सावळ्याची जणू सावली या मालिकेत अभिनेता संकर्षण कऱ्हाडेची एन्ट्री होणार आहे. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे लवकरच पुन्हा एकदा झी मराठी वाहिनीवर आम्ही सारे खवय्ये हा लोकप्रिय कार्यक्रम सुरु होणार आहे. ‘आम्ही सारे खवय्ये’ या कार्यक्रमाला प्रेक्षकांची मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली. अशातच आता हा कार्यक्रम पुन्ही नव्याने सुरु होणार असल्यामुळे संकर्षण सावळ्याची जणू सावली या मालिकेत हजेरी लावली आहे.
मेहेंदळे कुटुंबाने केलं संकर्षणचं स्वागत
सावळ्याची जणू सावली या मालिकेतील मेहेंदळे कुटुंबात संकर्षण येण्याच्या निमित्ताने घरातील सुनांची सर्वोत्कृष्ठ सून अशी स्पर्धा रंगणार आहे. मालिकेचा हा भाग उद्या म्हणजेच 28 जुलैला पाहता येणार आहे. या मालिकेचा हा प्रोमो झी मराठीच्या इन्स्टाग्राम अकउंटवर शेअर करण्यात आलेला आहे. मालिकेच्या प्रोमोमध्ये दाखवल्याप्रमाणे मेहेंदळे कुटुंब संकर्षणचं मनापासून स्वागत करतात. मेहेंदळेच्या घरात प्रवेश केल्यानंतर संकर्षण तिल्लोत्मला मावशी अशी हाक मारत म्हणतो की, आज मेहेंदळे कुटुंबातील चार सुना पाकस्पर्धेची म्हणजेच आम्ही सारे खवय्येची रंगीत तालीम करणार आहे. संकर्षणच्या या बोलण्यानंतर सावली, तारा, ऐश्वर्या, अमृता आपआपल्या शैलीत पदार्थ बनवताना दिसत आहेत. या खवय्येगिरीच्या स्पर्धेत यामध्ये त्यांना त्यांचे पती मदत करताना दिसत आहेत. यादरम्यान, ‘आम्ही सारे खवय्ये’चे शीर्षक गीत ऐकायला मिळते.
प्रेक्षकांनी केला कमेंटचा वर्षाव
या खवय्येगिरीच्या स्पर्धेमध्ये संकर्षण सावलीचं खूप कौैतुक करतो. संकर्षण म्हणतो की, या जगात सगळ्यात कठीण नोकरी कोणाची तर ही घरच्या गृहिणीची. पुढे संकर्षण असंही म्हणतो की, सावली तू अन्नपुर्णा आहेस. सावलीचं सगळ्यासमोर झालेलं कौैतुक पाहून सारंग भारावून जातो. मालिकेचा हा पूर्ण एपिसोड उद्या म्हणजेच 28 जुलैला पाहाता येणार आहे. झी मराठीच्या इन्स्टावरुन शेअर केलेल्या या प्रोमोला प्रेेक्षकांना चांगलाच प्रतिसाद दिला आहे. आम्ही सारे खवय्ये या कार्यक्रमाचा चाहता वर्ग आजही मोठ्या प्रमाणात आहे. झी मराठी मालिकांबरोबर प्रेक्षकांची भावनिक नाळ जोडली गेली आहे. त्यामुळे हा कार्यक्रम पुन्हा सुरु होत असल्याचा आनंद नेटकऱ्यांनी कमेंटमध्ये व्यक्त केला आहे. “आम्ही सारे खवये येते. टिपरे येऊद्या. आता हवे टिपरे सारेगमप लिटिल चॅम्प. चला हसा चकाट फू. येऊ द्या” अशी कमेंट देखील नेटकऱ्यांनी केली आहे. सावळ्याची जणू सावलीच्या या नव्या एपिसोडबाबत प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता दिसून येत आहे.