Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अखेर थाटात पार पडणार तेजा- वैदहीचा विवाह सोहळा, ‘तुझ्यासाठी तुझ्यासंगं’ मालिकेचा पाहा विशेष भाग

'सन मराठी' वरील लोकप्रिय मालिका 'तुझ्यासाठी तुझ्यासंगं' मध्ये विशेष भाग प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. अखेर तेजा- वैदहीचा विवाह सोहळा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Sep 03, 2025 | 03:24 PM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • थाटामाटात संपन्न होणार तेजा- वैदहीचा विवाह सोहळा
  • मालिकेत खऱ्या अर्थाने पाहायला मिळणार नवा ट्विस्ट
  • माईसाहेबांना कशी सामोरी जाईल वैदही?

‘सन मराठी’ वरील ‘तुझ्यासाठी तुझ्यासंगं’ या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. पहिल्या नजरेतल्या प्रेमाची गोष्ट प्रत्येक वयोगटातील प्रेक्षकांना आवडली. येत्या ५ सप्टेंबर रोजी रात्री ९:३० वाजता मालिकेत तेजा-वैदहीचं लग्न थाटामाटात पार पडताना दिसणार आहे. मालिकेच्या कथानकानुसार तेजाचा प्लॅन फसतो आणि तेजा चुकून वैदहीला किडन्याप करतो. ही गोष्ट सर्वत्र पसरते. यामुळे तेजा-वैदहीच्या आयुष्याला नवं वळण मिळतं. ही सगळी गंमत प्रेक्षकांना येणाऱ्या नव्या एपिसोडमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

भावी सुनबाई दिसल्या हो! बांदेकरांच्या बाप्पाच्या आरतीला पूजा बिरारी उपस्थित; चाहत्यांमध्ये पुन्हा चर्चेला उधाण

तसेच, वैदहीचं नाव ऐकलं तरी माईसाहेबांच्या तळपायाची आग मस्तकात जाते. पण आपल्या राजकीय कारकिर्दीवर काही गोष्टींचा परिणाम होऊ नये म्हणून त्यांना तेजाचं लग्न वैदही सोबत लावून द्यायला लागत आहे. या लग्नात प्रत्येक व्यक्तीचा स्वार्थ दडलेला आहे पण तेजाचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. पहिल्या नजरते जिच्या प्रेमात पडला आणि आता तिच्याबरोबरच त्याच लग्न होत आहे. आता खऱ्या अर्थाने मालिकेत ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. वैदहीला तेजाचा प्रचंड राग असताना तिच्या बहिणीसाठी ती लग्नाला तयार होते. पण आता जेव्हा वैदही मक्तेदारांची सून म्हणून तेजाच्या घरी जाणार तेव्हा तिला कोणकोणत्या आव्हानांना सामोरं जावं लागेल हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. माईसाहेब वैदहीचा छळ करण्याचा प्रयत्न करणार पण वैदही त्यांना सडेतोड उत्तर देऊ शकेल का? हे पाहणं रंजक ठरणार आहे.

गौहर खान आणि झैद दरबारच्या घरी आले गोंडस बाळ, सोशल मीडियावर दिली खुषखबर!

या लग्नाबद्दल वैदही म्हणजेच अभिनेत्री अनुष्का गीते म्हणाली की, “नुकताच तेजा-वैदहीच्या लग्नाचा प्रोमो प्रेक्षकांना पाहायला मिळाला. लग्नातही ट्विस्ट असणार आहे. या लग्नामुळे मला सामूहिक विवाह सोहळ्याचा भन्नाट अनुभव  मिळाला. त्यामुळे लग्न सोहळ्याचं शूटिंग करताना आजूबाजूला ४०-५० जोडपे नटून थटून होते. अगदी २ दिवसात आम्ही लग्नाचं शूट पूर्ण केलं. नॉनस्टॉप २४ तासांचं शूटिंग, सगळ्यांचे थकलेले चेहरे पण कोणीही कामाचा कंटाळा न करता शूटिंग केलं. कलाकार असो किंवा पडद्यामागच्या मंडळी आम्ही सगळेच एकमेकांची काळजी घेत होतो. माझा लग्नातील लूक अगदीच जोधा सारखा आहे. त्यामुळे हे लग्न मी खूप एन्जॉय केलं. आता लग्नानंतर वैदहीला बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागणार आहे. मुळात स्नेहलता, सीमा ताई यांच्याबरोबर जास्त सीन करायला मिळणार आहेत. प्रेक्षकांना तेजा- वैदहीच्या प्रेमाची गोष्ट नक्की आवडेल. आता मालिका रंजक वळणावर आली आहे.”

Web Title: Teja vaidehi wedding ceremony will be held in grand style watch the special episode marathi serial tujhya sathi tujhya sang

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 03, 2025 | 03:24 PM

Topics:  

  • entertainment
  • Indian Television
  • marathi serial news

संबंधित बातम्या

Mridul Tiwari नोएडामध्ये पोहोचल्यानंतर झाले भव्य स्वागत! Bigg Boss 19 मधून बाहेर पडल्यानंतरचा Video Viral
1

Mridul Tiwari नोएडामध्ये पोहोचल्यानंतर झाले भव्य स्वागत! Bigg Boss 19 मधून बाहेर पडल्यानंतरचा Video Viral

Bigg Boss 19 : फॅमिली विक होणार सुरु, गौरव खन्नाची पत्नी तर शेहबाजसाठी शेहनाज करणार घरात एन्ट्री! वाचा सविस्तर
2

Bigg Boss 19 : फॅमिली विक होणार सुरु, गौरव खन्नाची पत्नी तर शेहबाजसाठी शेहनाज करणार घरात एन्ट्री! वाचा सविस्तर

9 वर्षांनी मोठ्या BF सह करणार अभिनेत्री तेजस्वी प्रकाश लग्न? करण कुंद्राने BB मध्येच केलं होतं प्रपोज, का झाला उशीर?
3

9 वर्षांनी मोठ्या BF सह करणार अभिनेत्री तेजस्वी प्रकाश लग्न? करण कुंद्राने BB मध्येच केलं होतं प्रपोज, का झाला उशीर?

चौथ्या एनिवर्सीच्या दिनी Rajkummar Rao – Patralekha च्या घरी आली लक्ष्मी! लग्नाच्या वाढदिवशी दिला मुलीला जन्म
4

चौथ्या एनिवर्सीच्या दिनी Rajkummar Rao – Patralekha च्या घरी आली लक्ष्मी! लग्नाच्या वाढदिवशी दिला मुलीला जन्म

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.