Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज्य शासनाने केला तेजश्री प्रधानचा सन्मान; सांस्कृतिक युवा पुरस्कार मिळवल्यानंतर अभिनेत्री भावुक

मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री तेजश्री प्रधानला महाराष्ट्र शासनाच्या मोठ्या पुरस्काराने सन्मानाची करण्यात आले आहे. यानिमित्ताने तिने हा खास क्षण सोशल मीडियावर पोस्टद्वारे शेअर केला आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Dec 05, 2025 | 10:40 AM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • राज्य शासनाने केला तेजश्री प्रधानचा सन्मान
  • पुरस्कार मिळवल्यानंतर अभिनेत्री भावुक
  • सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून मानले आभार
 

सध्या वीण दोघातली तुटेना मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी अभिनेत्री तेजश्री प्रधान चर्चेत आहे. अभिनेत्रीने एक आनंदाची बातमी सोशल मीडियावर शेअर केली. जी जाणून तिच्या चाहत्यांना देखील आनंद झाला आहे. अभिनेत्रीला अलिकडेच ‘महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालय राज्य सांस्कृतिक युवा पुरस्कार 2024’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. ज्यामुळे ती खूप आनंदी झाली असून अभिनेत्रीने यानिमित्ताने एक पोस्ट शेअर केली आहे ज्यामध्ये तिने तिचा संपूर्ण प्रवास सांगितला आहे.

‘The Traitors’ साठी करण जोहरला मिळाला सर्वोत्कृष्ट होस्ट पुरस्कार; सोशल मीडियावर शेअर केला आनंद

अभिनेत्री तेजश्री प्रधानने या पुरस्कार सोहळ्यातील काही क्षण सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिला सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला आहे. यानिमित्ताने शेअर केलेल्या पोस्टमध्ये तेजश्रीने लिहिले की, ‘आपल्या मार्गावर विश्वास ठेवून पुढे चालत राहणे, यशासकट अन् अपयशासकट… न थकता… न डगमगता… उरी विश्वास बाळगून… की जाणारा प्रत्येक दिवस काहीतरी नवं देत राहतो.’

 

अभिनेत्री पुढे लिहिले, ‘ते सर्व वेचत चालत राहणे आणि मग, एक छानसा विसावा घेणे त्यात थोडा आढावा! करून ठेवलेल्या गोष्टींचा… चुकलेल्याचा… बरोबर गोष्टींचा… मायबाप प्रेक्षकाच्या प्रेमाचा… टीकेचा… आपुलकी दाखवणाऱ्या सहकलाकारांचा… हितचिंतकांचा आणि निंदकांचा… मग अचानक कोणीतरी येतं आणि म्हणतं, “आमचं लक्ष आहे, तुमच्या वाटचालीवर” आणि मग मन पुन्हा नव्या जोमाने विश्वासाने पुढे चालू लागतं, पुन्हा एकदा.’

Dharmendra 90th Birth Anniversary: देओल कुटुंबियांचा मोठा निर्णय; फार्महाऊसवर होणार जल्लोष, चाहत्यांसाठीही सरप्राईज

‘ह्या वेळी हे कोणीतरी फार महत्वाचं आहे माझ्या कलाक्षेत्रातल्या प्रवासासाठी. महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालय राज्य सांस्कृतिक युवा पुरस्कार २०२४. महाराष्ट्र शासनाचे आणि माननीय मंत्री, सांस्कृतिक कार्य, माननीय ॲड. आशिष शेलार यांचे खूप खूप आभार या केलेल्या सन्मानासाठी.’ असे लिहून अभिनेत्रीने आपला आनंद व्यक्त केला आहे. दरम्यान तेजश्रीने ही पोस्ट शेअर केल्यानंतर चाहते तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. तर चाहत्यांसह किशोरी अंबिये, ऋतुजा बागवे, छाया कदम या तिच्या कलाविश्वातील मैत्रिणींनीही तिचे अभिनंदन केले.

तसेच अभिनेत्रीच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर, सध्या ती झी मराठीवरील ‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेत स्वानंदीच्या भूमिकेत प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसत आहे. तिच्यासह अभिनेता सुबोध भावे देखील मुख्य भूमिकेत आहे. याशिवाय ती अलिकडेच तिचा ‘असा मी अशी मी’ हा सिनेमा देखील रीलिज झाला. ज्यामध्ये अभिनेते अजिंक्य देव यांच्यासोबत तिची रोमँटिक केमिस्ट्री पाहायला मिळाली आहे. तसेच तेजश्रीने अनेक मराठी चित्रपटामध्ये आणि मालिकांमध्ये काम करून प्रसिद्धी मिळवली आहे. आणि चाहत्यांच्या मनात घर केले आहे.

 

 

Web Title: Tejashree pradhan honoured with state cultural youth award actress shares emotional post about journey

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 05, 2025 | 10:40 AM

Topics:  

  • entertainment
  • marathi cinema
  • Tejashree Pradhan

संबंधित बातम्या

Pravin Tarde on Trollers: त्यांना हा सिनेमा जास्त झोंबला.., ‘देऊळ बंद 2’वर टीका करणाऱ्यांना प्रवीण तरडेंचं सडेतोड उत्तर, म्हणाले..
1

Pravin Tarde on Trollers: त्यांना हा सिनेमा जास्त झोंबला.., ‘देऊळ बंद 2’वर टीका करणाऱ्यांना प्रवीण तरडेंचं सडेतोड उत्तर, म्हणाले..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.