‘नवीन गर्लफ्रेंडसाठी शुभेच्छा’, ‘भावाने मूव्ह ऑन केलंय’, ‘दोघेही भावंडांसारखे वाटतायत,’ ‘हिच्यापेक्षा मी सुंदर दिसते’, ‘याला म्हणतात टीव्ही विकून रिमोट घेणं’, ‘हिच्यापेक्षा नताशा चांगली होती’, ‘भावा सगळी प्रॉपर्टी आईच्या नावाने कर’, अशा कमेंट्स इन्स्टंट बॉलीवूडच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी केल्या आहेत