(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
गौहर खान आणि झैद दरबार यांचे लग्न २५ डिसेंबर २०२० रोजी झाले. त्यांनी १० मे २०२३ रोजी त्यांच्या पहिल्या मुलाचे म्हणजे जेहानचे त्यांच्या आयुष्यात आनंदाने स्वागत केले. तसेच आता दोघांनीही त्यांच्या दुसऱ्या मुलाच्या जन्माबद्दल पोस्टद्वारे आनंदाची बातमी शेअर केली आहे. गौहर खान आणि झैद दरबार सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे ज्यामध्ये या दोघांनी एका गोंडस बाळाला जन्म दिल्याची घोषणा केली आहे.
दुसऱ्या मुलाच्या जन्माबद्दल दिली माहिती
गौहर खान आणि झैद दरबार पुन्हा एकदा एका गोंडस मुलाचे पालक झाले आहेत. आज दोघांनीही त्यांच्या दुसऱ्या मुलाच्या जन्माबद्दल इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये गौहरने एक कार्ड शेअर केले आहे, ज्यावर लिहिले आहे की, ‘जहान १ सप्टेंबर २०२५ रोजी जन्मलेल्या आपल्या मोठ्या भावाचे स्वागत करण्यास तयार आहे.’ या पोस्टसह गौहरने तिच्या मित्रमैत्रिणी, कुटुंब आणि नातेवाईकांच्या प्रार्थनांचे आभार मानले आहेत. तसेच चाहते देखील अभिनेत्रीला शुभेच्छा देत आहेत.
गौहर खान आणि झैद दरबारच्या घरी आले गोंडस बाळ, सोशल मीडियावर दिली खुषखबर!
गौहर खान आणि झैद दरबार यांची कारकीर्द
२००२ मध्ये तिने फेमिना मिस इंडिया स्पर्धेत भाग घेतला, जिथे तिने मिस टॅलेंटेडचा किताब जिंकला. गौहरने २००९ मध्ये आलेल्या ‘रॉकेट सिंग: सेल्समन ऑफ द इयर’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले आणि २०१३ मध्ये ‘बिग बॉस ७’ या रिॲलिटी शोची विजेती ठरली. त्यानंतर तिने ‘इशकजादे’, ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ आणि ‘बेगम जान’ सारख्या अनेक चित्रपटांमध्ये तसेच ‘खतरों के खिलाडी ५’ आणि ‘इंडियाज रॉ स्टार’ सारख्या टीव्ही शोमध्ये काम केले आहे. झैद दरबार एक कोरिओग्राफर आणि सोशल मीडिया इनफ्लुएन्सर आहे. जो संगीतकार इस्माईल दरबारचा मुलगा आहे. गौहर आणि झैदचे २०२० मध्ये लग्न झाले आणि आता ते दोन मुलांचे पालक आहेत.