Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Swapnil Joshi: स्वप्नील जोशीचे गुजराती चित्रपटसृष्टीत पदार्पण, ही अभिनेत्री काम करण्यासाठी उत्सुक!

मराठी चित्रपटसृष्टी गाजवून झाल्यानंतर आता मराठी अभिनेता स्वप्नील जोशी लवकरच गुजराती चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. अभिनेत्याने सर्व चाहत्यांना ही बातमी देऊन खुश केले आहे. या चित्रपटाचे नाव काय आहे जाणून घेऊयात.

  • By सायली ससाणे
Updated On: Dec 17, 2024 | 01:04 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

गुजराती सिनेमा मराठी सुपरस्टार स्वप्नील जोशी याच्या स्वागतासाठी सज्ज झाला आहे आणि कारण म्हणजे तो 2025 मध्ये रिलीज होणाऱ्या एका अत्यंत अपेक्षित चित्रपटाद्वारे गुजराती चित्रपट इंडस्ट्रीत पदार्पण करत आहे. “शुभचिंतक” अस या चित्रपटाचं नाव आहे. अभिनेत्याच्या अपवादात्मक अभिनय पराक्रमासाठी आणि अष्टपैलुत्वासाठी ओळखला जाणारा स्वप्नील गुजराती प्रेक्षकांना आश्चर्यचकित करणार आहे. तो कायम अनपेक्षित आणि ग्राउंडब्रेकिंग दोन्ही भूमिका अगदी उत्तमपणे साकारतो यात शंका नाही. या चित्रपटात स्वप्नील सोबत राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री मानसी पारेख देखील मुख्य भूमिकेत दिसणार असल्याचं समोर आले आहे.

2024 वर्षात स्वप्नील ने बॅक टू बॅक चित्रपट करून प्रेक्षकांचं नॉन स्टॉप मनोरंजन केले आहे. प्रेक्षकांना स्वप्नील येणाऱ्या वर्षात एका नव्या कोऱ्या गुजराती चित्रपटात दिसणार आहे. स्वप्नील गुजराती चित्रपट विश्वात पदार्पण करतोय ही मराठी चित्रपटसृष्टीसाठी नक्कीच अभिमानाची बाब आहे. वैविध्यपूर्ण भूमिकाच्या सोबतीने बहुभाषिक चित्रपट करण्याकडे नेहमीच स्वप्नीलचा कल असतो आणि आता तो त्याचा पहिला वहिला गुजराती चित्रपट करण्यासाठी सज्ज झाला आहे. हा चित्रपट काय असेल आणि स्वनिल भूमिका पाहण्यासाठी मराठी चाहते आतुर झाले आहेत.

या रोमांचक आणि कमाल प्रकल्पाची निर्मिती पार्थिव गोहिल आणि मानसी पारेख त्यांच्या सोल सूत्र या बॅनरखाली करत असून गोलकेरी, कच्छ एक्स्प्रेस आणि झामकुडी या गाजलेल्या हिट चित्रपटांनंतर त्यांची ही चौथी निर्मिती असणार आहे. निसर्ग वैद्य दिग्दर्शित, ज्यांनी यापूर्वी ज्येष्ठ अभिनेते सिद्धार्थ रांदेरियासोबत गुजराती चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते ते हा चित्रपट एक डार्क कॉमेडी थ्रिलर असल्याचं सांगत आहेत. हा चित्रपट पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

या पहिल्या वहिल्या गुजराती चित्रपटाबद्दल उत्सुकता व्यक्त करताना स्वप्नीलने आपले मत व्यक्त केले आहे, “गुजराती चित्रपट उद्योग वेगाने विकसित होत आहे आणि वैविध्यपूर्ण विषयांची निर्मिती करत आहे जी दूरवरच्या प्रेक्षकांना ऐकू येते आहे. सिनेमाची जादू सार्वत्रिक असावी यावर माझा नेहमीच विश्वास आहे. एक कलाकार म्हणून ही संधी माझ्यासाठी नक्कीच खास आहे आणि गुजराती चित्रपट विश्वात काहीतरी वेगळं निमित्तानं करायला मिळतंय याचा आनंद आहे. मी नेहमीच मानसीची एक अभिनेत्री म्हणून प्रशंसा केली आहे आणि तिच्यासोबत काम करण्याची माझी इच्छा पूर्ण होत आहे. या भूमिकेने मला नक्कीच आव्हान दिल आहे आणि ही भूमिका साकारण्यासाठी मी उस्तुक आहे” असे त्याने सांगितले आहे.

या आगामी चित्रपटाची मुख्य अभिनेत्री-निर्माती मानसी पारेख पुढे म्हणाली, “स्वप्नील या चित्रपटात ऑनबोर्ड झाला आहे याचा आम्हाला सगळ्यांना आनंद झाला आहे. स्वप्नील सोबत स्क्रीन स्पेस शेअर करण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. आम्ही लुक टेस्ट आणि वर्कशॉपसाठी आधीच भेटलो आहोत आमच्या सुरुवातीच्या नोट्सची देवाणघेवाण केली आणि आता कधी एकदा रोल होतोय याची वाट मी पाहत आहे.” असे म्हणून अभिनेत्रीने स्वप्नील सोबतची काम करण्याची उत्सुकता व्यक्त केली आहे.

Raj Kundra: ‘मला भेटलेली एखादी मुलगी घेऊन या’; पोर्नोग्राफी प्रकरणी राज कुंद्राचा मोठा खुलासा!

मराठी चित्रपटसृष्टीचा सुपरस्टार स्वप्नील आता गुजराती चित्रपट विश्वात दमदार पाऊल ठेवून कमालीचा अभिनय करणार आहे यात शंका नाही. स्वप्नीलने चित्रपट आणि टेलिव्हिजनमधील आपल्या अविस्मरणीय कामगिरीने कायम प्रेक्षकांचे सातत्याने मनोरंजन केले आहे आता ‘शुभचिंतक’ या नव्या गुजराती चित्रपटाची कथा काय असेल? तो काय भूमिका साकारणार हे बघण उत्कंठावर्धक ठरणार आहे. हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार हे अद्यापही समोर आलेले नाही.

Web Title: Swapnil joshi debut in gujarati cinema this actress is eager to work

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 17, 2024 | 01:04 PM

Topics:  

  • entertainment
  • Gujrati
  • Swapnil Joshi

संबंधित बातम्या

Sunita Ahuja: ‘वो जिसके साथ..’; गोविंदांच्या अफेअरच्या चर्चांवर अखेर सुनीता आहूजांनी सोडलं मौन, ‘त्या’ पोस्टनंतर बदलला सूर?
1

Sunita Ahuja: ‘वो जिसके साथ..’; गोविंदांच्या अफेअरच्या चर्चांवर अखेर सुनीता आहूजांनी सोडलं मौन, ‘त्या’ पोस्टनंतर बदलला सूर?

Pooja Birari Pink Saree Look: पिंक साडीत पूजा बिरारीचा घायाळ करणारा मराठमोळा लुक! सोन्याच्या दागिन्यांनी लावला चारचाँद
2

Pooja Birari Pink Saree Look: पिंक साडीत पूजा बिरारीचा घायाळ करणारा मराठमोळा लुक! सोन्याच्या दागिन्यांनी लावला चारचाँद

Akshaye Khanna Property: ‘धुरंधर’च्या यशानंतर अक्षय खन्नाची मोठी प्रॉपर्टी डील; मलबार हिलमध्ये खरेदी केलं आलिशान अपार्टमेंट
3

Akshaye Khanna Property: ‘धुरंधर’च्या यशानंतर अक्षय खन्नाची मोठी प्रॉपर्टी डील; मलबार हिलमध्ये खरेदी केलं आलिशान अपार्टमेंट

Chhaya Kadam Bhootam Bhayyam: छाया कदमांचा ‘भूतम भयम्’चा अनुभव; ‘जठाई’च्या व्यक्तिरेखेबाबत अभिनेत्रीने सांगितली मनातली गोष्ट
4

Chhaya Kadam Bhootam Bhayyam: छाया कदमांचा ‘भूतम भयम्’चा अनुभव; ‘जठाई’च्या व्यक्तिरेखेबाबत अभिनेत्रीने सांगितली मनातली गोष्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.