
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
अभिनयाच्या पलिकडे जाऊन आवडी जोपासून त्यातून काहीतरी वेगळं करून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी अनेक कलाकार मंडळी काही न काही करत असतात अश्याच कलाकारा मध्ये सध्या एक नाव चर्चेत आहेत ते म्हणजे अभिनेत्री संस्कृती बालगुडे हिचं. नृत्याची आवड जपत संस्कृतीने सातासमुद्रापार तिच्या पहिल्या वहिल्या “संभवामि युगे युगे”चा पहिला शो अगदी दणक्यात केला आहे. दुबईत टाळ्या शिट्ट्यांचा आवाज गडगडला आहे.
‘इंडियन आयडल १’ जिंकल्यानंतर का घाबरला Abhijeet Sawant ? म्हणाला, ‘ते माझे आयुष्य उध्वस्त करतील..’
काही दिवसांपूर्वी तिने तिच्या या डान्स ड्रामाची सुरुवात केली आणि हा शो परदेशात जाऊन हाऊसफुल्ल केला. परदेशात सुद्धा “संभवामि युगे युगे” या डान्स ड्रामाला रसिकांनी भरभरून प्रतिसाद आणि प्रेम मिळालं आहे. या बद्दल बोलताना संस्कृती सांगते ” परदेशात जाऊन आम्ही “संभवामि युगे युगे” चा पहिला शो करण्याचा ठरवलं पण मनात खूप धाकधूक, उत्सुकता होती आणि अश्यातच हा पहिला वहिला शो परदेशात सुद्धा हाऊसफुल्ल होईल याची आम्हाला कल्पना नव्हती. “संभवामि युगे युगे” सारख्या डान्स ड्रामाची संकल्पना भारताबाहेर लोकांना किती समजेल अशी शंका असताना जेव्हा कृष्ण रुपात माझी स्टेज वर एंट्री झाली तेव्हा प्रेक्षकांनी टाळ्या वाजवल्या जसा शो पुढे जाऊ लागला प्रेक्षकांचा प्रतिसाद येऊ लागला आणि शो संपल्या नंतर आम्हाला आमच्या पहिल्या वहिल्या शो साठी स्टॅनडिंग ओव्हेशन ( standing Ovation ) मिळालं.”
दार उघडणार, नशिबाचा गेम पालटणार! रितेश भाऊंच्या नव्या प्रोमोने वेधले ‘बिग बॉस’ प्रेमींचे लक्ष
“संभवामि युगे युगे” शो ला दुबईत मिळालेला उस्फुर्त प्रतिसाद हा खूप कमाल होता शो नंतर अनेकांनी येऊन खूप शुभेच्छा दिल्या हा शो हिंदीत करा अस देखील सांगितलं अनेकांनी साक्षात कृष्ण अनुभवता आला अश्या प्रतिक्रिया प्रेक्षकांनी दिल्या. एकंदरीत भारताबाहेर देखील या मराठमोळ्या कृष्ण रुपात असलेल्या शो ला प्रेक्षकांनी दिलेलं प्रेम बघून मला छान वाटलं. नवीन वर्षात पुण्यात आणि मुंबईत सोबत महाराष्ट्र अनेक ठिकाणी याचे शो घेऊन आम्ही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहोत”
कृष्ण रुपात असणारी संस्कृती आणि कृष्णाच्या आयुष्यातील महत्त्वपूर्ण क्षण रंगवून दाखवणारा संभवामि युगे युगे हा डान्स ड्रामा आता नव्या वर्षात भारतात होणार असून पुण्यात हा नवा कोरा शो लवकरच प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. येणाऱ्या काळात अनेक वैविध्यपूर्ण कलाकृती मधून संस्कृती प्रेक्षकांचं मनोरंजन करणार यात शंका नाही.