Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘तू बोल ना’ गाण्यातून उलघडणार प्रेमाची गोष्ट, ‘मना’चे श्लोक’मधील पाहिलं गाणं प्रदर्शित

‘मना’चे श्लोक’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तसेच या चित्रपटातील पाहिलं वाहिलं गाणं नुकताच रिलीज झाले आहे. ज्याचे नाव आहे 'तू बोल ना’. या गाण्यात प्रेमाचा प्रवास पाहायला मिळणार आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Sep 17, 2025 | 03:50 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • ‘मना’चे श्लोक’ चित्रपटातून उलघडणार प्रेमाची गोष्ट
  • ‘मना’चे श्लोक’मधील पाहिलं गाणं प्रदर्शित
  • ‘तू बोल ना’ या गाण्याबद्दल काय म्हणाली मृण्मयी?

सध्या चित्रपटगृहात नवनवीन मराठी चित्रपट प्रदर्शित होताना दिसत आहेत. याचदरम्यान आणखी एका मराठी चित्रपटाची भर यामध्ये पडली आहे. आणि तो चित्रपट म्हणजे ‘मना’चे श्लोक’. ‘मना’चे श्लोक’ या चित्रपटामध्ये नवी प्रेम कहाणी खुलताना प्रेक्षकांना दिसणार आहे. तसेच अभिनेत्री मृण्मयी देशपांडे आणि अभिनेता राहुल पेठे यांची जोडी पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. तसेच या चित्रपटात मृण्मयी मनवा आणि राहुल श्लोकची भूमिका साकारणार आहे.

‘मना’चे श्लोक’ चित्रपटाच्या टीझरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून मनवा आणि श्लोकच्या जोडीलाही प्रेक्षकांची प्रचंड पसंती मिळत आहे. चित्रपटाच्या धमाल टीझरनंतर आता प्रेक्षक चित्रपटासाठी खूप उत्सुक आहेत. याच उत्सुकतेत भर घालत चित्रपटातील पहिलं गाणं प्रदर्शित झालं आहे. ‘तू बोल ना’ या गाण्यात मनवा आणि श्लोक यांच्या नात्यात फुलणारं प्रेम पाहायला मिळत आहे. त्या दोघांचे गोड क्षण या गाण्यात दिसत आहेत. या सुंदर गाण्याला तुषार जोशी यांचा मधुर आवाज लाभला असून गौतमी देशपांडेने या गाण्याला शब्दबद्ध केले आहे. तर सिद्धार्थ आणि सौमिल यांच्या सुरेल संगीताने हे गाणं अधिकच जबरदस्त बनले आहे.

करिश्मा कपूरच्या मुलांना नाही मिळाले त्यांच्या हक्काचे १९०० कोटी रुपये; सावत्र आईने केला विश्वासघात?

या गाण्याचे चित्रीकरण हिमालयात झाल्याने त्याला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळत आहे. यात मनवा आणि श्लोकची केमिस्ट्री पाहायला मिळत असून या दोघांचे पुढे काय होणार, हे जाणून घेण्याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मराठी अभिनेत्री आणि आता दिग्दर्शिका मृण्मयी देशपांडे करत आहे. मृण्मयी पहिल्यांदाच या चित्रपटाद्वारे दिग्दर्शन करताना प्रेक्षकांना दिसणार आहे.

 

या चित्रपटाबद्दल आणि दिग्दर्शनाच्या अनुभवाबद्दल सांगताना, दिग्दर्शिका मृण्मयी देशपांडे म्हणाली की, ”या चित्रपटातील हे माझं सर्वात आवडतं गाणं आहे. हिमालयात हे गाणं चित्रित केल्यानं हे दिसतानाही सुंदर दिसतेय आणि त्या गाण्याच्या चित्रीकरणाचा अनुभवही अत्यंत सुंदर होता आणि प्रेक्षकांना हे नक्कीच आवडेल.” आता या चित्रपटाला आणि चित्रपटामधील गाण्याला कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

शाहरुख, सलमान, आमिर, बादशाह, रणवीर सिंग आणि अनेक स्टार्स एकाच सीरिजमध्ये! कधी, कुठे बघाल ?

‘मना’चे श्लोक’ हा चित्रपट १० ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. याचे लेखन आणि दिग्दर्शन मृण्मयी देशपांडे यांनी केले असून निर्माते श्रेयश जाधव आणि संजय दावरा आहेत. चित्रपटात मृण्मयी देशपांडे, राहुल पेठे, पुष्कराज चिरपुटकर, सुव्रत जोशी, सिद्धार्थ मेनन, हरीश दुधाडे आणि करण परब असे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट स्टारलाईट बॉक्स थिएटर्स आणि नितीन वैद्य प्रॉडक्शन्स यांच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. तसेच या चित्रपटामधील मृण्मयी आणि राहुल पेठे या दोघांची नवी जोडी पाहण्यासाठी चाहते आतुर आहेत.

Web Title: The journey of love will be experienced through the song tu bol na the love song from manache shlok released

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 17, 2025 | 03:50 PM

Topics:  

  • entertainment
  • marathi cinema
  • marathi movie

संबंधित बातम्या

करिश्मा कपूरच्या मुलांना नाही मिळाले त्यांच्या हक्काचे १९०० कोटी रुपये; सावत्र आईने केला विश्वासघात?
1

करिश्मा कपूरच्या मुलांना नाही मिळाले त्यांच्या हक्काचे १९०० कोटी रुपये; सावत्र आईने केला विश्वासघात?

पंतप्रधान मोदींच्या जीवनावर बनणार बायोपिक, ‘हा’ अभिनेता दिसणार मुख्य भूमिकेत; मोदींच्या वाढदिवशी दिले सरप्राईज
2

पंतप्रधान मोदींच्या जीवनावर बनणार बायोपिक, ‘हा’ अभिनेता दिसणार मुख्य भूमिकेत; मोदींच्या वाढदिवशी दिले सरप्राईज

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फेव्हरेट चित्रपट माहिती आहे का? 60 वर्षांपूर्वी झाला होता रिलीज, जिकलेत 7 फिल्मफेअर अवार्ड्स
3

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फेव्हरेट चित्रपट माहिती आहे का? 60 वर्षांपूर्वी झाला होता रिलीज, जिकलेत 7 फिल्मफेअर अवार्ड्स

Homebound: मैत्री, स्वप्न आणि संघर्षाची गोष्ट घेऊन रिलीज झाला ‘होमबाउंड’चा ट्रेलर, ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित
4

Homebound: मैत्री, स्वप्न आणि संघर्षाची गोष्ट घेऊन रिलीज झाला ‘होमबाउंड’चा ट्रेलर, ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.