Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दोन स्त्रियांच्या संघर्षाची कहाणी! अमृता सुभाष- सोनाली कुलकर्णी यांच्या ‘परिणती – बदल स्वतःसाठी’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच पहिल्यांद

पहिल्यांदाच अमृता सुभाष आणि सोनाली कुलकर्णी यांच्या एकत्रित अभिनयाने सजलेल्या 'परिणती – बदल स्वतःसाठी' चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाला आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Jul 18, 2025 | 09:46 PM
अमृता सुभाष- सोनाली कुलकर्णी यांच्या 'परिणती – बदल स्वतःसाठी' चित्रपटाचा ट्रेलर लाँच

अमृता सुभाष- सोनाली कुलकर्णी यांच्या 'परिणती – बदल स्वतःसाठी' चित्रपटाचा ट्रेलर लाँच

Follow Us
Follow Us:

मराठी चित्रपटसृष्टीत नेहमीच वेगवेगळ्या विषयांवर आधारित चित्रपट येत असतात. असाच एक चित्रपट म्हणजे ‘परिणती – बदल स्वतःसाठी’. या चित्रपटात पहिल्यांदाच अमृता सुभाष- सोनाली कुलकर्णी मोठ्या स्क्रीनवर एकत्रित झळकणार आहे. चला याबद्दल जाणून घेऊयात.

काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘परिणती’ – बदल स्वतःसाठी’ या मराठी चित्रपटाच्या पोस्टरने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते. मराठी सिनेविश्वातील दोन ताकदवान अभिनेत्री अमृता सुभाष आणि सोनाली कुलकर्णी यांना एकत्र पाहाण्याची उत्सुकता वाढली असतानाच, नुकताच प्रदर्शित झालेला या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भावविश्वाला स्पर्श करणारा आहे. चित्रपटाच्या नावावरूनच आणि पोस्टरमधून हा स्त्रीप्रधान चित्रपट असल्याचे स्पष्ट होते. ही कथा आहे दोन विभिन्न पार्श्वभूमी असलेल्या स्त्रियांची. त्यांच्या अनपेक्षित भेटीची, वाढत चाललेल्या मैत्रीची आणि संघर्षातून सशक्तपणे उभ्या राहिलेल्या आयुष्याची.

चित्रपटगृहानंतर आता ‘Housefull 5’ चा ओटीटीवर धमाका, पण बघण्यासाठी पूर्ण करावी लागेल ‘ही’ खास अट

ट्रेलरमध्ये अमृता सुभाष एका डॉक्टरच्या भूमिकेत दिसत असून, ती आपल्या नवऱ्यासोबत आणि मुलासोबत एक सुखी कुटुंब जगत आहे. परंतु अचानक तिच्या आयुष्यात काही तरी गंभीर घडते, ज्यामुळे ती मानसिकदृष्ट्या खचलेली दिसते. याचवेळी सोनाली कुलकर्णी, जी एका बार डान्सरची भूमिका साकारत आहे, ती अमृताला आधार देण्यासाठी पुढे येते. सोनालीचा सकारात्मक दृष्टिकोन आणि तिच्या स्वाभाविक सहानुभूतीमुळे, दोघींमध्ये एक हळुवार आणि घनिष्ट मैत्री निर्माण होत असल्याचे दिसतेय.

चित्रपटाबद्दल दिग्दर्शक अक्षय बाळसराफ म्हणतात, “परिणती’ ही दोन स्त्रियांची गोष्ट आहे, परंतु त्याहूनही अधिक ती त्यांच्या अस्तित्वाच्या शोधाची कहाणी आहे. वेगळ्या पार्श्वभूमीच्या, स्वभावाच्या या दोन पात्रांच्या भेटीतून निर्माण होणारी मैत्री ही केवळ भावनिक आधार नसून, ती परस्परांची नवी ओळख घडवणारी शक्ती आहे. ‘परिणती’ मला वाटतं, प्रत्येकासाठी एक आरसा आहे, जो आपल्याला दाखवतो की, परिस्थिती काहीही असो, स्वतःवर विश्वास असेल तर आपण पुन्हा उभं राहू शकतो.”

‘Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi 2’ मध्ये दिसणार ‘तुलसी’ चे नवे रूप, एकता कपूरने दिली माहिती

पीएच फिल्म्स, फिनिक्स फिल्म्स आणि इनसिंक मोशन पिक्चर्स प्रस्तुत या चित्रपटाचे निर्माते पराग मेहता आणि हर्ष नरूला असून, अमित डोगरा, मोना नरूला, आशिष त्रिवेदी, शारदा नरूला, मनोज जैन, मोहित लालवानी, कांचन शाह आणि शांता जैन यांनी सहनिर्मितीची जबाबदारी सांभाळली आहे. अक्षय बाळसराफ लिखित, दिग्दर्शित या चित्रपटात अमृता सुभाष, सोनाली कुलकर्णी आणि अक्षर कोठारी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. १ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणारा ‘परिणती – बदल स्वतःसाठी ’ हा चित्रपट एक भावनिक अनुभव देणारा आणि प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून ठेवणारा ठरणार आहे, याची झलक ट्रेलरमधून स्पष्टपणे दिसतेय.

Web Title: Sonalee kulkarni amruta subhash new marathi film parinati trailer released

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 18, 2025 | 09:46 PM

Topics:  

  • marathi entertainment
  • marathi movie
  • sonali kulkarni

संबंधित बातम्या

Pach Futacha Bachchan Movie: कीर्तन, कोल्हापुरी भाषा अन् नाट्यमय कथा, पाच फुटाचा बच्चन’ चित्रपटाच्या ट्रेलरने वेधलं लक्ष
1

Pach Futacha Bachchan Movie: कीर्तन, कोल्हापुरी भाषा अन् नाट्यमय कथा, पाच फुटाचा बच्चन’ चित्रपटाच्या ट्रेलरने वेधलं लक्ष

Gondhal Marathi Movie: ‘गोंधळ’ची ऑस्करवारी सुरू! मुख्यमंत्र्यांची भेट घेत टीमने केली ‘ही’ खास मागणी
2

Gondhal Marathi Movie: ‘गोंधळ’ची ऑस्करवारी सुरू! मुख्यमंत्र्यांची भेट घेत टीमने केली ‘ही’ खास मागणी

Aali Mothi Shahani Movie: हृता-सारंगची ऑनस्क्रीन जुगलबंदी; ‘बोनिता बोनिता’ गाण्याने वेधलं लक्ष
3

Aali Mothi Shahani Movie: हृता-सारंगची ऑनस्क्रीन जुगलबंदी; ‘बोनिता बोनिता’ गाण्याने वेधलं लक्ष

Chhaya Kadam Bhootam Bhayyam: छाया कदमांचा ‘भूतम भयम्’चा अनुभव; ‘जठाई’च्या व्यक्तिरेखेबाबत अभिनेत्रीने सांगितली मनातली गोष्ट
4

Chhaya Kadam Bhootam Bhayyam: छाया कदमांचा ‘भूतम भयम्’चा अनुभव; ‘जठाई’च्या व्यक्तिरेखेबाबत अभिनेत्रीने सांगितली मनातली गोष्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.